राणेंची 22 वर्ष मुख्यमंत्रिपदाची स्वप्नं पाहण्यात गेली, फडणवीसांचीही जातील : नवाब मलिक

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हा प्रश्न निर्माण केला, तेव्हा का बोलले नाहीत? बूंद से गई तो हौद से आती नही अशी परिस्थिती आहे" असं नवाब मलिक म्हणाले. (Nawab Malik Narayan Rane Devendra Fadnavis)

राणेंची 22 वर्ष मुख्यमंत्रिपदाची स्वप्नं पाहण्यात गेली, फडणवीसांचीही जातील : नवाब मलिक
गेल्या 22 वर्षांपासून नारायण राणे मुख्यमंत्रीपदाचं स्वप्न पाहत आहेत. त्यांना आता जोडीदार म्हणून देवेंद्र फडणवीस भेटलेत,
Follow us
| Updated on: Feb 08, 2021 | 10:26 AM

मुंबई : राज्यसभा खासदार नारायण राणे (Narayan Rane) यांची 22 वर्ष मुख्यमंत्री पदाची स्वप्नं पाहण्यात गेली, आता विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांचीही जातील, असा टोला राष्ट्रवादीचे प्रवक्ते आणि अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांनी लगावला. (Nawab Malik taunts Narayan Rane Devendra Fadnavis)

“भाजपचा फुगा दिल्लीतही फुटणार”

“दिल्लीतही 23-23 पक्षांचं सरकार होतं, तेव्हा ते का बोलले नाहीत? पक्ष चाकावर चालत नसतो, भाजपची कार्यपद्धती ही फुग्यासारखी आहे, एकदा हवा गेली की पुढे जात नाही. राज्यात भाजपचा फुगा फुटला, दिल्लीतही फुटणार आहे. चाकाने सरकार चालत नाही, विचारांनी चालतं. महाविकास आघाडी सरकार भक्कम आहे. विधानसभेत, ग्राम पंचायतीत महाविकास आघाडीला स्वीकृती मिळाली, त्यांना हे कळत नाही. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हा प्रश्न निर्माण केला, तेव्हा का बोलले नाहीत? बूंद से गई तो हौद से आती नही अशी परिस्थिती आहे” असं नवाब मलिक म्हणाले.

अमित शाहांवर निशाणा

“तुमचं कामच बंद खोलीतले आहे, दीपसिंह सिद्धूला बंद खोलीत तयार करुन शेतकरी आंदोलनात घुसवलं. आंदोलन बदनाम केलं, कटकारस्थान केलं. बंद खोलीतील नेत्यांनी बंद खोलीबद्दल बोलू नये. ते 95 लोक कुठे बेपत्ता झाले, त्यांचा तपास होणं गरजेचं आहे. बेपत्ता माणसांची माहिती देणं गरजेचं आहे” अशा शब्दात नवाब मलिक यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावर निशाणा साधला.

“मुख्यमंत्रिपदाची स्वप्नं पाहण्यात फडणवीसांची वर्ष जातील”

“राणेसाहेब 22 वर्ष फासे पलटवण्याचं स्वप्न पाहत आहेत, त्यांना मुख्यमंत्री बनण्याची स्वप्नं पडत आहेत. त्यांना फासे पलटवता आलेच नाहीत, तीच देवेंद्र फडणवीस यांची अवस्था आहे. नारायण राणेंची 22 वर्ष मुख्यमंत्रिपदाची स्वप्न पाहण्यात गेली, आता देवेंद्र यांचीही जातील” असा तिरकस निशाणा नवाब मलिक यांनी साधला. (Nawab Malik taunts Narayan Rane Devendra Fadnavis)

“भाजप हा प्रॉपगंडा करणारी मशिन आहे. खोट्या प्रॉपगंड्याने कुठलंही सरकार पडत नाही, सत्य उघड होतं, आम्ही अशा प्रॉपगंड्याला घाबरत नाही” असंही नवाब मलिक यांनी ठणकावून सांगितलं.

संबंधित बातम्या :

राणेंसारख्या नेत्यांना कसं सांभाळायचं आम्हाला माहीत, त्यांच्यावर अन्याय होणार नाही : अमित शहा

बाळासाहेब ठाकरेंचे सर्व सिद्धांत तापी नदीत टाकून शिवसेना सत्तेत; अमित शहांची उद्धव ठाकरेंवर थेट टीका

राणे महाराष्ट्राचे दबंग नेते, झोप विसरून मेहनत करतात; फडणवीसांची स्तुतीसुमनं

(Nawab Malik taunts Narayan Rane Devendra Fadnavis)

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.