Narayan Rane vs Shivsena : ‘मिलिंद नार्वेकर म्हणजे तोच का जो ‘बॉय’चं काम करायचा, राणेंनी ‘मातोश्री’तला तो प्रसंग सांगितला

सुधीर मुनगंटीवार, मोहित कंबोज यांच्यानंतर आता केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनीही संजय राऊतांवर जोरदार पलटवार केलाय. राणे यांनी अगदी शेलक्या शब्दांचा वापर करत राऊतांना प्रत्युत्तर दिलंय. त्याचबरोबर शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर यांच्यावरही राणेंची खोचक शब्दात निशाणा साधलाय.

Narayan Rane vs Shivsena : 'मिलिंद नार्वेकर म्हणजे तोच का जो 'बॉय'चं काम करायचा, राणेंनी 'मातोश्री'तला तो प्रसंग सांगितला
नारायण राणे, मिलिंद नार्वेकर
Follow us
| Updated on: Feb 16, 2022 | 5:32 PM

मुंबई : शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी मंगळवारी शिवसेना भवनात पत्रकार परिषद घेत भाजप नेते आणि अंमलबजावणी संचलनालय अर्थात ईडीवर जोरदार निशाणा साधलाय. त्याचबरोबर राऊत यांनी किरीट सोमय्या (Kirit Somaiya), सुधीर मुनगंटीवार आणि मोहित कंबोज यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. राऊतांच्या या आरोपांना आता भाजपकडूनही जोरदार प्रत्युत्तर देण्यात येत आहे. सुधीर मुनगंटीवार, मोहित कंबोज यांच्यानंतर आता केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांनीही संजय राऊतांवर जोरदार पलटवार केलाय. राणे यांनी अगदी शेलक्या शब्दांचा वापर करत राऊतांना प्रत्युत्तर दिलंय. त्याचबरोबर शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर यांच्यावरही राणेंची खोचक शब्दात निशाणा साधलाय.

संजय राऊत यांच्या मंगळवारच्या पत्रकार परिषदेत एकनाथ शिंदे, मिलिंद नार्वेकर, एकनाथ शिंदे हे नेते उपस्थित नव्हते. त्याबाबत पत्रकारांनी विचारलं असता, कोण ओ मिलिंद नार्वेकर? पूर्वी मातोश्रीमध्ये बॉयचं काम करायचे ते काय? हो… माझ्यासमोरची गोष्ट आहे ओ. मी पाहिलं आहे, बेल मारली की येस सर… काय आणू? असं म्हणणारा आता नेता बनला. काय अपग्रेडेशन स्पीड आहे ओ, अशा शब्दात राणेंनी मिलिंद नार्वेकरांची खिल्ली उडवली. तर अनिल परब तर काय प्रख्यात वकील. हल्ली अॅडव्होकेट जनरलला मार्गदर्शन करतात. कुणाला कुठे अरेस्ट करावं काय… याबाबत फोन त्यांचेच जातात सगळीकडे. आता ते आतमध्ये गेल्यावर त्यांना किती फोन जातात हा प्रश्न आहे? असा खोचक सवालही राणेंनी परबांबाबत केलाय.

मिलिंद नार्वेकरांचा शिवसेना प्रवेश कसा झाला?

दरम्यान, मिलिंद नार्वेकर शिवसेना सचिव पदापर्यंत कसे पोहोचले याची उत्सुकता अनेकांना आहे. मात्र, याचं उत्तर खुद्द मिलिंद नार्वेकरांनीच एक ट्वीटद्वारे दिलं होतं. 26 जुलै अर्थात उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसाला मिलिंद नार्वेकरांनी उद्धव ठाकरे यांच्यासोबतचा एक फोटो ट्वीट करुन आपल्या शिवसेना प्रवेशाची माहिती दिली होती. ‘सप्टेंबर १९९४ चा नेहमीसारखाच एक दिवस… एक तरुण उद्धवसाहेब ठाकरे यांना भेटला. म्हणाला मला शाखप्रमुख बनायचं आहे. साहेब म्हणाले, “शाखाप्रमुख बनायचं आहे की पक्ष देईल ती जबाबदारी घ्यायची आहे?” उद्धवसाहेबांचा शब्द प्रमाण मानून ते देतील ती जबाबदारी घेण्यासाठी तो तरुण तयार झाला. तेव्हापासून उद्धवसाहेबांनी मार्गदर्शन करत, नवे विचार देत, कौतुकाचे बोल आणि प्रसंगी कानउघडणी करत त्या तरुणाप्रमाणे अनेकांच्या आयुष्याला सुयोग्य दिशा दिली. आमच्या या मार्गदर्शकाला, प्रेरणा स्थानाला वाढदिवसाच्या आभाळभर शुभेच्छा’, असं ट्वीट मिलिंद नार्वेकर यांनी केलं होतं.

त्यावरुन नार्वेकर यांनी 1994 मध्ये आपल्याला शाखाप्रमुख बनण्याची इच्छा उद्धव ठाकरे यांच्याकडे व्यक्त केली होती. तेव्हा उद्धव ठाकरे यांनी तुला शाखाप्रमुख बनायचं आहे की पक्ष देईल ती जबाबदारी घ्यायची आहे? असा प्रश्न विचारला होता. नार्वेकर यांनी या ट्वीटमध्ये एक जुना फोटोही शेअर केला आहे.

इतर बातम्या :

Narayan Rane Press Conference : ‘ईडीवर बोलू नको, बीडी प्यायला लावतील’, राणेंच्या वक्तव्यावर गंभीर वातावरणही मोकळं झालं

संजय राऊतांचा डोळा उद्धव ठाकरेंच्या खुर्चीवर, राऊत पूर्ण राष्ट्रवादीचे, त्यांना सुपारी मिळाली-राणे

सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.