Chhagan Bhujbal : सुहास कांदे शिवीगाळ प्रकरणावर अखेर छगन भुजबळ बोलले
Chhagan Bhujbal : "सुहास कांदे शिवीगाळ करत आहे असं दिसतय. शेखर पगार यांनी भाषण केल्यावर तिकडून शिवीगाळ सुरू केली. पगार हुशार होते, त्यांनी माईक समोर मोबाईल धरला. सगळ्या नांदगावमध्ये स्पीकर लावले होते"

महायुतीमध्ये नाशिकच्या नांदगाव विधानसभा मतदारसंघात बंडखोरी झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष महायुतीमध्ये आहे. पण राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांचा पुतण्या समीर भुजबळने नांदगावमधून अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. ‘समीर अपक्ष उभा राहिला आहे. मी काही गेलो नव्हतो’ असं छगन भुजबळ म्हणाले. “काही व्हिडीओ व्हायरल झाले आहे. सुहास कांदे शिवीगाळ करत आहे असं दिसतय. शेखर पगार यांनी भाषण केल्यावर तिकडून शिवीगाळ सुरू केली. पगार हुशार होते, त्यांनी माईक समोर मोबाईल धरला. सगळ्या नांदगावमध्ये स्पीकर लावले होते. घाणेरड्या शिव्या आणि दमबाजी दिसली” असं छगन भुजबळ म्हणाले.
“शेलार आणि समीर भुजबळ यांना शिव्या दिल्या. भयमुक्त ही टॅगलाईन समीरने घेतलीये. या क्लिप ऐकल्या तर का घेतली आहे? हे सर्वांना समजेल. सामान्य जनता बोलू शकणार नाही असे आहे. पोलिसांनी आणि महसूल विभागाने कारवाई करायला पाहिजे. अधिकारी प्रेशर खाली काम करत आहे. निवडणूक आयोगाने लक्ष दिले पाहीजे” असं छगन भुजबळ म्हणाले.
‘आम्ही कुणाच्या जमिनी घेतल्या नाहीत’
“योग्य ती कारवाई केली पाहिजे, लोकांना भयमुक्त वातावरण मतदान करू दिले पाहिजे. निवडून आयोगाने भेदभाव करता कामा नये, योग्य असेल ते करावे. इतर पक्षातील लोक, कार्यकर्ते सगळ्यांना भीती ते सगळे मदत करतील. त्यांनी विकास केला नाही, भीती दाखवली. मी 10 ते 12 वर्षे होतो, कुणाला भीती दाखवली. आम्ही कुणाच्या जमिनी घेतल्या नाहीत. एक उदाहरण सांगा” असं छगन भुजबळ म्हणाले. “बाळासाहेब ठाकरे यांना कांदेनी पाहिले नाही. समीर तर बाळासाहेबांच्या जवळ खेळला आहे. समीर भुजबळ स्थानिक प्रश्न मांडत आहे” असं छगन भुजबळ म्हणाले.