Navneet Rana : नव्या सरकारचा गतिमान कारभार, मेळघाटातल्या दुर्घटनेतील पीडीतांच्या कुटुंबियांना तात्काळ मदत; नवनीत राणांनी मानले आभार

या घटनेची माहिती मिळताच खासदार नवनीत रवी राणा यांनी तात्काळ पाचडोंगरी, कोयलारी, चुरणी, काटकुंभ आदी भागाचा दौरा करून नागरिकांची भेट घेतली होती. लगेच मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांना पत्र पाठवून या कुटुंबियांना आर्थिक मदत करण्याची मागणी केली होती.

Navneet Rana : नव्या सरकारचा गतिमान कारभार, मेळघाटातल्या दुर्घटनेतील पीडीतांच्या कुटुंबियांना तात्काळ मदत; नवनीत राणांनी मानले आभार
नवनीत राणांनी मानले आभारImage Credit source: twitter
Follow us
| Updated on: Jul 10, 2022 | 2:20 PM

अमरावती : सहृदयी शासन-गतिमान प्रशासन,नव्याने स्थापित झालेल्या शिंदे-फडणवीस सरकारच्या लोकाभिमुख कार्यक्षमतेचा अमरावती जिल्हा वासीयांना प्रत्यय खासदार सौ नवनीत रवी राणा (Navneet Rana) यांनी केलेल्या मागणीला मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे (Eknath Shinde) व उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस (Devendra Fadanvis) यांच्या तात्काळ सकारात्मक प्रतिसाद दिला. मेळघाट मधील दूषित पाणी पिऊन मृत्युमुखी पडलेल्या दुर्दैवी नागरिकांच्या कुटुंबियांना तातडीने 25 लाखाच्या आर्थिक मदतीची मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचेकडे करणाऱ्या खासदार सौ नवनीत रवी राणा यांच्या तत्परतेला मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांचा तात्काळ प्रतिसाद मिळाला आहे.

प्रत्येक कुटुंबाला 5 लाखाची मदत देण्याचं जाहीर

सध्याचा नव्या मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी तातडीने प्रत्येक कुटुंबाला 5 लाखाची मदत देण्याचं जाहीर केलं आहे. तसेच जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत प्राप्त 20 लाख रुपयांचा चेक खासदार नवनीत रवी राणा यांनी चिखलदरा प्रभारी तहसीलदार श्री राजगडे यांना दिला आहे. दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेले गंगाराम नंदराम ढीकार,सविता सहदेव अखंडे, मोनिया रंगीसा उईके, सुखलाल मोतीराम जामुनकर यांच्या कुटुंबियांना प्रत्येकी 5 लक्ष रुपयांची ही शासकीय आर्थिक सानुग्रह मदत चिखलदरा तहसील कार्यालयामार्फत देण्यात येणार आहे.

हे सुद्धा वाचा

नवनीत राणा यांच्याकडून नव्या सरकारचे आभार

या घटनेची माहिती मिळताच खासदार नवनीत रवी राणा यांनी तात्काळ पाचडोंगरी, कोयलारी, चुरणी, काटकुंभ आदी भागाचा दौरा करून नागरिकांची भेट घेतली होती. लगेच मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांना पत्र पाठवून या कुटुंबियांना आर्थिक मदत करण्याची मागणी केली होती. कागदी घोडे न नाचविता आणि या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन मुख्यमंत्री श्री एकनाथरावजी शिंदे व उपमुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस यांनी या मागणीला सकारात्मक प्रतिसाद दिला. कुटुंबियांना मानवतेच्या दृष्टीकोनातून प्रत्येक 5 लक्ष रुपयांच्या मदतीचा हात दिला याबद्द्ल मेलघटवासीयांच्या वतीने खासदार सौ नवनीत रवी राणा यांनी शासन व प्रशासनाचे आभार मानले आहे. यावेळी मेळघाट संपर्क प्रमुख उपेन बचले,चिखलदरा तालुकाध्यक्ष राजेश वर्मा,विनोद जायलवाल,मंगेश कोकाटे,सचिन सोनोने,अजय बोबडे,राहुल काळे,अनिल शेळके आदी उपस्थित होते.

'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.