Navneet Rana : नवनीत राणा यांनी खासदार विकास निधीतला किती निधी खर्च केला? संपूर्ण आकडेवारी
महाराष्ट्रातील (Maharashtra) खासदार (MP) विकास निधी म्हणून मंजूर झालेला पैसा खर्च करण्यात मागे पडत असल्याचे समोर आले आहे. आतापर्यंत विकास निधीसाठी मंजूर झालेल्या एकूण रकमेपैकी केवळ 45.38 टक्केच निधी खर्च करण्यात आला आहे.
मुंबई : महाराष्ट्रातील (Maharashtra) खासदार (MP) विकास निधी म्हणून मंजूर झालेला पैसा खर्च करण्यात मागे पडत असल्याचे समोर आले आहे. आतापर्यंत विकास निधीसाठी मंजूर झालेल्या एकूण रकमेपैकी केवळ 45.38 टक्केच निधी खर्च करण्यात आला आहे. निधी खर्च करण्याच्या बाबतीत जळगावचे भाजप आमदार उन्मेष पाटील यांनी अव्वल नंबर पटकावला असून, त्यांनी मंजूर झालेल्या पाच कोटींपैकी 4.96 कोटी रुपये खर्च केले आहेत. तर दुसरीकडे बीडच्या भाजप खासदार प्रीतम मुंडे (Pritam Munde) या मात्र या यादीत सर्वात शेवटी आहेत. त्यांनी मंजूर झालेल्या अडीच कोटींमधील एक रुपयाही खर्च केले नसल्याचे समोर आले आहे. सध्या खासदार नवनीत राणा यांचे नाव चांगलेच चर्चेमध्ये आहे. नवनीत राणा यांनी आपल्या मतदारसंघासाठी मंजूर झालेल्या विकास निधीतील एकूण 51.77 टक्के निधी खर्च केला आहे. राणा यांना 7 कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला होता. त्यापैकी त्यांनी 3.76 कोटी रुपयांचा निधी खर्च केला आहे.
सर्वात कमी निधी खर्च केलेले खासदार
या यादीत प्रथम क्रमांक लागतो, तो म्हणजे बीडच्या खासदार प्रीतम मुंडे यांचा त्यांना एकूण अडिच कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला होता. मात्र या निधीमधील एकही रुपाय प्रितम मुंडे यांनी खर्च केलेला नाही. त्यानंतर दुसरा क्रमांक लागतो तो सोलापूरचे भाजप खासदार जयसिद्धेशवर महाराज यांचा. त्यांना 5 कोटी 50 लाख मंजूर झाला होता. त्यापैकी त्यांनी फक्त 50 लाख रुपये खर्च केले आहेत. तर सांगलीचे खासदार संजय पाटील यांना एकूण पाच कोटी 39 लाखांचा निधी मंजूर झाला होता. यातील त्यांनी फक्त 39 लाख रुपयेच खर्च केले आहेत.
नवनीत राणांची कामगिरी
सध्या नवनीत राणा या ना त्या कारणाने चर्चेत आहेत. सतत चर्चेत असलेल्या राणांचे आपल्या मतदार संघाकडे किती लक्ष आहे? त्यांनी आपल्या लोकसभा मतदारसंघासाठी मंजूर झालेल्या निधीपैकी किती निधी खर्च केला याची उत्सुकता नसेल तर नवल. नवनीत राणा यांच्या मतदारसंघासाठी एकूण 7 कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला होता. त्यापैकी त्यांनी 3.76 कोटी रुपयांचा निधी खर्च केला आहे. निधी खर्च करण्याचे प्रमाण 51.77 टक्के एवढे आहे.