फडणवीसजी तुम्हाला माशा मारण्याशिवाय कामच काय उरलंय; नवाब मलिक यांची खोचक टीका

नवाब मलिक यांनी ट्विट करून ही टीका केली आहे. (nawab malik slams devendra fadnavis over maratha reservation issue)

फडणवीसजी तुम्हाला माशा मारण्याशिवाय कामच काय उरलंय; नवाब मलिक यांची खोचक टीका
नवाब मलिक, अल्पसंख्यांक आणि कौशल्य विकास मंत्री
Follow us
| Updated on: May 15, 2021 | 11:16 AM

मुंबई: सर्व केंद्राने करायचं मग राज्याने काय माशा मारायच्या का? या विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या सवालावर राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी पलटवार केला आहे. फडणवीसजी तुम्हाला माशा मारण्याशिवाय कामच काय उरलंय? माशा मारण्याचा आनंद घ्या, अशी खोचक टीका नवाब मलिक यांनी केली आहे. (nawab malik slams devendra fadnavis over maratha reservation issue)

नवाब मलिक यांनी ट्विट करून ही टीका केली आहे. फडणवीसजी तुम्हाला आता माशा मारण्याशिवाय कामच काय उरलं आहे?, असा जबरदस्त टोला मलिक यांनी लगावला आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या टिकेला नवाब मलिक यांनी त्यांच्याच भाषेत उत्तर दिले आहे. आम्ही लोकांचे जीव वाचवण्यासाठी काम करत आहोत व करत राहू. तुम्ही माशा मारण्यातच आनंद घ्या. गरज पडल्यास भाजपाकडून माशा मारण्याच्या स्पर्धाही भरवा!, असा सल्लाही त्यांनी भाजपला दिला आहे.

फडणवीस काय म्हणाले होते?

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून काल देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकारवर टीका केली होती. प्रत्येक गोष्टीत राज्य सरकार केंद्राकडे बोट दाखवत आहे. राज्यांनी ऊठसूट केंद्राकडे बोट दाखवणं थांबवलं पाहिजे. सर्वच जर केंद्राने करायचं तर राज्यांनी काय माशा मारायच्या का?, असा सवाल देवेंद्र फडणवीस यांनी केला होता.

केंद्राने राज्याचे अधिकार अबाधित ठेवले आहेत. राज्य सरकार एखाद्या समाजाला मागास घोषित करू शकतं. मागासवर्ग आयोगाबाबत कोर्टाने दिलेल्या निकालावर राज्याने पुनर्विचार याचिका दाखल करायला हवी. केंद्र सरकार करू शकत नाही. सर्वच केंद्राने करायचं तर राज्यांनी माशा मारायच्या का?, असा सवाल करतानाच राज्यपालांच्या हातात काही नसताना देखील सत्ताधारी राज्यपालांना भेटत आहेत. ही सर्व नौटंकी आहे. हा सर्व टाईमपास सुरू आहे, अशी टीकाही त्यांनी केली होती.

राज्याचे अधिकार अबाधित

102 व्या घटना दुरुस्तीने राज्याचे अधिकार राज्याचे राहतील असं म्हटलं आहे. मात्र, त्याबद्दल कोर्टाचं दुमत होतं. दोन न्यायाधीशांनी घटना दुरुस्तीनंतरही राज्याचे अधिकार आबाधित राहणार असल्याचं म्हटलं आहे. तर तीन न्यायाधीशांनी एखाद्या वर्गाला मागास ठरवण्याचा अधिकार केंद्राचा असल्याचं म्हटलं होतं. त्यामुळे हे सर्व अधिकार राज्यांचेच असल्याचं सांगण्यासाठी केंद्राने पुनर्विचार याचिका दाखल केली आहे, असं फडणवीस म्हणाले होते. (nawab malik slams devendra fadnavis over maratha reservation issue)

संबंधित बातम्या:

पंतप्रधान होण्याच्या दिशेने तुम्ही पहिलं पाऊल टाकलंत; गोपीचंद पडळकरांचं उद्धव ठाकरेंना पत्र

चक्रीवादळापेक्षाही कोरोना वादळ मोठे, आधी ते थांबवा; संजय राऊतांनी पुन्हा केंद्राला डिवचले

सर्व केंद्राने करायचं मग राज्याने माशा मारायच्या का?; देवेंद्र फडणवीस यांचा सवाल

(nawab malik slams devendra fadnavis over maratha reservation issue)

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.