नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी पुन्हा एकदा विश्वनेते बनले आहेत. जगातील सर्वाधिक लोकप्रिय नेते होण्याचा मान त्यांना मिळाला आहे. अमेरिकेच्या डेटा इंटेलिजन्स फर्म द मॉर्निंग कन्सल्टने हा सर्व्हे केला आहे. या सर्व्हेनुसार अॅप्रुव्हल रेटिंगमध्ये अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन आणि ब्रिटनचे पंतप्रधान यांच्यासह जगातील 13 राष्ट्रप्रमुखांना मोदींनी लोकप्रितेत पछाडलं आहे. मोदींची अॅप्रुव्हल रेटिंग 70 टक्के आहे.
दोन दिवसांपूर्वीच म्हणजे 5 नोव्हेंबर रोजी हा सर्व्हे अपडेट करण्यात आला. त्यात मोदींनी लोकप्रियतेच्या बाबतीत जगभरातील अनेक राष्ट्रपती आणि पंतप्रधानांना मागे टाकले. मोदींनी मॅक्सिकन राष्ट्रपती आंद्रे मॅन्युअल लोपेज ओब्राडोर, इटलीचे पंतप्रधान मारिओ द्राघी, जर्मनचे चान्सलर अँजेला मर्केल, अमेरिकेचे राष्ट्रपती जो बायडन यांनाही मोदींनी लोकप्रियतेत मागे टाकले आहे.
द मॉर्निंग कन्सल्टच्या सर्व्हेनुसार, भारतात मे 2021मद्ये कोरोनाची दुसरी लाट आली होती. या काळात मोदींच्या लोकप्रियतेत मोठी घसरण झाली होती. कोरोनामुळे ऑक्सिजनची कमतरता निर्माण झाली होती. त्यामुळे संपूर्ण देशात हाहा:कार उडाला होता. मात्र, मोदी सरकारने या कठिण प्रसंगावर मात करून देशाला सावरले होते.
जगातील महासत्ता समजल्या जाणाऱ्या अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांना मोदींनी लोकप्रियतेत मागे टाकले आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडनच नव्हे तर ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान स्कॉट मॉरिसन, कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो, ब्रिटीश पीएम बोरिस जॉन्सन आणि ब्राझिलचे राष्ट्रपती जेर बोल्सोनैरो यांनाही मोदींनी मागे टाकले आहे. या सर्व्हेत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष पाचव्या क्रमांकावरून सहाव्या तर ब्रिटीश पंतप्रधान आठव्या स्थानावरून 10व्या क्रमांकावर आले आहेत.
मे 2020मध्ये मोदींची लोकप्रियता शिगेला पोहोचली होती. त्यावेळी मोदींची अॅप्रुव्हल रेटिंग 84 टक्के होती. त्यावेळी भारत कोरोनाच्या संकटातून बाहेर पडत होता. त्याच वर्षी जूनमधील अॅप्रुव्हल रेटिंगच्या तुलनेत यावेळची मोदींची अॅप्रुव्हल रेटिंग चांगली आहे. जूनमध्ये मोदींची अॅप्रुव्हल रेटिंग 66 टक्के होती. मोदींच्या डिसअॅप्रुव्हल रेटिंगमध्येही घसरण झाली आहे. ही घसरण 25 टक्के आहे.
PM @narendramodi shines at top of global leader approval ratings, tops the list of 13 world leaders with 70% approval rating pic.twitter.com/DjtOaA3viO
— DD News (@DDNewslive) November 7, 2021
द मॉर्निंग कन्सल्ट अॅप्रुव्हल आणि डिसअॅप्रुव्हल रेटिंग 7 दिवसात मुव्हिंग अॅव्हरेजच्या आधारे काढली जाते. या कॅलक्युलेशनध्ये 1 ते 3 टक्क्यांपर्यंत प्लस-मायनस मार्जिन असते. म्हणजे अॅप्रुव्हल आणि डिसअॅप्रुव्हल रेटिंगमध्ये 1 ते 3 टक्क्यांपर्यंत वाढ किंवा घसरण होऊ शकते. ही रेटिंग काढण्यासाठी मॉर्निग कन्सल्टने भारतात सुमारे 2126 लोकांची ऑनलाईन मुलाखत घेतली होती.
पंतप्रधान नरेंद्र मोदी जगातील लोकप्रिय नेते ठरल्यानंतर संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी ट्विट करून आनंद व्यक्त केला आहे. मोदी जगातील सर्वात लोकप्रिय नेते ठरले आहेत. जनसामान्यांमध्ये त्यांच्याबाबत असलेला विश्वास यातून अधोरेखित होतो. एक कर्मठ आणि प्रामाणिक नेता म्हणून त्यांची प्रतिमा विश्वासहार्य आणि लोकप्रिय ठरत आहे, असं राजनाथ सिंह म्हणाले.
प्रधानमंत्री श्री @narendramodi एक सर्वे में 70 फ़ीसदी अप्रूवल रेटिंग के साथ, दुनिया के सबसे लोकप्रिय राजनेता के रूप उभर कर सामने आए हैं। जनसामान्य में उनके नेतृत्व के प्रति विश्वास और एक कर्मठ और ईमानदार नेता के रूप में उनकी छवि उन्हें सबसे विश्वसनीय और लोकप्रिय बनाती है।
— Rajnath Singh (@rajnathsingh) November 7, 2021
संबंधित बातम्या:
(Narendra Modi World’s Most Popular Leader, US President Slips To 6th And British Prime Minister To 10th)