“बाळासाहेब आज असते तर त्यांनीही ‘अशा’ लोकांवर कारवाई केली असती”
Deepak Kesarkar on Mahavikas Aghadi : बाळासाहेब ठाकरे यांचं नाव घेत शिवसेनेच्या मंत्र्याचं विरोधकांवर टीकास्त्र; म्हणाले...
नवी दिल्ली : मंत्री दीपक केसरकर यांनी विरोधी पक्षातील नेत्यांवर टीका केली आहे. विरोधकांवर आणि विशेषत: शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्यांवर होणाऱ्या कारवाई संदर्भातही दीपक केसरकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच नाव घेत केसरकरांनी ठाकरे गटावर टीका केली आहे. मणिपूरमधील हिंसाचार, विरोधीपक्षांची बिहारमधील पटना इथे झालेली बैठक यावरही केसरकर यांनी भाष्य केलंय.
कोरोना काळातील कथित घोटाळ्या संदर्भात ईडी चौकशी करत आहे. लोक मृत्यूशी झुंज देत असताना पैसे कमावणं चुकीचं आहे. या मध्ये कोट्यावधी रूपयाचा घोटाळा झाला आहे. लाइफ लाईन कंपनीचा 65 टक्के स्टाफ होता. उपचारासाठी लोक तडफडून मरतात तेव्हा अशा प्रवृत्तीला महाराष्ट्रात थारा नाही. जे आज युवा नेतृत्व फिरत आहे. मराठीत म्हण आहे त्यात प्रेतावरची लोणी खाणं… यात पैसे आपण खाऊ शकत नाही आज ही बाळासाहेब असते तर अशा लोकांवर कारवाई केली असती, असं दीपक केसरकर म्हणाले.
या प्रकरणात मी उद्धव ठाकरे आणि उद्धव ठाकरे याचं नाव घेतलेलं नाही. तुम्हाला 5 वर्षे तुम्हाला मुख्यमंत्री केली असतं. तर तुम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांसोबत राहिले असता, असं केसरकर म्हणाले आहेत.
बीआरएस पक्षमहाराष्ट्रात पाय रोवत आहे. अशातच तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी पंकजा मुंडे यांना मुख्यमंत्रिपदाची ऑफर दिली आहे. पंकजा मुंडे बीआरएसमध्ये आल्यास त्यांना मुख्यमंत्रीपद देऊ, असं चंद्रशेखर राव म्हणाले आहेत. या सगळ्या घडामोडींची सध्या राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा होत आहे. यावर दीपक केसरकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. पंकजा मुंडे यांचं भाजपचं अतुट नात राहिले आहे. त्यांचा भाजपमध्ये योग्य मान राखला जाईल, असं दीपक केसरकर म्हणाले आहेत.
शरद पवार साहेबांसारख्या नेत्यांच्या अनुभवाची गरज आहे. त्यांनी उपस्थित राहिला हवं होतं, असं म्हणत केसरकरांनी बिहारच्या पटनामध्ये झालेल्या विरोधी पक्षाच्या बैठकीवर भाष्य केलंय.
मणिपूर जळतंय याची मला कल्पना आहे. मणिपूरच्या जखमेवर फुंकर घालणं गरजेचं आहे, असं दीपक केसरकर म्हणालेत. मंत्रिमंडळाचा विस्तार लवकरच होणार आहे, असंही ते म्हणालेत.
शिक्षण विभागाचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. नापास झालेल्या विद्यार्थ्यांना दोन महिन्यात पुन्हा संधी दिली जाईल. महाराष्ट्र कोणाला आंदण दिलेलं नाही, असं केसरकरांनी म्हटलं आहे.