Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मामांनी भाच्याच्या भूमिकेला समर्थन दिले का? नगरमधील मामा-भाच्यांचा काय आहे राज?

देवेंद्र फडणवीस यांच्या वक्तव्यानंतर काय झाले. त्यानंतर महिन्याभरात नाशिक पदवीधर मतदारसंघाची निवडणूक लागली. उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी काँग्रेसने एबी फॉर्म सुधीर तांबे यांना दिला.

मामांनी भाच्याच्या भूमिकेला समर्थन दिले का? नगरमधील मामा-भाच्यांचा काय आहे राज?
सत्यजित तांबे, बाळासाहेब थोरात व देवेंद्र फडणवीस
Follow us
| Updated on: Feb 03, 2023 | 4:50 PM

मुंबई : बहुचर्चित नाशिक पदवीधर मतदारसंघाचा (Nashik Padvidhar Election Result)) निकाल अखेर जाहीर झालाय. या निवडणुकीत अपक्ष उमेदवार सत्यजित तांबे (Satyajeet Tambe) यांचा प्रचंड मतांनी विजय झालाय. या विजयात वाटा कोणाचा किती आहे? हे सर्व पडद्यामागे आहे. परंतु सत्यजित तांबे यांचे मामा काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात या संपुर्ण प्रकरणात मौन होते. त्यांचे हे मौनची खूप काही सांगून जाते. भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी बाळासाहेब असे नेते तुम्ही किती दिवस बाहेर ठेवणार? जास्त दिवस बाहेर ठेऊ नका, आमचा डोळा त्याच्यावर जातो, असे जाहीर कार्यक्रमात म्हणाले होते.

देवेंद्र फडणवीस यांच्या वक्तव्यानंतर काय झाले. त्या वक्तव्याच्या महिन्याभरानंतर नाशिक पदवीधर मतदारसंघाची निवडणूक लागली. विधान परिषदेसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी काँग्रेसने एबी फॉर्म सुधीर तांबे यांना दिला. परंतु त्यांनी पक्षाला टाळून मुलगा सत्यजित तांबे यांचा अपक्ष अर्ज दाखल केला. यासंदर्भात सत्यजित तांबे यांचे मामा ज्येष्ठ काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी बाळगलेले कडकडीत मौन खूप काही सांगून जाते. राजकारणातील अनेक अर्थ त्यातून आता निघत आहे. तांबे पिता-पुत्रांच्या भूमिकेला बाळासाहेबांनी अप्रत्यक्षरीत्या दिलेले समर्थनच होते, अशी चर्चा आहे.

हे सुद्धा वाचा

२०१४ मध्ये काय झाले

अहमदनगर दक्षिण मतदारसंघातून २०१४ च्या लोकसभा निवडणुकीमध्ये राजीव राजळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या तिकिटावर निवडणूक लढवले होते. ते देखील बाळासाहेब थोरात यांचे भाचे होते. काँग्रेस सोडून राष्ट्रवादीमध्ये जाण्याचा त्यांचा निर्णयदेखील धाडसी होता. परंतु तेव्हाही “मामा’ या नात्याने काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी मौनच बाळगले होते. “प्रत्येकाला स्वातंत्र्य आहे’ एवढेच उत्तर त्यांनी त्या वेळीही दिले होते.

ताबे यांच्या विजयानंतर फडणवीस म्हणाले

नाशिकमध्ये महाविकास आघाडीच्या तीनही पक्षांनी एकत्र येत तेथील युवा नेता सत्यजित तांबे यांना टार्गेट करण्याचा प्रयत्न केला होता. पण सत्यजित तांबे यांनी खूप चांगला लढा दिला. खूप चांगल्या मतांनी ते निवडून आले. त्यामुळे मी त्यांचंही अभिनंदन करतो, अशी प्रतिक्रिया देवेंद्र फडणवीस यांनी दिलीय.

आता फडणवीस यांची प्रतिक्रिया खूप काही सांगून जाते. एका अर्थाने सत्यजित तांबे काही दिवसांतच भाजपमध्ये दिसल्यास आश्चर्य कोणाला वाटणार नाही. परंतु बाळासाहेब थोरात यांची पत्ते उघडण्यासाठी २०२४ मध्ये होणाऱ्या लोकसभा किंवा विधानसभा निवडणुकीपर्यंत वाट पाहावी लागणार आहे.

कुणाल कामराला अटक पूर्व जमीन मंजूर, मद्रास हाय कोर्टाचा दिलासा
कुणाल कामराला अटक पूर्व जमीन मंजूर, मद्रास हाय कोर्टाचा दिलासा.
केवळ दशक नाही, तर लोकांचं आयुष्य बदललंय - पंतप्रधान नरेंद्र मोदी
केवळ दशक नाही, तर लोकांचं आयुष्य बदललंय - पंतप्रधान नरेंद्र मोदी.
बावनकुळे - राऊत यांच्यात जुंपली; वार पालटवाराचं शाब्दिक युद्धं
बावनकुळे - राऊत यांच्यात जुंपली; वार पालटवाराचं शाब्दिक युद्धं.
आमचं सरकार टॅक्सच्या पै पैचा सन्मान करतं - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आमचं सरकार टॅक्सच्या पै पैचा सन्मान करतं - पंतप्रधान नरेंद्र मोदी.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशाच्या प्रगतीचा घेतला आढावा
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशाच्या प्रगतीचा घेतला आढावा.
भारत जगातील एकमेव मेजर इकोनॉमी, मोदींनी देशाच्या प्रगतीचा घेतला आढावा
भारत जगातील एकमेव मेजर इकोनॉमी, मोदींनी देशाच्या प्रगतीचा घेतला आढावा.
न्यायालयाच्या आवारात कोरटकरवर शिव्यांची लाखोली
न्यायालयाच्या आवारात कोरटकरवर शिव्यांची लाखोली.
'तर हे कटाक्षाने पाळावं लागेल',ठाकरे गटाकडून 'तो' जुना व्हिडीओ व्हायरल
'तर हे कटाक्षाने पाळावं लागेल',ठाकरे गटाकडून 'तो' जुना व्हिडीओ व्हायरल.
३१ तारखेच्या आत पीक कर्ज भरा; अजितदादांच्या शेतकऱ्यांना सूचना
३१ तारखेच्या आत पीक कर्ज भरा; अजितदादांच्या शेतकऱ्यांना सूचना.
'आकाच्या सांगण्यावरून..',आरोपींच्या कबुलीनंतर धसांची पहिली प्रतिक्रिया
'आकाच्या सांगण्यावरून..',आरोपींच्या कबुलीनंतर धसांची पहिली प्रतिक्रिया.