मर्द असाल तर रस्त्यावर या; नरेश म्हस्के यांचं या नेत्याला आव्हान
भाजप नेते चोर आहेत. त्यांना चोर म्हणावं. डॉक्टर होण्यासाठी गद्दारी करावी लागते. एप्रिल फूल म्हणजे नरेंद्र मोदी, अशा पद्धतीने सर्वच नेत्यांवर आक्षेपार्ह पद्धतीने ती महिला व्यक्त होते.
ठाणे : रोशनी शिंदे या ठाकरे गटाच्या महिलेला मारहाण केल्याचा आरोप खासदार राजन विचारे यांनी केला. रोशनी शिंदे हिला रुग्णालयात दाखल करण्यात आले. उद्धव ठाकरे तिच्या भेटीसाठी रुग्णालयात आले. याप्रकरणी शिवसेनेचे प्रवक्ते नरेश म्हस्के म्हणाले, मीडिया आणि आंदोलनाच्या माध्यमातून चुकीच्या पद्धतीने शिवसेनेच्या महिला पदाधिकाऱ्यांवर आरोप करण्याचे प्रयत्न केले जात आहेत. रोशनी शिंदे या गरोदर महिलेला मारहाण केल्याचा कांगावा केला होता. तिच्या जीवाला काही झालं तर त्याला जबाबदार मुख्यमंत्री शिंदे आणि त्यांचे सहकारी असतील. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे,पंतप्रधान नरेंद्र मोदी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवी, भाजप यांच्या विरोधात अतिशय घाणेरड्या भाषेत ती महिला व्यक्त होत असते.
भाजप नेते चोर आहेत. त्यांना चोर म्हणावं. डॉक्टर होण्यासाठी गद्दारी करावी लागते. एप्रिल फूल म्हणजे नरेंद्र मोदी, अशा पद्धतीने सर्वच नेत्यांवर आक्षेपार्ह पद्धतीने ती महिला व्यक्त होते. त्या महिलेच्या खांद्यावर बंदूक ठेवून मातोश्री आणि ठाण्याचे खासदार राजन विचारे हे आमच्या नेत्यांवर टीका करत असतात.
ती महिला पोलीस ठाण्यात चालत गेली
ती महिला एकेकाळी आमच्या सोबत काम करत होती. म्हणून आमच्या युवा सेनेच्या काही महिला तिला समजावण्याकरिता गेल्या. ती अंगावर आली. काही बाचाबाची झाली. कुठल्याही प्रकारची मारहाण झाली नाही. ती महिला चालत पोलीस ठाण्यात आली. त्यानंतर प्लॅन करून खासगी रुग्णालयात भरती न होता ते एका खासगी रुग्णालयात भरती झाली.
जबरदस्ती एडमीट केलंय
बाहेर कुठंही जखमा नसल्याचा सिव्हील हॉस्पिटलचा रिपोर्ट आहे. खासगी रुग्णालयाच्या डॉक्टरांनी प्रेस कॉन्फरन्स घेऊन सर्व सांगितलं. यावरून ठाकरे गटाचा प्लन सपसेल फसला आहे. डॉ. आलेगावकर यांनी सांगितलं की, महिला गरोदर नाही. तिच्या जीविताला कुठंही धोका नाही. फ्रॅक्चर नाही. याचा अर्थ त्या महिलेला जबरदस्ती एडमीट केलंय, असा आरोप नरेश म्हस्के यांनी केलाय.
अशी फसवेगिरी करू नका
उद्धव ठाकरे यांनी सपत्निक भेट दिली. मला सांगायचंय ठाकरे साहेब लोकांना किती फसवणार. विरोध करायचा असेल, तर कामातून करा. अशा पद्धतीने कुटनिती करून फसवेगिरी करू नका. सत्य हे सत्य असतं. आपण उघडे पडले आहात.
महिलेच्या खांद्यावर बंदूक ठेऊन कशाला बदनामी करता. मर्द आहात अशा घोषणा करतात. मर्द असाल तर तुम्ही रस्त्यावर या. महिलेला समोर ठेऊन अशी कृत्य करू नका. अशी कृत्य तुमच्या अंगलट येतील, असा इशाराही नरेश म्हस्के यांनी दिला.