राष्ट्रवादीचे 4 आमदार भेटायला येणार, रावसाहेब दानवेंचा दावा
येत्या 31 ऑगस्टला राष्ट्रवादीचे 4 आमदार मला भेटायला येणार आहेत. त्याशिवाय इतर 17 आमदार भाजपात येण्यासाठी रांगेत उभे असल्याचा गौप्यस्फोट केंद्रीयमंत्री रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) यांनी केला आहे.
जालना : “येत्या 31 ऑगस्टला राष्ट्रवादीचे 4 आमदार मला भेटायला येणार आहेत. त्याशिवाय इतर 17 आमदार भाजपात येण्यासाठी रांगेत उभे असल्याचा गौप्यस्फोट केंद्रीयमंत्री रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) यांनी केला आहे.” जालन्यात एका पत्रकार परिषदेदरम्यान दानवेंनी हे वक्तव्य केले.
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे आमदार (Congress NCP MLA) सत्ताधारी पक्षात प्रवेश केला आहे. त्यानुसार गेल्या काही दिवसांपासून भाजप (BJP) आणि शिवसेनेत (Shivsena) नेत्यांचे पक्षप्रवेश सुरु आहेत. “विरोधी पक्षातील आणखी 17 आमदार भाजपात येण्यासाठी रांगेत उभे असल्याचे वक्तव्य रावसाहेब दानवेंनी (Raosaheb Danve) केलं आहे. गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादीचे 4 आमदार माझ्या संपर्कात आहे. ते सर्व आमदार शुक्रवारी 31 ऑगस्टला मला भेटायला येणार असल्याचे वक्तव्यही दानवेंनी केलं आहे.”
लोकसभा निवडणुकांप्रमाणेच विधानसभेतही भाजप-शिवसेना युती कायम राहील. येत्या विधानसभा निवडणुका आम्ही एकत्रच लढणार आहोत, असेही दानवेंनी यावेळी सांगितले.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिवस्वराज्य यात्रेपूर्वी काँग्रेसचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यापुढे राष्ट्रवादी पक्षाच्या झेंड्यासोबतच भगवा झेंडा वापरेल अशी घोषणा केली होती. यावर अजित पवारांच्या झेंड्यांचा दांडा आमच्या हातात आहे असा टोला रावसाहेब दानवे यांनी लगावला.
येत्या विधानसभा निवडणुकीत भाजप-शिवसेना एकत्रच लढणार असून युतीचा फॉर्म्युला ठरलेला आहे, असेही दानवेंनी यावेळी स्पष्ट केले.