राजा का बेटा राजा नही बनेगा… सत्यजित तांबेंना शुभांगी पाटलांचं आव्हान म्हणाल्या, काम करेल त्यालाच…

शिवसेनेने पाठिंबा दिलाय, त्याप्रमाणे महाविकास आघाडीनेही पाठिंबा दिला तर माझ्या कामाच्या बळावर मी राज्यातील पहिली महिला पदवीधर आमदार बनू शकते, अशी प्रतिक्रिया शुभांगी पाटील यांनी दिली.

राजा का बेटा राजा नही बनेगा... सत्यजित तांबेंना शुभांगी पाटलांचं आव्हान म्हणाल्या, काम करेल त्यालाच...
Image Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Jan 14, 2023 | 4:01 PM

मुंबईः अब राजा का बेटा राजी नही बनेगा… काम करेल त्यालाच जनता निवडून देईल, अशा शब्दात शुभांगी पाटील यांनी सत्यजित तांबे (Satyajit Tambe) यांना आव्हान दिलंय. नाशिक विधान परिषद (MLC) पदवीधर मतदार संघ निवडणुकीतून त्यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज भरला आहे. मात्र शिवसेना (Shivsena) ठाकरे गटाच्या वतीने त्या निवडणूक लढवतील, यावर शिक्कामोर्तब झालंय. लवकरच ठाकरे गटाच्या नेत्याकडून याविषयी अधिकृत घोषणा करण्यात येईल. निवडणूक अर्ज भरताना मला पक्षाच्या वतीने एबी फॉर्म मिळाला नव्हता. त्यामुळे मी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज भरल्याचं शुभांगी पाटील यांनी सांगितलं.

पहिल्या महिला पदवीधर आमदार बनायचंय…

शिवसेनेने पाठिंबा दिलाय, त्याप्रमाणे महाविकास आघाडीनेही पाठिंबा दिला तर माझ्या कामाच्या बळावर मी राज्यातील पहिली महिला पदवीधर आमदार बनू शकते, अशी प्रतिक्रिया शुभांगी पाटील यांनी दिली. पदवीधर उमेदवारांसाठी मी गेल्या अनेक वर्षांपासून लढा देतेय. तर 45 ते 50 हजार भावांना घेऊन मी आझाद मैदानावर 6 दिवस अन्न व जलत्याग आंदोलन केलंय. त्यामुळे माझ्या कामासाठी मला तरुण निवडून देतील, अशी प्रतिक्रिया शुभांगी पाटील यांनी दिली.

नाशिक पदवीधर मतदारसंघात आतापर्यंत काय?

  •  विधान परिषदेच्या नाशिक पदवीधर मतदार संघाच्या जागेसाठी येत्या ३० जानेवारी २०२३ रोजी निवडणूक होणार आहे.
  •  १२ जानेवारी रोजी या जागेकरिता उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस होता.
  • महाविकास आघाडीतर्फे काँग्रेसने डॉ. सुधीर तांबे यांना उमेदवार घोषित केलं होतं.
  •  मात्र ऐन वेळी सुधीर तांबे यांनी उमेदवारी मागे घेतली अन् त्यांचा मुलगा सत्यजित तांबे यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज भरला.
  •  दरम्यान, भाजपने कोणत्याही नेत्याला अधिकृत उमेदवारी दिली नव्हती.
  •  ऐनवेळी सत्यजित तांबे यांनी अपक्ष म्हणून उमेदवार अर्ज भरल्याने भाजप तांबेंना पाठिंबा देणार असल्याचं म्हटलं जातंय.
  •  तर ही निवडणूक बिनविरोध होऊ देणार नाही, असा इशारा देत शिवसेनेने येथील अपक्ष उमेदवार शुभांगी पाटील यांना अधिकृत पाठिंबा देण्याचे जाहीर केले आहे.
  •  आता नाशिक पदवीधरचा हा सामना ठाकरे गट समर्थित उमेदवार विरोधात भाजप समर्थित उमेदवार असा रंगण्याची शक्यता आहे.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, राज-उद्धव ठाकरेंमध्ये काय संवाद?
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, राज-उद्धव ठाकरेंमध्ये काय संवाद?.
खातेवाटपानंतर 'मीच होणार पालकमंत्री', ठाणे, पुण्याचं पालकत्व कोणाकडे?
खातेवाटपानंतर 'मीच होणार पालकमंत्री', ठाणे, पुण्याचं पालकत्व कोणाकडे?.
मराठी कुटुंबाला मारहाण, चिमुकलीसोबत अश्लील चाळे, विचारणा केली तर...
मराठी कुटुंबाला मारहाण, चिमुकलीसोबत अश्लील चाळे, विचारणा केली तर....
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?.
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्...
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्....
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?.
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र.
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला.
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद.