Suhas Kande : नक्षलवाद्यांची धमकी असतानाही एकनाथ शिंदेंना संरक्षण नाकारलं, ‘वर्षा’वरून निघाले फर्मान; सुहास कांदेंचा उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप

तुमच्या पर्यटन खात्यातून मी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासाठी निधी मागितला. तो का नाही दिला? असा सवाल सुहास कांदे यांनी केला आहे

Suhas Kande : नक्षलवाद्यांची धमकी असतानाही एकनाथ शिंदेंना संरक्षण नाकारलं, 'वर्षा'वरून निघाले फर्मान; सुहास कांदेंचा उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप
Image Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Jul 22, 2022 | 11:20 AM

नाशिकः एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना नक्षलवाद्यांनी जीवे मारण्याची धमकी दिली होती. गुप्तचर यंत्रणांनीही तसे रिपोर्ट्स दिले होते. मात्र तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी शिंदेंना सिक्युरिटी दिली नाही. त्यांना झेड सिक्युरिटीची गरज असतानाही ठाकरेंनी ती नाकारली, असा गंभीर आरोप नाशिकचे शिंदे गटाचे बंडखोर आमदार सुहास कांदे (MLA Suhas Kande) यांनी केला आहे. आदित्य ठाकरे सध्या महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात ते नाशिकमध्येही येणार आहे. या पार्श्वभूमीवर सुहास कांदे यांनी आदित्य ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांना काही सवाल केले आहेत. पर्यटन खात्यातून नाशिकसाठी काही महत्त्वाचे प्रकल्प उभारण्यासाठी मी शेकडो पत्र पाठवल, मात्र आदित्य ठाकरे यांनी काहीही उत्तरे दिली नाहीत. तसेच एकनाथ शिंदे यांना सुरक्षा देण्याची गरज असनाताही ती वर्षा बंगल्यावरून नाकारण्यात आली. हिंदुत्ववाद्यांना सुरक्षा नाकारून हिंदुत्वविरोधी पक्षांच्या नेत्यांना सुरक्षा का देण्यात आली, असा सवाल सुहास कांदे यांनी केला.

‘वर्षा’ बंगल्यावरून फोन…

तत्कालिन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर आरोप करताना सुहास कांदे म्हणाले, ‘ एकनाथ शिंदेंनी बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या मार्गदर्शनात वयाच्या १८ व्या वर्षापासून राजकारण आणि समाजकारण सुरु केलं. त्यांना नक्षल्यांनी मारण्याची भूमिका दिला. त्यावेळी इंटेलिजन्स ब्युरो, एसआयटी, सीआयडी असेल.. यांनी गृहमंत्री आणि मुख्यमंत्र्याला रिपोर्ट केले. त्यानंतरसुद्धा एकनाथ शिंदेंची सिक्युरिटी वाढवली नाही. हिंदुत्व विरोधकांना सिक्युरिटी दिली. पण हिंदुत्ववाद्यांना दिली नाही. हे का घडलं? सकाळी साडे आठ वाजता शंभू राजेंना वर्षा बंगल्यावरून फोन आला. शिंदेंना सिक्युरिटी द्यायची नाही. हिंदुत्ववाद्यांना अशी सुरक्षा का नाकारण्यात आली, असा माझा सवाल असल्याचं सुहास कांदे म्हणाले.

हिंदुत्वविरोधकांच्या मांडीला मांडी का?

ठाकरेंना पुढचा प्रश्न विचारताना सुहास कांदे म्हणाले, ‘ ज्या याकुब मेमने बॉम्बस्फोट करून अनेक हिंदु मारले. अनेक जण अपंग झाले. प्रपंच उद्धव्स्त झाले. त्याला कायद्याने फाशीची शिक्षा सुनावली.. त्या फाशीवर अस्लम शेखच्या, नवाब मलिकच्या सह्या लेटर घेऊन त्याला फाशी देऊ नये, असं पत्र देण्यात आलं. दहशतवाद्यांबरोबर असणाऱ्यांच्या मांडीला मांडी लावून बसायचं का? रेल्वे बॉम्बस्फोट केलेल्या दाऊदचे आणि नवाब मलिकचे संबंध स्पष्ट झाले. मलिक यांचा राजीनामा घेतला नाही. त्याच्याबरोबर आम्ही का सत्तेत बसायचे का? पालघरमध्ये साधूंची हत्या झाली. त्यांचा दोन दिवसात जामीन मिळाला. शेवटी आम्हीही हिंदुत्ववादी आहोत. किती दिवस शांत बसायचं? उठाव करायचाच नाही का? बाळासाहेबांनी आम्हाला शिकवलंच नाही. ज्या दिवशी माझ्या पक्षाचा राष्ट्रवादी आणि काँग्रेस होईल, त्या दिवशी शिवसेना नावाचं दुकान मी बंद होईल… असं बाळासाहेब ठाकरे म्हणाले होते, अशी आठवणही सुहस कांदे यांनी करू दिली.

… तर मी राजीनामा देईन…

आदित्य ठाकरेंबद्दल आदर आहे. पण त्यांनी माझ्या विधानसभेच्या मतदारांसमोर काही प्रश्नांची उत्तरे द्यावीत. आदित्य ठाकरेंच्या पर्यटन खात्यातून मी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासाठी निधी मागितला. तो का नाही दिला? डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक उभारायचं होतं… होळकरांचं स्मारकही पर्यटनातून उभारायचं होतं. साडेसातशे पत्रांचं झेरॉक्स आहे. या पत्रांना एकही उत्तर मिळालं नाही.

आदित्य साहेबांना प्रश्न विचारायचेत..

तुमच्या पर्यटन खात्यातून मी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासाठी निधी मागितला. तो का नाही दिला? डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक उभारायचं होतं… होळकरांचं स्मारकही पर्यटनातून उभारायचं होतं. साडेसातशे पत्रांचं झेरॉक्स आहे. नांदगावमध्ये एकही पर्यटन खात्याचा प्रकल्प दाखवावा, मी राजीनामा देतो, असं आव्हान सुहास कांदे यांनी केलं आहे.

सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.