AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

खासदार नवनीत राणा अडचणीत, जात प्रमाणपत्र रद्द! नवनीत राणांच्या वडिलांचं जात प्रमाणपत्रही अवैध?

उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठानं नवनीत राणा यांचं जात प्रमाणपत्र रद्द ठरवलं आहे.नवनीत राणा यांच्या वडिलांचंही जात प्रमाणपत्र अवैध ठरलं होतं, अशी माहिती समोर येत आहे.

खासदार नवनीत राणा अडचणीत, जात प्रमाणपत्र रद्द! नवनीत राणांच्या वडिलांचं जात प्रमाणपत्रही अवैध?
नवनीत राणा, खासदार, अमरावती
Follow us
| Updated on: Jun 08, 2021 | 8:23 PM

मुंबई : अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांची खासदारकी अडचणीत आली आहे. त्याचं कारण म्हणून उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठानं नवनीत राणा यांचं जात प्रमाणपत्र रद्द ठरवलं आहे. त्याबरोबर नवनीत राणा यांना 2 लाखाचा दंडही ठोठावण्यात आलाय. शिवसेनेचे नेते आणि माजी खासदार आनंदराव अडसूळ यांनी नवनीत राणा यांच्या विरोधात उच्च न्यायालयात धाव घेतली होती. दरम्यान, नवनीत राणा यांच्या वडिलांचंही जात प्रमाणपत्र अवैध ठरलं होतं, अशी माहिती समोर येत आहे. (Navneet Rana’s father Harbhajan Singh Kundles Caste certificate was also invalid)

खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांचा विवाह 2011 मध्ये झाला. त्यानंतर नवनीत राणा यांनी अनुसूचित जातीचं प्रमाणपत्र मिळवलं होतं. त्याविरोधात 2017 मध्ये शिवसेनेचे नेते आनंदराव अडसूळ यांनी याचिका दाखल केली होती. त्यानंतर न्यायालयाने त्यांचं जात प्रमाणपत्र पुन्हा पडताळणीसाठी पाठवलं होतं. या जात प्रमाणपत्राच्या आधारेच राणा यांनी 2019 मध्ये लोकसभा निवडणूक लढवली त्यात शिवसेनेच उमेदवार अडसूळ यांचा पराभव झाला. आता तेच प्रमाणपत्र उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने रद्द ठरवलं आहे.

यापूर्वीही नवनीत राणांचं जात प्रमाणपत्र रद्द!

नवनीत राणा यांनी 2014 मध्ये लोकसभा निवडणुकीदरम्यान सादर केलेलं जात प्रमाणपत्र बनावट असल्याचं सांगत मुंबई उच्च न्यायालयाने 4 वर्षांपूर्वी रद्द केलं होतं. त्यावेळी न्यायालयाने जी शाळा अस्तित्वातच नाही, त्या शाळेचा दाखला कसा दिला जातो आणि त्या आधारावर तयार झालेले जात प्रमाणपत्र ग्राह्य धरता येणार नाही, असं स्पष्ट केलं होतं.

नवनीत राणांच्या वडिलांच जात प्रमाणपत्रही अवैध

दरम्यान, नवनीत कौर-राणा यांचं जात प्रमाणपत्र वैध असल्याचा निर्णय उपनगर जिल्हा जात पडताळणी समितीनं दिला होता. त्यावेळी त्यंच्या वडिलांचं म्हणजे हरभजनसिंग कुंडलेस यांचं जात प्रमाणपत्र रद्द करुन ते जप्त करण्याचा निर्णयही या समितीनं दिला होता. त्याबाबत नवनीत राणा यांनी बनावट कागदपत्रांद्वारे जातवैधता प्रमाणपत्र मिळवून लोकसभा निवडणूक लढवली होती. या तक्रारींवर संयुक्तपणे तीन सदस्यीय समितीने सुनावणी घेतली होती. या समितीनं नवनीत राणा यांचे वडील हरभजनसिंग कुंडलेस यांचं मोची या अनुसूचित जातीचं प्रमाणपत्र रद्द करत जप्त करण्याचा निर्णय घेतला होता. नवनीत राणा यांचं जातप्रमाणपत्र वैध तर त्यांच्या वडिलांचं अवैध कसं? असा प्रश्न विचारत या दोन्ही निर्णयांविरोधात दाद मागण्यात येईल, असं सांगत याचिकाकर्त्यांनी आव्हान दिलं होतं.

नवनीत राणांच्या प्रतिज्ञापत्रात काय?  

नवनीत राणा यांनी 2019 मध्ये निवडणूक आयोगाला सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात वडिलांच्या नावचं जात प्रमाणपत्र जोडलं होतं.  त्यानुसार अनुसूचित जातीचं प्रमाणपत्र त्यांनी जोडलं. त्यावर त्यांचं नाव नवनीतकौर हरभजनसिंग कुंदेल्स असं आहे.  त्यासोबोत 26/08/2013 रोजी अॅफेडेव्हिट केलेला शाळा सोडल्याच्या दाखल/बोनाफाईड जोडला आहे.

यासोबत नवनीत राणा यांचा पत्ता मुंबईतील घाटकोपर इथला असल्याचं नमूद असून, हे जात प्रमाणपत्र 30 ऑगस्ट 2013 रोजी जारी करण्यात आलं होतं.

सर्वोच्च न्यायालयात धाव घेणार 

दरम्यान, जात प्रमाणपत्र रद्द झाल्यामुळे नवनीत राणा आता सुप्रीम कोर्टात धाव घेणार आहेत. तिथं काय होतं, यावर त्यांच्या खासदारकीचं भवितव्य ठरणार आहे.मात्र जर खासदारकी रद्द झालीच, तर महाविकासआघाडी सरकारमुळे अमरावतीच्या लोकसभेची समीकरणं सुद्धा बदलण्याची शक्यता नाकारता येत नाही.

नवनीत राणा नेमक्या कोण आहेत?

नवनीत राणांचं लग्नाआधीचं नाव नवनीत कौर आहे

त्या मूळ पंजाबच्या असल्याचं सांगितलं जातं

राजकारणाआधी नवनीत राणांची ओळख अभिनेत्री म्हणून होती

तेलुगू, पंजाबी, हिंदी आणि मल्याळम चित्रपटसृष्टीत त्यांनी काम केलंय

2011 साली त्यांचं लग्न अमरावतीतल्या बाडनेरचे आमदार रवी राणांशी झालं

त्यानंतर अभिनय सोडून नवनीत राणा सुद्धा राजकारणात सक्रीय झाल्या

संबंधित बातम्या :

हरभजन सिंग यांची मुलगी, रवी राणांची बायको, नवनीत राणांच्या सर्टिफिकेटवर जात कोणती?

मुख्यमंत्री लायक असते तर इथं येण्याची गरज नव्हती, नवनीत राणा राजधानीत कडाडल्या

Navneet Rana’s father Harbhajan Singh Kundles Caste certificate was also invalid

युद्धाची धास्ती अन् भेदरलेल्या पाकिस्तानने आता कोणापुढं पसरले हात?
युद्धाची धास्ती अन् भेदरलेल्या पाकिस्तानने आता कोणापुढं पसरले हात?.
हाफीज सईदला लादेनसारखा मारा अन्.... अमेरिकेचा भारताला ग्रीन सिग्नल
हाफीज सईदला लादेनसारखा मारा अन्.... अमेरिकेचा भारताला ग्रीन सिग्नल.
पंतप्रधानांचा चेहरा पाहता असं वाटतं.... संजय राऊतांचा मोदींवर हल्लाबोल
पंतप्रधानांचा चेहरा पाहता असं वाटतं.... संजय राऊतांचा मोदींवर हल्लाबोल.
पश्चिम रेल्वेने प्रवास करताय?आज 4 तास मेगाब्लॉक, कोणत्या वेळात असणार?
पश्चिम रेल्वेने प्रवास करताय?आज 4 तास मेगाब्लॉक, कोणत्या वेळात असणार?.
मुंबईकरांनो.... या रविवारी लोकलने बिनधास्त फिरा, कारण मध्य रेल्वेवर...
मुंबईकरांनो.... या रविवारी लोकलने बिनधास्त फिरा, कारण मध्य रेल्वेवर....
लाडक्या बहिणींनो... 2100 रूपये मिळणार पण...उदय सामंत बघा काय म्हणाले?
लाडक्या बहिणींनो... 2100 रूपये मिळणार पण...उदय सामंत बघा काय म्हणाले?.
गंगा एक्सप्रेसवेवर हवाई दलाच्या एअरशोमध्ये राफेल-जॅग्वारचा दिसला स्वॅग
गंगा एक्सप्रेसवेवर हवाई दलाच्या एअरशोमध्ये राफेल-जॅग्वारचा दिसला स्वॅग.
इमरान खान जेलमधून सुटणार? 34 लाख ट्विट्स अन् समर्थकांकडून एकच मागणी
इमरान खान जेलमधून सुटणार? 34 लाख ट्विट्स अन् समर्थकांकडून एकच मागणी.
पाकचे लष्करप्रमुख असिम मुनीर राजीनामा देणार? कोणाकडून होतेय मागणी?
पाकचे लष्करप्रमुख असिम मुनीर राजीनामा देणार? कोणाकडून होतेय मागणी?.
भारताचा डिजिटल स्ट्राईक; पाकला दाखवली जागा, भल्या-भल्यांना भारतात बॅन
भारताचा डिजिटल स्ट्राईक; पाकला दाखवली जागा, भल्या-भल्यांना भारतात बॅन.