16 आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय घेतला तेव्हा सभागृहात नेमकं काय झालं? नरहरी झिरवळ यांनी सविस्तर सांगितलं…
Maharashtra Political conflict : राज्याच्या सत्तासंघर्षावर उद्या निकाल; नरहरी झिरवळ म्हणतात...
नाशिक : राज्यातील सत्तासंघर्षाचा निकाल उद्या लागणार आहे, अशी माहिती सूत्रांकडून मिळत आहे. सरन्यायाधीश चंद्रचुड यांनी आज न्यायलयाच्या कामकाजावेळी हे संकेत दिले आहेत. यावर राष्ट्रवादीचे नेते आणि 16 आमदारांना अपात्र केलं गेलं तत्कालिन विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
नरहरी झिरवळ काय म्हणाले?
राज्यातील सत्तासंघर्षावर उद्या निकाल येणार आहे. हा महाराष्ट्रापुरता निर्णय नाही तर या निकालाचा संपूर्ण देशावर परिणाम होणार आहे, असं नरहरी झिरवळ म्हणालेत.
जेव्हा 16 आमदारांना अपात्र केलं गेलं तेव्हा मी कुठल्या आकसापोटी हा निर्णय घेतला नाही. तर कायद्याच्या आधारेच या आमदारांना अपात्र केलं. त्यामुळे मला अपेक्षा आहे की मी दिलेला निर्णय न्यायदेवता मान्य करेन, असं झिरवळ म्हणाले आहेत.
मी घेतलेला निर्णय योग्यच आहे. प्रक्रिया सुरू होताना नार्वेकर साहेब सभागृहात नव्हते. मी निर्णय दिला त्यावेळी नार्वेकर नव्हते. अजूनही मी त्या जागेवर आहे. त्यामुळे निर्णय माझ्याकडेच येणार आहेत. जो निर्णय दिलाय, तो मी दिलाय. त्यामुळे माझ्याकडेच निर्णय येईल, असं नरहरी झिरवळ म्हणाले आहेत.
अविश्वास दाखल झाल्यावर मान्य व्हावा लागतो. ना माझ्यावरचा अविश्वास मान्य झाला. त्यामुळे सुप्रीम कोर्ट सुप्रीम आहे. त्यावर कुणीच नाही. त्यामुळे सर्वोच्च न्यायालय काय निर्णय देतं ते पाहावं लागेल, असं नरहरी झिरवळ म्हणाले आहेत.
आदित्य ठाकरे यांची प्रतिक्रिया
सत्तासंघर्षाचा निकाल उद्या लागणार आहे, यावर आदित्य ठाकरे यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. उद्या निकाल लागणार आहे तर आता 24 तास थांबायला पाहिजे. आता निर्णय लवकर देणार आहे. एवढे महिने आपण थांबलेलो आहे. तर आणखी 24 तास थांबूयात. माझा न्यायदेवतेवर विश्वास आहे, असं आदित्य ठाकरे म्हणाले आहेत.
सत्तासंघर्षाचा निकाल लाईव्ह पाहता येणार
सत्तासंघर्षाच्या सुनावणीचं थेट प्रक्षेपण उद्या होणार आहे. सुप्रीम कोर्टाच्या यूट्यूब चॅनेलवरून थेट प्रक्षेपण होणार होणार आहे. सर्वोच्च न्यायलयातील कामकाज माध्यमांना थेट प्रक्षेपण दाखवता येणार आहे. सकाळी साडेदहा वाजल्यापासून थेट प्रक्षेपण सुरू होणार आहेत. दिल्ली सरकारविरुद्ध उपराज्यपाल खटला आणि महाराष्ट्र सत्ता संघर्ष खटला हे दोन्ही निकाल उद्या सुप्रीम कोर्ट देणार असल्याची माहिती आहे.