शरद पवारांच्या प्रकृती स्वास्थ्यासाठी 11 रुद्राक्ष महापूजन, राष्ट्रवादी सेवादलाचे शिवशंकराला साकडे

शरद पवार लवकरात लवकर बरे व्हावेत आणि त्यांना दीर्घायुष्य लाभावे, यासाठी ही प्रार्थना करण्यात आली. (Navi Mumbai NCP Pooja Sharad Pawar)

शरद पवारांच्या प्रकृती स्वास्थ्यासाठी 11 रुद्राक्ष महापूजन, राष्ट्रवादी सेवादलाचे शिवशंकराला साकडे
शरद पवारांच्या प्रकृती स्वास्थ्यासाठी देवाला साकडे
Follow us
| Updated on: Apr 04, 2021 | 10:33 AM

नवी मुंबई : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्या प्रकृती स्वास्थ्यासाठी राष्ट्रवादी सेवादलाने देवाला साकडे घातेल. शरद पवारांच्या प्रकृतीत सुधारणा व्हावी यासाठी नवी मुंबईतील कामोठे परिसरात 11 रुद्राक्ष महापूजन आणि महामृत्युंजय जप करण्यात आला. कामोठ्यातील शिव मंदिरात या महापूजेचे आयोजन करण्यात आले. (Navi Mumbai NCP Seva Dal Pooja for Sharad Pawar Health)

शरद पवार लवकरात लवकर बरे व्हावेत आणि त्यांना दीर्घायुष्य लाभावे, यासाठी ही प्रार्थना करण्यात आली. कामोठ्यातील शिव मंदिरात या पूजेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पनवेल महापालिका क्षेत्रातील राष्ट्रवादी सेवादलाचे बरेच कार्यकर्ते जमा झाले होते. सोशल डिस्टन्सिंग आणि कोरोनासंबंधी नियमांचं पालन करत पूजेचे आयोजन करण्यात आले होते. शरद पवार लवकरात लवकर बरे व्हावे यासाठी राज्यभरात कार्यकर्ते देवाला साकडे घालत आहेत.

चार दिवसांनंतर शरद पवारांना डिस्चार्ज

शरद पवार यांना चार दिवसानंतर ब्रीच कँडी रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला. पोटदुखीचा त्रास झाल्यानंतर त्यांना 30 मार्च रोजी ब्रीच कँडीत दाखल करण्यात आले होते. त्याच दिवशी त्यांच्यावर शस्त्रक्रिया करून पित्ताशयातून खडा काढण्यात आला. त्यानंतर त्यांना डॉक्टरांच्या निगराणीखाली ठेवण्यात आले होते. अखेर, आराम वाटू लागल्याने शनिवारी त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. त्यानंतर पत्नी प्रतिभा पवार आणि कन्या सुप्रिया सुळे यांच्यासह ते सिल्व्हर ओकमधील निवासस्थानी परतले.

बंगल्याभोवतीच्या सुरक्षेत वाढ

डॉक्टरांनी पवारांना सात दिवस सक्तीने आराम करण्याचा सल्ला दिला आहे. त्यामुळे या सात दिवसात पवारांच्या निवासस्थानी कुणालाही प्रवेश दिला जाणार नाही. त्यासाठी बंगल्याभोवतीच्या सुरक्षेत वाढही करण्यात आली आहे. सात दिवस पवार घरीच आराम करणार असल्याचं सूत्रांनी सांगितलं.

पुन्हा शस्त्रक्रिया होणार

15 दिवसानंतर पवारांची पुन्हा एकदा तपासणी केली जाईल. त्यांची प्रकृती उत्तम असेल तर त्यांच्या गॉल ब्लॅडरच्या शस्त्रक्रियेचा निर्णय घेण्यात येणार आहे, असं राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी सांगितलं.

संबंधित बातम्या:

‘पवारसाहेबांच्या’ प्रकृतीसाठी कार्यकर्त्यांकडून देव पाण्यात, मुंबईत होमहवन, पुण्यात विठ्ठलपूजा

शस्त्रक्रियेनंतर सुप्रिया सुळेंनी ट्विट केला शरद पवारांचा फोटो, म्हणाल्या…

शरद पवारांच्या प्रकृतीविषयी विकृत फेसबुक पोस्ट, राष्ट्रवादीची सायबर पोलिसात तक्रार

(Navi Mumbai NCP Seva Dal Pooja for Sharad Pawar Health)

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.