Navneet Rana : राणा दाम्पत्य आणि भीम ब्रिगेड आमनेसामने, हनुमान चालीस नको संविधान पठण करा, अमरावतीत तुफान राडा

बाबासाहेबांच्या पुतळ्याजवल हनुमान चालीसा पठण नको, तर याठिकाणी संविधानचे पठण करावे अशी मागणी भीम आर्मीकडून करण्यात आली होती. यावरूनच हा वाद सुरू झाला.

Navneet Rana : राणा दाम्पत्य आणि भीम ब्रिगेड आमनेसामने, हनुमान चालीस नको संविधान पठण करा, अमरावतीत तुफान राडा
राणा दाम्पत्य आणि भीम आर्मी आमनेसामने, हनुमान चालीस नको संविधान पठण करा, अमरावतीत तुफान राडाImage Credit source: tv9
Follow us
| Updated on: May 28, 2022 | 8:40 PM

अमरावती : आज बऱ्यात दिवसांनी नवनीत राणा (Navneet Rana) आणि रवी राणा हे अमरावतीत पोहोचले. यावेळी राणा यांच्या कार्यकर्त्यांनी त्यांचे जल्लोषात स्वागत केले, त्यांची भव्य मिरवणूक काढली. मात्र भीम ब्रिगेडचे (Bhim Army) कार्यकर्ते आणि राणा हे आमनेसामने आल्याचे पाहायला मिळाले. हनुमान चालीसा (Hanuman Chalisa) पठणाला हे तरुण विरोध करताना दिसून आले. त्यामुळे काही काळ अमरावतीत राडा झाल्याचे दिसून आले. त्यानंतर भीम ब्रिगेडच्या काही कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. बाबासाहेबांच्या पुतळ्याजवल हनुमान चालीसा पठण नको, तर याठिकाणी संविधानचे पठण करावे अशी मागणी भीम ब्रिगेडकडून करण्यात आली होती. यावरूनच हा वाद सुरू झाला. गेल्या अनेक दिवसांपासून हनुमान चालीसा पठणावरून नवनीत राणा आणि रवी राणा हे वादात आहेत. आम्हाला त्यांच्याच कार्यकर्त्यांनी सांगितलं होतं की राणा याठिकाणी हनुमान चालीसा पठण करणार आहेत. त्यामुळे आम्ही याठिकाणी आलो असे भीम ब्रिगेडकडून यावेळी सांगण्यात आलं आहे.

राड्याचा व्हिडिओ

आंबेडकरांचे विचार घेऊन आम्ही मोठे झालो

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचार सोबत घेऊनच आम्ही लहानाचे मोठे झालो. ज्या संविधानाच्या हक्काच्या आधारे आम्ही संसदेत भांडतो. तो हक्क फक्त बाबासाहेब आंबेडकरांनी दिला आहे. बाबासाहेबांचं नाव घेतात ते याठिकाणी येतात आणि माथा टेकतात अशी प्रतिक्रिया या राड्यानंतर नवनीत राणा यांनी दिली. तसेच संविधानचा अधिकार देणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यासाठी आम्ही याठिकाणी आलो आहोत. हनुमान चालीसा पठणानंतर आम्ही जेलमध्ये गेलो मात्र याच संविधानतील अधिकारांमुळे आम्ही बाहेर आलो. अन्यथा जेलमध्ये सडलो असतो, अशी प्रतिक्रिया रवी राणा यांनी दिली. तर जय बाबासाहेब, जय संविधान, अशा घोषणा देत त्यांनी भीम ब्रिगेडलाही उत्तर दिलंय. यावेळी त्यांनी सरकारवरही जोरदार टीका केली आहे.

राड्यानंतर राणा दाम्पत्याची प्रतिक्रिया

हे सुद्धा वाचा

दिल्लीतून परतल्यावरही हनुमान चालीसा

दिल्लीतून परतल्यावर थेट नागपूर विमानतळावरून राणा दाम्पत्य एका हे एका मंदिरात पोहोचलं. आणि त्या ठिकाणीही त्यांनी हनुमान चालीसा पठण केलं. तर राज्यावरचा शनी दूर व्हावा अशी प्रार्थनाही त्यांनी यावेळी  केली. तसेच राज्य सरकारवर पुन्हा जोरदार निशाणा साधला. मात्र आता याचवरून अमरावतीत राडा झाल्याने पुन्हा काही काळ तणाव निर्माण झाला आहे. आता पोलीस या प्रकरणात भीम ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांवर काय कारवाई करतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. सध्या तरी अमरावतीत या घटनेवरून जोरदार राजकारण रंगताना पहायला मिळत आहे.

ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?.
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...