Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

उद्या निवडणुका घ्या, मोदी 400 पेक्षा जास्त जागा जिंकतील : चंद्रकांत पाटील

उद्या निवडणुका घ्या, मोदी 400 पेक्षा जास्त जागा जिंकतील, असा विश्वास भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी व्यक्त केला.

उद्या निवडणुका घ्या, मोदी 400 पेक्षा जास्त जागा जिंकतील : चंद्रकांत पाटील
चंद्रकांत पाटील, भाजप प्रदेशाध्यक्ष
Follow us
| Updated on: May 18, 2021 | 6:20 PM

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदींना बदनाम करण्याचं षडयंत्र काँग्रेसचं आहे. उद्या निवडणुका घ्या, मोदी 400 पेक्षा जास्त जागा जिंकतील, असा विश्वास भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केला. भाजपने आज मराठा आरक्षणासंदर्भात (Maratha reservation) देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या उपस्थितीत बैठक घेतली. यावेळी भाजप खासदार नारायण राणे, प्रसाद लाड,  नरेंद्र पाटील, विनायक मेटे उपस्थित होते. या बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना चंद्रकांत पाटलांनी (Chandrakant Patil) हा विश्वास व्यक्त केला. (Narendra Modi will win 400 seats  If elections held tomorrow Said BJP Chandrakant Patil)

चंद्रकांत पाटील यांना काँग्रेसचं टूल किट आणि राहुल गांधी हे करत असलेल्या टीकेबाबत प्रश्न विचारण्यात आला. त्यावर पाटील म्हणाले, जर देशात लोकसभेच्या निवडणुका उद्या घेतल्या, तर मोदी 400 पेक्षा जास्त जागांवर विजय मिळवतील”

टूलकिट हे एक असं डॉक्युमेंट आहे, ज्यामध्ये आंदोलनादरम्यान सोशल मीडियावर समर्थन कसं मिळवावं, कोणते हॅशटॅग वापरावेत, आंदोलनावेळी जर काही अडचणी आल्या तर कुठे संपर्क करावा, आंदोलनावेळी काय करावं, काय करु नये असा सर्व कार्यक्रम या टूलकिटमध्ये सांगितला आहे.

याच टूलकिटवर हल्लाबोल करताना भाजपने काँग्रेसवर निशाणा साधला.

मराठा आरक्षण

यावेळी मराठा आरक्षणाबाबत चंद्रकांत पाटील म्हणाले, “कायदा अयोग्य असता तर नोकऱ्या, प्रवेश कोर्टाने कसे दिले असते, राज्य सरकार बाजू मांडण्यास कमी पडले. मराठा समाजाच्या आंदोलनात भाजप पाठींबा देणार, एक तज्ज्ञ समिती नेमून कायदा कसा योग्य आहे वगैरे या गोष्टी दाखवून देऊ. नवा मागासवर्गीय आयोग हा सरकारलाच नेमावा लागेल. मराठा समाज हा मागास आहे हे सिद्ध करावं लागेल, मग हा अहवाल केंद्राला पाठवावा लागेल”

आम्ही मराठा आरक्षण दिलं 

राज्य सरकार मराठा समाजाची दिशाभूल करत आहे. लॉकडाऊननंतर आढावा घेऊन निर्णय घ्यायचा असतो, पण आत्ताच पुन्हा लॉकडाऊन कायम ठेवावा लागेल अशी भाषा करत आहेत. मराठा समाज शांत बसणार नाही, भाजप पाठींबा देईल. मराठा समाज रस्त्यावर उतरेल म्हणून लॉकडाऊन वाढवला जात आहे, मराठा आंदोलन पेलवणार नाही, झेपणार नाही, त्यामुळे ही खेळी केली जात आहे, असा आरोप चंद्रकांत पाटलांनी केला.

आम्ही मराठा समाजाला आरक्षण दिलं. ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता हे आरक्षण दिलं आणि ते हायकोर्टात टिकलं सुद्धा. मात्र महाविकास आघाडी सरकारने भक्कम बाजू न मांडल्याने सुप्रीम कोर्टाने मराठा आरक्षण रद्द केलं, असा दावा चंद्रकांत पाटील म्हणाले.

VIDEO : चंद्रकांत पाटील काय म्हणाले?

संबंधित बातम्या  

Maratha Reservation : सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाच्या अभ्यासासाठी समिती स्थापन, 31 मे पर्यंत अहवाल देणार

मराठा आरक्षणावर जोर बैठका, चव्हाणांची ‘सह्याद्री’वर, तर भाजपची फडणवीसांच्या ‘सागर’वर बैठक

Explainer : ग्रेटा थनबर्गने शेअर केलेलं टूलकिट नेमकं काय? ते काम कसं करतं?

(Narendra Modi will win 400 seats  If elections held tomorrow Said BJP Chandrakant Patil)

प्रशांत कोरटकर जामीनासाठी अर्ज करणार
प्रशांत कोरटकर जामीनासाठी अर्ज करणार.
आमदारांच्या घरांसमोर टेंभे पेटवणार; कर्जमाफीच्या मुद्यावर कडू आक्रमक
आमदारांच्या घरांसमोर टेंभे पेटवणार; कर्जमाफीच्या मुद्यावर कडू आक्रमक.
लाडक्या बहिणींमुळे तिजोरीवर भार आलाय, त्यामुळे..; शिरसाटांचा खुलासा
लाडक्या बहिणींमुळे तिजोरीवर भार आलाय, त्यामुळे..; शिरसाटांचा खुलासा.
कर्जमाफी देता येत नाही तर...; संजय राऊतांचा अजित पवारांना टोला
कर्जमाफी देता येत नाही तर...; संजय राऊतांचा अजित पवारांना टोला.
स्वत:च्याच कारमध्ये मृतावस्थेत आढळला पोलीस कर्मचारी
स्वत:च्याच कारमध्ये मृतावस्थेत आढळला पोलीस कर्मचारी.
ठाणे का टायगर, आखो मे अंगार.. ; शिंदेंच्या समर्थनार्थ शहाजीबापूंचं गाण
ठाणे का टायगर, आखो मे अंगार.. ; शिंदेंच्या समर्थनार्थ शहाजीबापूंचं गाण.
मनसे मेळावा; शिवतीर्थावर राज ठाकरेंची तोफ धडाडणार
मनसे मेळावा; शिवतीर्थावर राज ठाकरेंची तोफ धडाडणार.
संघ बाह्य आणि आंतरिक दृष्टीसाठी काम करतो; पंतप्रधान मोदींचे गौरवोद्गार
संघ बाह्य आणि आंतरिक दृष्टीसाठी काम करतो; पंतप्रधान मोदींचे गौरवोद्गार.
'आपल्या सर्वांना...', पंतप्रधान मोदींची मराठीतून भाषणाला सुरुवात
'आपल्या सर्वांना...', पंतप्रधान मोदींची मराठीतून भाषणाला सुरुवात.
शुद्ध सात्विक प्रेम हीच संघाची प्रेरणा - मोहन भागवत
शुद्ध सात्विक प्रेम हीच संघाची प्रेरणा - मोहन भागवत.