Navneet Rana : माझी विचारांची लढाई मी लढत राहणार, नवनीत राणा, रवी राणा-राऊत भेटीचा क्लायमॅक्स

काही दिवसांपूर्वीच नवनीत राणा संजय राऊतांना पोपट म्हणत होत्या तर संजय राऊत नवनीत राणा आणि रवी राणा यांना बंटी बबली म्हणत होते. मग खासदार नवनीत राणा दिल्लीत आल्यावर या दौऱ्याबाबत आणि राऊतांच्या भेटीबाबत नवनीत राणा यांना प्रश्न विचारण्यात आले.

Navneet Rana : माझी विचारांची लढाई मी लढत राहणार, नवनीत राणा, रवी राणा-राऊत भेटीचा क्लायमॅक्स
माझी विचारांची लढाई मी लढत राहणार, नवनीत राणा, रवी राणा-राऊत भेटीचा क्लायमॅक्सImage Credit source: tv9
Follow us
| Updated on: May 20, 2022 | 3:39 PM

नवी दिल्ली : गेल्या दोन दिवसांपासून राज्यात काही खास फोटोंची चर्चा होती. हे फोटो साधेसुधे नव्हते तर हे फोटो अमरावतीच्या खासदार नवनीत राणा (Naveet Rana), आमदार रवी राणा आणि शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या लडाखमधील (Ladakh Tour) भेटीचे होते. या दौऱ्यात संजय राऊत (Sanjay Raut) आणि रवी राणा एकत्र नाष्टा करताना, एकत्र गप्पा मारताना, फिरताना दिसून आले. राज्यात काही दिवसांपूर्वी एकमेंकांवर तुटून पडणारे नेते असे भेटल्याने चर्चेला उधाण आले होते. कारण काही दिवसांपूर्वीच नवनीत राणा संजय राऊतांना पोपट म्हणत होत्या तर संजय राऊत नवनीत राणा आणि रवी राणा यांना बंटी बबली म्हणत होते. मग खासदार नवनीत राणा दिल्लीत आल्यावर या दौऱ्याबाबत आणि राऊतांच्या भेटीबाबत नवनीत राणा यांना प्रश्न विचारण्यात आले. त्यावेळी खासदार नवनीत राणा यांनी ही विचारांची लढाई आहे. ती विचारांनी लढत राहणार असे सावध उत्तर दिले.

गल्लीत गोंधळ, लडाखमध्ये पार्टी

मी जेलमध्ये गेले संजय राऊत नाही

नवनीत राणा म्हणाल्या, मला वाटतं माझी लढाई हे माझे विचार आहेत. ते महाराष्ट्राच्या विकासासाठी आहेत. ते तिथे आले आहेत म्हणून मी गेले नसते तर मी माझ्या कामाशी अन्याय केल्यासारखं झालं असतं. माझा समजुतदारपणा मोठा आहे. त्याप्रमाणे मी त्यांच्याशी वागले. त्यांच्यावर काही अन्याय नाही झाला अन्याय तर माझ्यावर झाला आहे. तरी मी माझं कर्तव्य पूर्ण केलं. माझी विचारांची लढाई संपलेली नाही. ते महाराष्ट्राच्या हिताचे काम करत नाहीत . त्याविरोधात मी लढत राहणार आहे. तसेच मी त्यांच्याबद्दल जे काही बोलले आहे, त्यावर मी आजही कायम आहे. त्यांनी माझ्या मुलांशी त्यांनी संवाद साधला, असेही त्यांनी सांगितले.

हे सुद्धा वाचा

लडाखमधील फोटोंची चर्चा

राऊतांकडे काही उत्तर नव्हतं

तसेच 23 तारखेला संसदीय समितीपुढे आम्ही जाणार आहोत. माझ्यासोबत महाराष्ट्रात जे घडलं, जो अन्याय झाला. त्याच्याविरोधात मी जाऊन माझा हक्क बजावणार आहे. जे माझ्या विरोधात बोलते त्याच्या सर्वांबाबत मी साक्ष देणार आहे. संजय राऊतांसमोर मला एका मुलीने विचारलं की मुलींना पुढे का येऊ दिलं जात नाही. त्यावेळी मी बोलले की मी आली आहे जेलमध्ये जाऊन, मला जेलमध्ये टाकणारे लोक इथेच बसले आहेत. त्यावर संजय राऊतांकडे काहीच उत्तर नव्हतं. ते फक्त हसले, असेही नवनीत राणा यांनी सांगितले.

रवी राणा काय म्हणाले?

मुख्यमंत्र्यांनी वारंवार हनुमान चालीसाचा अपमान करणे, संजय राऊतांनी बेताल वक्तव्यं करणे, याबाबत मीही त्यांना विचारलं होतं की आम्ही कोणता गुन्हा केला होता की आम्हाला जेलमध्ये टाकण्यात आलं. त्यावर संजय राऊतांकडे काही उत्तर नव्हतं. आपल्या राज्यातली कोणती व्यक्ती बाहेर भेटल्यावर आम्ही संस्कृती जपण्याचं काम केलं.

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.