बोली लावून अधिकाऱ्यांची बदली सुरूये, शिंदे गटाच्या ‘या’ दोन मंत्र्याचा यात हात; संजय राऊत यांचे गंभीर आरोप

Sanjay Raut on Shinde Government Health Ministry : अधिकाऱ्यांची बदल्याचा लिलाव सुरू आहे. खासदार संजय राऊत यांचे शिंदे सरकारवर गंभीर आरोप. शिंदे गटाच्या 'या' दोन मंत्र्यावरही निशाणा.शासन आपल्यादारी कार्यक्रमातून लोकांना काय मिळतं? त्यांच्याच पक्षाचे सगळे दलाल आहेत, असा घणाघातही राऊतांनी केलाय.

बोली लावून अधिकाऱ्यांची बदली सुरूये, शिंदे गटाच्या 'या' दोन मंत्र्याचा यात हात; संजय राऊत यांचे गंभीर आरोप
Follow us
| Updated on: Dec 06, 2023 | 10:21 AM

प्रदिप कापसे, प्रतिनिधी – टीव्ही 9 मराठी, नवी दिल्ली | 06 डिसेंबर 2023 : ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी राज्याच्या आरोग्य खात्यात लाखोंचा भ्रष्टाचार सुरू असल्याचा आरोप केला आहे. आरोग्य विभागातील भ्रष्टाचार हा गंभीर विषय आहे. कारण गोरगरीब जनतेच्या जगण्याचा हा विषय आहे. यांनी पक्ष सोडला तो लुटमार करण्यासाठी अस वाटतं. कारण ठाकरे सरकारमध्ये अशी संधी नव्हती. ते बेकायदेशीर असले तरी मुख्यमंत्री आहे म्हणून मी पत्र लिहिलं आहे, असं संजय राऊत म्हणालेत. दिल्लीत माध्यमांशी बोलताना त्यांनी हे आरोप केलेत.

राऊतांचं मुख्यमंत्र्यांना पत्र

पुण्यातील ससूनमध्ये कारवाई केली तो लहान मोहोरा आहे. राज्यातील आरोग्य विषयाचा मुद्दा मी साडेतीन हजार पानाच्या पुराव्यासह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे पाठवला आहे. बदली आणि बढतीचे व्यवहार कसे होतात? ते सगळे पुरावे मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे दिले आहेत. बदल्यांचे पैसे गोळा करण्यासाठी OSD लेव्हल चे अधिकारी नेमले आहेत. ते पैसे कात्रजच्या कार्यालयात पोहचवले जातात… तिथं कोणाचं ऑफिस आहे हे आपल्याला माहीत आहे. मुख्यमंत्री कारवाई करणार आहेत का?, असा सवाल संजय राऊत यांनी केला आहे.

“… तर यापेक्षा मोठा स्फोट करेल”

आरोग्य खात्यातील भ्रष्टाचारासंदर्भात कोणाला अधिक पुरावे हवे असतील तर तुमचा अधिकारी पाठवा. मी आणखी पुरावे देतो. बदल्यांची औक्षण पद्धत काही दिवस आधी वनखात्यात होती. मी राज्यसभा सदस्य म्हणून पत्र लिहिलं आहे. जर मला याच उत्तर आलं नाही तर मी यापेक्षा मोठा स्फोट करेल, असा गर्भित इशारा संजय राऊत यांनी दिला आहे.

“या दोन मंत्र्यांचा हात”

आरोग्य खात्याच्या संचालक पदासाठी पैशांची मागणी केली जात आहे. भ्रष्टाचाराच्या माध्यमातून आरोग्य खात्यात 50 कोटी रुपये जमा केले गेलेत. विविध विभागाच्या अधिकाऱ्यांवर सध्या दबाव आहे. ललित पाटील प्रकरणात आरोग्यमंत्री तानाजी सावंत आणि दादा भुसे यांचा यात सहभाग आहे का?, असा सवाल राऊतांनी उपस्थित केलाय. या दोघांच्या सहभागाशिवाय या गोष्टी घडणार नाहीत, असं राऊत म्हणाले.

“आरोग्य खात्यात पदांचा लिलाव सुरू”

रेट काय आहेत ते मी पत्रात लिहिले आहेत. जनावरांचा बाजार भरल्यासारखं या पदांचा लिलाव सुरू आहे. देशाच्या आरोग्य मंत्री यांनाही या पत्राच्या प्रती पाठवल्या आहेत. बघूया कोणाचा दिवा आता या प्रकरणी पेटत आहे. ललित पाटील प्रकरणाची सविस्तर माहिती आमदार रवींद्र धंगेकर यांच्याकडे आहे. ते यावर सविस्तर भांडत आहेत. या प्रकरणाचीही कसून चौकशी व्हावी, असं राऊत यांनी म्हटलंय.

पिपाणी अन तुतारीच कन्फ्यूजन, शरद पवार गटाच्या 9 उमेदवारांचे बाजले बारा
पिपाणी अन तुतारीच कन्फ्यूजन, शरद पवार गटाच्या 9 उमेदवारांचे बाजले बारा.
आदित्य ठाकरेंचा शब्द अंतिम... उद्धव ठाकरेंकडून मोठी जबाबदारी
आदित्य ठाकरेंचा शब्द अंतिम... उद्धव ठाकरेंकडून मोठी जबाबदारी.
मनसे महायुतीत जाणार? पराभवानंतर नेत्यांची राज ठाकरेंच्या पुढे भूमिका
मनसे महायुतीत जाणार? पराभवानंतर नेत्यांची राज ठाकरेंच्या पुढे भूमिका.
'माझा पराभव हा कट, दोन्ही पवारांनी बळी घेतला', भाजप आमदाराचा हल्लाबोल
'माझा पराभव हा कट, दोन्ही पवारांनी बळी घेतला', भाजप आमदाराचा हल्लाबोल.
महायुतीतून कोण मंत्री? दादा-शिंदे गट अन् भाजपच्या 'या' नेत्यांची वर्णी
महायुतीतून कोण मंत्री? दादा-शिंदे गट अन् भाजपच्या 'या' नेत्यांची वर्णी.
फडणवीस नवे CM होणार? मुख्यमंत्रिपदासाठी नाव निश्चित? आजच शिक्कामोर्तब
फडणवीस नवे CM होणार? मुख्यमंत्रिपदासाठी नाव निश्चित? आजच शिक्कामोर्तब.
दारूण पराभवानंतर पटोले काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा?
दारूण पराभवानंतर पटोले काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा?.
मुख्यमंत्रिपदासाठी फडणवीसांना पाठिंबा, 'या' 5 अपक्ष आमदारांचीही पसंती
मुख्यमंत्रिपदासाठी फडणवीसांना पाठिंबा, 'या' 5 अपक्ष आमदारांचीही पसंती.
'बच गया... दर्शन घे काकांचं..', अजितदादांनी रोहित पवारांना लगावला टोला
'बच गया... दर्शन घे काकांचं..', अजितदादांनी रोहित पवारांना लगावला टोला.
मुख्यमंत्री कोण? आज होणार फैसला? महायुतीत दोन फॉर्म्युला निश्चित अन्..
मुख्यमंत्री कोण? आज होणार फैसला? महायुतीत दोन फॉर्म्युला निश्चित अन्...