AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

खासदारकीला धोका नाही, जातवैधता प्रमाणपत्र अवैध ठरल्यानंतरही नवनीत राणांना विश्वास

उच्च न्यायालयाच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देणार असल्याचं नवनीत राणा याांनी सांगितलं. इतकंच नाही तर आपल्या खासदारकीला काही धोका होणार नसल्याचा दावाही यांनी केलाय.

खासदारकीला धोका नाही, जातवैधता प्रमाणपत्र अवैध ठरल्यानंतरही नवनीत राणांना विश्वास
खासदार नवनीत राणा, अमरावती
Follow us
| Updated on: Jun 08, 2021 | 10:31 PM

मुंबई : अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांची खासदारकी अडचणीत येण्याची शक्यता आहे. कारण, उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने नवनीत राणा यांचं जात प्रमाणपत्र रद्द ठरवलं आहे. त्याचबरोबर नवनीत राणा यांना दोन लाखाचा दंडही ठोठावण्यात आलाय. त्याबाबत नवनीत राणा यांनी आपण उच्च न्यायालयाच्या आदेशाचा पूर्ण आदर करतो. पण उच्च न्यायालयाच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देणार असल्याचं त्यांनी सांगितलं. इतकंच नाही तर आपल्या खासदारकीला काही धोका होणार नसल्याचा दावाही यांनी माध्यमांशी बोलताना केलाय. (Navneet Rana’s caste validity certificate canceled, she claims that there is no threat to MP)

गेल्या आठ वर्षांपासून अमरावती जिल्हयातील नागरिकांच्या सेवेत आपण अविरतपणे झटत असून खासदार म्हणून गेल्या 2 वर्षात आपण आपल्या जिल्ह्याचे, शेतकरी शेतमजूर,गोरगरीब, व्यापारी व महिला-विद्यार्थी यांच्या हिताचे अनेक प्रश्न लोकसभेत पोटतिडकीने मांडले. कोरोनाकाळात आपण जिल्ह्यांतील लाखो लोकांची अहोरात्र सेवा केली.

सत्याचाच विजय होईल – नवनीत राणा

अनेकांना मदतीचा हात दिला, अमरावती जिल्ह्याच्या विकासात शून्य योगदान असणारे माजी खासदार आनंदराव अडसूळ यांनी जिल्ह्याच्या विकासाच्या आड येऊन एक महिला म्हणून मला त्रास देण्याचे, जिल्ह्याच्या विकासाला बाधा आणण्याचे व माझे खच्चीकरण करण्याचे काम केले असून हे एक राजकीय षडयंत्र आहे.मी संघर्ष करणारी महिला आहे त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाचा निकाल हा अंतिम असेल व तेथे सत्याचाच विजय होईल, असा विश्वास नवनीत राणा यांनी व्यक्त केला.

नेमकं प्रकरण काय?

2019 च्या निवडणुकीत अमरावती लोकसभा मतदारसंघ हा अनुसचित जातीसाठी राखीव होता. या मतदारसंघाचं नेतृत्त्व तत्कालिन शिवसेना खासदार आनंदराव अडसूळ करत होते. 2019 च्या निवडणुकीत नवनीत राणा यांनी त्यांचा पराभव केला. मात्र नवनीत राणांनी बनावट जात प्रमाणपत्र सादर केल्याचा आरोप करत शिवसेनेचे माजी खासदार आनंदराव अडसूळांनी कोर्टाचं दार ठोठावलं होतं. अखेर कोर्टानं आज नवनीत राणांचं जात प्रमाणपत्र रद्द ठरवत त्यांना 2लाखांचा दंडही ठोठावला.

अडसूळांनी केलेल्या आरोपांनुसार नवनीत राणा या मूळ पंजाबमधल्या लुभाणा समाजाच्या आहेत. मात्र त्यांनी 2019 च्या लोकसभेसाठी अमरावतीतून अर्ज भरताना मोची ( चर्मकार ) जातीचं प्रमाणपत्र दाखवून निवडणूक लढवली.

नवनीत राणांच्या वडिलांचं जात प्रमाणपत्रही अवैध

दरम्यान, नवनीत कौर-राणा यांचं जात प्रमाणपत्र वैध असल्याचा निर्णय उपनगर जिल्हा जात पडताळणी समितीनं दिला होता. त्यावेळी त्यंच्या वडिलांचं म्हणजे हरभजनसिंग कुंडलेस यांचं जात प्रमाणपत्र रद्द करुन ते जप्त करण्याचा निर्णयही या समितीनं दिला होता. त्याबाबत नवनीत राणा यांनी बनावट कागदपत्रांद्वारे जातवैधता प्रमाणपत्र मिळवून लोकसभा निवडणूक लढवली होती. या तक्रारींवर संयुक्तपणे तीन सदस्यीय समितीने सुनावणी घेतली होती. या समितीनं नवनीत राणा यांचे वडील हरभजनसिंग कुंडलेस यांचं मोची या अनुसूचित जातीचं प्रमाणपत्र रद्द करत जप्त करण्याचा निर्णय घेतला होता. नवनीत राणा यांचं जातप्रमाणपत्र वैध तर त्यांच्या वडिलांचं अवैध कसं? असा प्रश्न विचारत या दोन्ही निर्णयांविरोधात दाद मागण्यात येईल, असं सांगत याचिकाकर्त्यांनी आव्हान दिलं होतं.

संबंधित बातम्या :

हरभजन सिंग यांची मुलगी, रवी राणांची बायको, नवनीत राणांच्या सर्टिफिकेटवर जात कोणती?

मुख्यमंत्री लायक असते तर इथं येण्याची गरज नव्हती, नवनीत राणा राजधानीत कडाडल्या

Navneet Rana’s caste validity certificate canceled, she claims that there is no threat to MP

पाकिस्तान बॅकफूटवर, 5 वाजेपासून युद्धविराम, दोन्ही देशांकडून सहमती अन
पाकिस्तान बॅकफूटवर, 5 वाजेपासून युद्धविराम, दोन्ही देशांकडून सहमती अन.
भारत-पाक तणावादरम्यान मुंबईकरांसाठी मोठी बातमी, आता 9 जूनपर्यंत....
भारत-पाक तणावादरम्यान मुंबईकरांसाठी मोठी बातमी, आता 9 जूनपर्यंत.....
मोदी सरकारचा दहशतवादाविरुद्ध मोठा निर्णय, यापुढे तसं कृत्य युद्ध ठरेल
मोदी सरकारचा दहशतवादाविरुद्ध मोठा निर्णय, यापुढे तसं कृत्य युद्ध ठरेल.
भारतीय लष्कराकडून सैन्याच्या शौर्याचा व्हिडीओ शेअर, एकदा बघाच...
भारतीय लष्कराकडून सैन्याच्या शौर्याचा व्हिडीओ शेअर, एकदा बघाच....
VIDEO: पाकच्या रहिम यार खान एअरबेसचा चक्काचूर अन् धावपट्टीही उद्ध्वस्त
VIDEO: पाकच्या रहिम यार खान एअरबेसचा चक्काचूर अन् धावपट्टीही उद्ध्वस्त.
चिनाब नदीवरील सलाल धरणातून पाणी सोडलं, पाकिस्तानात पूर येणार?
चिनाब नदीवरील सलाल धरणातून पाणी सोडलं, पाकिस्तानात पूर येणार?.
पाकिस्तानचा कांगावा, 'तो' दावा खोटा, भारतीय लष्कराने दिला पुरावा
पाकिस्तानचा कांगावा, 'तो' दावा खोटा, भारतीय लष्कराने दिला पुरावा.
ऑपरेशन 'सिंदूर'मध्ये टॉप 5 कमांडरचा खात्मा, पाकिस्तानातून थेट नाव समोर
ऑपरेशन 'सिंदूर'मध्ये टॉप 5 कमांडरचा खात्मा, पाकिस्तानातून थेट नाव समोर.
VIDEO पाकला मोठा हादरा, भारतानं असं उडवलं रावळपिंडीतलं नूर खान एअरबेस
VIDEO पाकला मोठा हादरा, भारतानं असं उडवलं रावळपिंडीतलं नूर खान एअरबेस.
भारताचा मोठा स्ट्राईक, पाकचे 5 एअरबेस उडवले; पाकसाठी किती महत्त्वाचे?
भारताचा मोठा स्ट्राईक, पाकचे 5 एअरबेस उडवले; पाकसाठी किती महत्त्वाचे?.