नाशिक स्थायी समितीची निवडणूक रंगतदार, सदस्यांची नव्याने नियुक्ती, मनसे किंगमेकर

तौलनिक संख्याबळानुसार स्थायी समिती सदस्य नियुक्ती करण्याच्या निर्णयाविरोधात शिवसेनेने उच्च न्यायालयात तक्रार केली होती. (Nashik Standing Committee Election MNS)

नाशिक स्थायी समितीची निवडणूक रंगतदार, सदस्यांची नव्याने नियुक्ती, मनसे किंगमेकर
शिवसेना, मनसे, भाजप
Follow us
| Updated on: Feb 24, 2021 | 12:54 PM

नाशिक : नाशिक महापालिकेत स्थायी समितीच्या सर्वच 16 सदस्यांची नव्याने नियुक्ती करण्यात येणार आहे. उच्च न्यायालयाच्या आदेशाची महापौरांकडून अंमलबजावणी करण्यात येणार आहे. स्थायी समितीची निवडणूक रंगतदार होणार असून मनसे किंगमेकरच्या भूमिकेत आहे. (Nashik Municipal Corporation Standing Committee Election MNS to become King Maker)

तौलनिक संख्याबळाच्या आधारे नाशिकच्या महापौरांनी स्थायी समितीचे सदस्य जाहीर केले. नाशिक महापालिकेत स्थायी समितीवर भाजपचे 8, शिवसेनेचे 5, काँग्रेसचा 1, राष्ट्रवादीचा 1, तर मनसेचा 1 सदस्य असेल. महाविकास आघाडी विरुद्ध भाजप सामना होणार असल्यामुळे मनसे स्थायी निवडणुकीत किंगमेकर ठरणार आहे.

काय आहे प्रकरण?

तौलनिक संख्याबळानुसार स्थायी समिती सदस्य नियुक्ती करण्याच्या निर्णयाविरोधात शिवसेनेने उच्च न्यायालयात तक्रार केली होती. हायकोर्टाने दिलेल्या आदेशानुसार तौलनिक संख्याबळानुसार शिवसेनेला एक जागा वाढवून देण्यात आली. यामुळे शिवसेनेची सदस्य संख्या एकाने वाढली आहे. सत्ताधारी भाजपला हायकोर्टाच्या निर्णयाचा मोठा धक्का बसला, तर शिवसेनेला एका जागेची लॉटरी लागली.

पोटनिवडणुकीत भाजपचा पराभव

नाशिक महापालिकेत भाजपचे सर्वाधिक नगरसेवक आहेत. मात्र नाशिक रोड प्रभागाच्या पोटनिवडणुकीत भाजपचा पराभव झाला होता. त्याशिवाय फुलेनगरच्या नगरसेविका शांताबाई हिरे यांच्या निधनामुळे भाजपचं संख्याबळही घटलं होतं.

महापौरांच्या निर्णयानंतर शिवसेना हायकोर्टात

तौलनिक संख्याबळाचा विचार करता स्थायी समितीत शिवसेनेचा एक सदस्य वाढला असल्याचा दावा केला जात होता. त्यातच महापौर सतीश कुलकर्णी यांनी गेल्या वर्षी स्थायी समितीवर भाजपच्या आठऐवजी नऊ सदस्यांची नियुक्ती केल्याचा दावा शिवसेनेने केला होता. यानंतर शिवसेना गटनेते विलास शिंदे आणि विरोधी पक्ष नेते अजय बोरस्ते यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती.

नाशिक महापालिकेची निवडणूक 2022 ला, मात्र सर्वपक्षीयांच्या तयारीला आतापासून सुरुवात

नाशिक महापालिकेची निवडणूक 2022 मध्ये होणार आहे. आणखी एक वर्षाहून अधिक काळ निवडणुकीसाठी शिल्लक आहे. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी नाशिक महापालिकेत शिवसेनेचा महापौर करण्यासाठी आतापासूनच जातीने लक्ष घालायला सुरुवात केली आहे. तर भाजप, राष्ट्रवादी यांच्याही बैठकांवर बैठका सुरु आहेत.

संबंधित बातम्या :

नाशकात सत्ताधारी भाजपला हायकोर्टाचा दणका, ‘स्थायी’त शिवसेनेच्या संख्याबळात वाढ

(Nashik Municipal Corporation Standing Committee Election MNS to become King Maker)

'लाडक्या बहिणीं'नो तुमच्यासाठी मोठी बातमी, डिसेंबरचा हफ्ता कधी मिळणार?
'लाडक्या बहिणीं'नो तुमच्यासाठी मोठी बातमी, डिसेंबरचा हफ्ता कधी मिळणार?.
अध्यक्ष महोदय बोट दुर्घटना तुमच्याच मतदारसंघातील, दादा असं का म्हणाले?
अध्यक्ष महोदय बोट दुर्घटना तुमच्याच मतदारसंघातील, दादा असं का म्हणाले?.
'बहुमत मिळाल्यानं गांगरून गेलेत', मनसे नेत्याची महायुतीवर सडकून टीका
'बहुमत मिळाल्यानं गांगरून गेलेत', मनसे नेत्याची महायुतीवर सडकून टीका.
...म्हणून भूजबळांना महायुतीच्या मंत्रिमंडळातून डावललं, कारणं आली समोर
...म्हणून भूजबळांना महायुतीच्या मंत्रिमंडळातून डावललं, कारणं आली समोर.
बोट अपघात 13 मृत्यू, मृतांच्या नातेवाईकांना सरकारकडून किती लाखांची मदत
बोट अपघात 13 मृत्यू, मृतांच्या नातेवाईकांना सरकारकडून किती लाखांची मदत.
'महिलांना 2100 रू. कधी देणार? लाडक्या बहिणी वाट बघताय, आता...'
'महिलांना 2100 रू. कधी देणार? लाडक्या बहिणी वाट बघताय, आता...'.
एलिफंटाला जाणारी बोट उलटली, समुद्रात काय झालं? अपघात नेमका कसा झाला?
एलिफंटाला जाणारी बोट उलटली, समुद्रात काय झालं? अपघात नेमका कसा झाला?.
आंबेडकरांबाबतच्या वक्तव्यावरून शाहांची कोंडी, अडकले वादाच्या भोवऱ्यात
आंबेडकरांबाबतच्या वक्तव्यावरून शाहांची कोंडी, अडकले वादाच्या भोवऱ्यात.
'फडणवीस तुम्हाला सरपंचाच्या...',देशमुखांच्या हत्येचे पडसाद विधानसभेत
'फडणवीस तुम्हाला सरपंचाच्या...',देशमुखांच्या हत्येचे पडसाद विधानसभेत.
गेट वेहून एलिफंटाला जाणारी बोट उलटली, बोटीत 35हून अधिक प्रवासी अन्...
गेट वेहून एलिफंटाला जाणारी बोट उलटली, बोटीत 35हून अधिक प्रवासी अन्....