शुभांगी पाटील यांच्या पाठिंब्यावरून काँग्रेस- महाविकास आघाडीत मतभेद? नाना पटोले-अजित पवार काय म्हणाले?

राष्ट्रवादी काँग्रेस नेते अजित पवार आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी यावर महत्त्वाची प्रतिक्रिया दिली आहे.

शुभांगी पाटील यांच्या पाठिंब्यावरून काँग्रेस- महाविकास आघाडीत मतभेद? नाना पटोले-अजित पवार काय म्हणाले?
अजित पवार Image Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Jan 17, 2023 | 12:55 PM

मुंबईः नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीतील चुरस दिवसेंदिवस वाढतच आहे. किंबहुन राज्याच्या राजकारणात सध्या ही निवडणूकच चर्चेच्या केंद्रस्थानी आली आहे. काँग्रेस नेते डॉ. सुधीर तांबे (Sudhir Tambe) यांनी ऐनवेळी दगाफटका केल्याने पक्ष श्रेष्ठींद्वारे त्यांच्यावर हकालपट्टीची कारवाई करण्यात आली. तर त्यांचे पुत्र सत्यजित तांबे (Satyajit Tambe) यांच्याविरोधातही कारवाई झाल्याचे संकेत आहेत. आता अपक्ष उमेदवार शुभांगी पाटील यांना ठाकरे (Thackeray) गटाने पाठिंबा दिल्याचे स्वतः पाटील यांनीच सांगितले आहे. पण महाविकास आघाडीचा शुभांगी पाटील यांना पाठिंबा मिळतोय का, याकडे सर्वांचं लक्ष आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस नेते अजित पवार आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी यावर महत्त्वाची प्रतिक्रिया दिली आहे. उद्या म्हणजेच बुधवारी महाविकास आघाडी यासंदर्भात अंतिम निर्णय घेणार आहे. नाशिक पदवीधर मतदार संघात कुणाला पाठइंबा द्यायचा यावरून महाविकास आघाडीतच मतभेद असल्याची जोरदार चर्चा आहे. त्यातही काँग्रेसच्या नेत्यांमध्येच मतभेद आहेत, असं संजय राऊत म्हणालेत.

यावरून नाना पटोले यांनी तिखट प्रतिक्रिया दिली. संजय राऊत हे काही काँग्रेसचे प्रवक्ते नाही. त्यामुळे त्यांनी यासंदर्भात दिलेली प्रतिक्रिया महत्त्वाची नाही. शुभांगी पाटील यांना पाठिंबा द्यायचा की नाही, यावर आम्ही उद्या निर्णय देऊ, असं नाना पटोले म्हणाले.

अजित पवार यांनीही यावर प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या सहकारी कारखान्यात निवडणूक असल्यामुळे ते बिझी आहेत. मात्र उद्या फोनच्या माध्यमातून आम्ही एकमेकांशी संपर्क साधणार आहोत. त्यानंतर महाविकास आघाडीचा पाठिंबा कुणाला आहे, हे ठरेल, असं अजित पवार म्हणाले.

डॉ. सत्यजित तांबे हे नाशिक पदवीधर मतदारसंघातून मागील तीन टर्म निवडून आले होते. त्यामुळे महाविकास आघाडीने एकमताने पुन्हा एकदा त्यांना उमेदवारी दिली होती. मात्र ऐनवेळी त्यांनी निर्णय बदलल्याने हा सगळा गोंधळ झाल्याचं अजित पवार म्हणाले.

नाशिक पदवीधर मतदारसंघात आतापर्यंत काय?

  • नाशिक पदवीधर मतदार संघात महाविकास आघाडीने डॉ. सुधीर तांबे यांना काँग्रेसच्या वतीने उमेदवारी जाहीर केली होती.
  •  मात्र ऐनवेळी डॉ. सुधीर तांबे यांनी उमेदवारी अर्ज भरण्याचा निर्णय रद्द केला. तर त्यांचे पुत्र सत्यजित तांबे यांनी अपक्ष म्हणून उमेदवार अर्ज भरला.
  •  सत्यजित तांबे यांना भाजपाचा पाठिंबा मिळणार असल्याची जोरदार चर्चा आहे. मात्र अद्याप यासंबंधीची अधिकृत घोषणा झालेली नाही.
  •  दरम्यान, काँग्रेसचा अधिकृत उमेदवार नसला तरीही ही निवडणूक बिनविरोध होऊ देणार नाही, असा पवित्रा शिवसेनेने घेतलाय.
  •  अपक्ष उमेदवार शुभांगी पाटील यांना शुभेच्छा देत त्यांना पाठिंबा देणार असल्याचं सूतोवाच केलं. शुभांगी पाटील यांनी यासंदर्भात प्रतिक्रिया दिली. ठाकरे गटाचा जाहीर पाठिंबा असला तरी महाविकास आघाडीचा त्यांना पाठिंबा मिळणार की नाही, यावर उद्या शिक्कामोर्तब होईल.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, राज-उद्धव ठाकरेंमध्ये काय संवाद?
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, राज-उद्धव ठाकरेंमध्ये काय संवाद?.
खातेवाटपानंतर 'मीच होणार पालकमंत्री', ठाणे, पुण्याचं पालकत्व कोणाकडे?
खातेवाटपानंतर 'मीच होणार पालकमंत्री', ठाणे, पुण्याचं पालकत्व कोणाकडे?.