PM Narendra Modi Birthday : जे कधीच घडलं नव्हतं ते नरेंद्र मोदी यांच्या पंतप्रधान होण्याने घडलं; ‘तो’ रेकॉर्ड तुम्हाला माहितीये का?

PM Narendra Modi Birthday : चारवेळा गुजरातचे मुख्यमंत्री असणारे नरेंद्र मोदी देशाचे पंतप्रधान झाले अन् इतिहास रचला गेला! नरेंद्र मोदी यांच्या पंतप्रधान होण्याने रेकॉर्ड झाला. तो रेकॉर्ड नेमका काय आहे? वाचा सविस्तर...

PM Narendra Modi Birthday : जे कधीच घडलं नव्हतं ते नरेंद्र मोदी यांच्या पंतप्रधान होण्याने घडलं; 'तो' रेकॉर्ड तुम्हाला माहितीये का?
Follow us
| Updated on: Sep 17, 2023 | 12:25 PM

नवी दिल्ली | 17 सप्टेंबर 2023 : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आज 73 वा वाढदिवस आहे. त्यानिमित्त सर्वच स्तरातून पंतप्रधान मोदी यांना शुभेच्छा दिल्या जात आहेत. ठिकठिकाणी कार्यक्रमांचं विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. नरेंद्र मोदी 2014 पासून देशाचे पंतप्रधान राहिले आहेत. त्यांच्या पंतप्रधानपदाच्या कारकीर्दीला आता नऊ वर्षे पूर्ण झाली आहेत. नरेंद्र मोदी पंतप्रधान व्हायच्या आधी चारवेळा ते गुजरातचे मुख्यमंत्री राहिले आहेत. नरेंद्र मोदी यांच्या पंतप्रधान होण्याने इतिहास रचला गेला आहे. तो इतिहास नेमका काय आहे? कोणता रेकॉर्ड रचला गेला? हे जाणून घेऊयात…

नरेंद्र मोदी यांचा जन्म 17 सितंबर 1950 ला झाला. गुजरातच्या वडनगरमधील एका सामान्य कुटुंबात जन्मलेले नरेंद्र मोदी पुढे जाऊन गुजरातचे मुख्यमंत्री अन् देशाचे पंतप्रधान त्यानंतर देशातील प्रभावशाली वेत् होतील. याची कल्पना कुणीही केली नसेल. नरेंद्र मोदी पंतप्रधान झाले अन् इतिहास रचला गेला. कारण 2014 पर्यंत देशाला जे पंतप्रधान लाभले ते देश स्वतंत्र होण्याच्या आधी जन्माला आले होते. नरेंद्र मोदी मात्र पहिले असे नेते आहेत. जे देश स्वतंत्र झाल्यानंतर जन्माला आले आणि ते देशाचे पंतप्रधान झाले.

नरेंद्र मोदी पंतप्रधान होण्याआधी गुजरातचे चारवेळा मुख्यमंत्री होते. 2001 ला नरेंद्र मोदी मुख्यमंत्री झाले. पुढे चारवेळा गुजरातचं मुख्यमंत्रिपद त्यांच्याकडे राहिलं. या काळात त्यांच्या नेतृत्वाची छाप पडली. भाजपमध्ये नरेंद्र मोदी यांना मानणारा मोठा वर्ग निर्माण झाला. पुढे त्यांच्या या नेतृत्वाची देशभर छाप पडली अन् नरेंद्र मोदी देशाचे पंतप्रधान झाले.

2014 ला नरेंद्र मोदी यांच्या वेगळं वलय प्राप्त झालं. त्यांच्या नेतृत्वात भाजपने निवडणुका जिंकल्या अन् देशात भाजपची सत्ता आली. यावेळी नरेंद्र मोदींना पंतप्रधान होण्याची संधी मिळाली. पुढे 2019 लाही भाजपला बहुमत मिळालं. मोदींच्या नेतृत्वाची छाप कायम आहे. पण येत्या निवडणुकीत काय होतं? भाजप पुन्हा सत्तेत येतं की जनता विरोधकांना संधी देतात, हे पाहणं महत्वाचं असेल.

लोकसभा-राज्यसभेत अमित शाह माफी मांगो अन् जयभीमच्या विरोधकांच्या घोषणा
लोकसभा-राज्यसभेत अमित शाह माफी मांगो अन् जयभीमच्या विरोधकांच्या घोषणा.
दादा नाराज भुजबळांनी मनधरणी करणार? अजितदादांसह 'हे' दोन नेते भेट घेणार
दादा नाराज भुजबळांनी मनधरणी करणार? अजितदादांसह 'हे' दोन नेते भेट घेणार.
'दादांची तब्येत बिघडते, अधून-मधून आवाज जातो मी त्यांना गोळी...'
'दादांची तब्येत बिघडते, अधून-मधून आवाज जातो मी त्यांना गोळी...'.
अजितदादा तिसऱ्या दिवशी विधिमंडळात प्रकटले? नॉटरिचेबल असण्याच कारण समोर
अजितदादा तिसऱ्या दिवशी विधिमंडळात प्रकटले? नॉटरिचेबल असण्याच कारण समोर.
'वन नेशन, वन इलेक्शन' रखडलं, सरकारच्या बाजूनं अन् विरोधात किती जण?
'वन नेशन, वन इलेक्शन' रखडलं, सरकारच्या बाजूनं अन् विरोधात किती जण?.
आधी अपहरण नंतर सरपंच संतोष देशमुखांची हत्या...मस्साजोगची A टू Z स्टोरी
आधी अपहरण नंतर सरपंच संतोष देशमुखांची हत्या...मस्साजोगची A टू Z स्टोरी.
मंत्रिमंडळ विस्तारात नाराजीरावांचा पूर, खातेवाटपाच्या वेळी काय होणार?
मंत्रिमंडळ विस्तारात नाराजीरावांचा पूर, खातेवाटपाच्या वेळी काय होणार?.
भुजबळांचं मंत्रिपद दादांनी मंत्रिपद नाकारलं? भुजबळ मोठा निर्णय घेणार?
भुजबळांचं मंत्रिपद दादांनी मंत्रिपद नाकारलं? भुजबळ मोठा निर्णय घेणार?.
ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर
ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर.
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला.