अजित पवारांकडून पुण्यातील जागावाटपाचे सूत्र जाहीर
येत्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीने पुण्यात आठ जागा लढवण्याचा निर्णय (Pune Assembly Election) घेतला आहे.
पुणे : राज्यात विधानसभा निवडणुकांचं बिगुल वाजलं आहे. दिवाळी पूर्वी राज्यात निवडणुका होत आहे. येत्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीने पुण्यात आठ जागा लढवण्याचा निर्णय (Pune Assembly Election) घेतला आहे. यातील राष्ट्रवादी काँग्रेस 4, काँग्रेस 3 तर एक जागा मित्रपक्ष लढवणार आहे अशी घोषणा (ajit pawar comment on pune vidhansabha seats) राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar Pune) यांनी पुण्यात आयोजित केलेल्या कार्यकर्ता मेळाव्यात केली.
पुण्यातील हडपसर, पर्वती, खडकवासला, वडगाव शेरी या जागावर राष्ट्रवादी लढणार (ajit pawar comment on pune vidhansabha seats) आहेत. तर शिवाजी नगर, कसबा, कंन्टोन्मेंट या जागा काँग्रेस आणि कोथरुडची जागा मित्रपक्ष लढवणार (ajit pawar comment on pune vidhansabha seats) असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
गेल्या काही दिवसांपासून आघाडी संदर्भात (ncp-congress alliance) समविचारी असून जागावाटपाची चर्चा सुरु आहे. मतदानासाठी अवघा एक महिना उरला आहेत. त्यामुळे आपल्याला एक महिना जीवतोड मेहनत करावी लागणार आहे. आपल्या हातात एकच महिना आहे. त्यामुळे सर्व कार्यकर्त्यांनी प्रचारात झोकून द्या असे आवाहनही अजित पवार (ncp-congress alliance) यांनी कार्यकर्त्यांना केले. राजकरणात कोणाची मक्तेदारी नसते. त्यामुळे तुम्ही कधी खचून जाऊ नका असेही ते यावेळी म्हणाले.
“सद्यस्थितीत शिक्षणाचा खेळखंडोबा झाला आहे. सध्याच्या सरकारने ठरवलेले शैक्षणिक धोरण चुकीचं आहे, त्यामुळे कोणाचाही विकास झालेला नाही. शेतकरी, कामगार यांची फसवणूक झाली. सर्वसामान्यांना महागाईचा फटका बसत आहेत. ज्यांना महागाईचा फटका बसला आहे, त्यांनी पेटून उठावे, असेही अजित पवार (Ajit Pawar Pune) म्हणाले.”
“बारामतीसह अनेक ठिकाणी टँकर सुरु आहे. तसेच चारा छावण्याही सुरु आहे. पुण्यात पाणी टंचाई आहे. मी पालकमंत्री असताना पुण्यात कधीही पाणी टंचाई जाणवू दिली नाही. त्यामुळे हे या सरकारचे (ajit pawar comment on pune vidhansabha seats) अपयश आहे. गेल्या पाच वर्षात अडीच लाख कोटीचं कर्ज केलं. त्यामुळे राज्य कर्जबाजारी झालं, असेही ते यावेळी म्हणाले.”
भ्रष्टाचार मुक्त म्हणता ना, मग खडसे, कांबळे, बडोले यांची पक्षातून हकालपट्टी का केलात असा प्रश्नही अजित पवारांनी विचाराला. महाजनादेश यात्रेवेळी भाजपने अनेकांना ताब्यात घेतलं. आम्ही अशाप्रकारे कधीही सत्तेचा गैरवापर केला नाही. कोणाची धरपकड केलेली नाही. असा टीकाही त्यांनी भाजप सरकारवर (Pune assembly election) केली. याउलट आम्ही झाडं लावली. जर तुम्ही चांगली कामं केली आहेत, तर त्याचा डंका का बजावता, असेही अजित पवार म्हणाले.
“राज्यात जेव्हा पूरस्थिती निर्माण झाली होती. तेव्हा हे यात्रा काढत होते. गेल्या तीन महिन्यात सरकारने 350 शासन निर्णय काढले. याआधी सरकार झोपलं होतं का? असा प्रश्नही पवारांनी उपस्थिती केला. भाजप सरकारला (Pune assembly election) सत्तेची नशा चढली आहे. त्यांनी सत्तेचा दुरुपयोग केला आहे. अनेक तरुणांची नोकरी जात आहे. त्यामुळे बेरोजगारीचा प्रश्न निर्माण झाला आहे. अशा स्थितीत उज्ज्वला गॅसचा काय फायदा अशी टीकाही अजित पवारांनी सरकारवर केली.”
“सध्या शहरात वाहतूकोंडी झाली आहे. शिवशाही कधी बंद पडतील. राज्यात सर्व खड्डे पडले आहेत. त्यामुळे कधी अपघात होईल हे सांगता येत नाही. अनेक जण शरद पवारांनी काय केलं असे विचारतात. मी त्यांना सांगू इच्छितो, आम्ही अनेक कामं केली, मात्र त्याचा कधीही गाजावाजा केला नाही. अनेक कंपन्या आम्ही सुरु केल्या. मात्र त्याबद्दल कधीही बोललो नाही. काहीजण मात्र उगाच टीमक्या मिरवतात, असा टोलाही अजित पवारांनी लगावला.”
भामा आसखेड ही पाणी योजना आम्ही मंजूर केली. माञ यांना पाच वर्षात त्या ठिकाणी पाईप लाईन टाकता आली नाही. पुण्यातील महानगर पालिकेवर कोणचाही अंकुश नाही. पुणे तिथं काय उणे अशी स्थितीत सध्या पुण्याची झाली आहे. पुण्याकडे कोणीही लक्ष देत नाही, पालकमंत्री यांच्यावर राज्याची मंत्रिपदाची जबाबदारी आहे. त्यामुळे ते किती न्याय देणार पुण्याला. आम्ही पूर्वी आवाज उठवायचा तेव्हा कोणी आवाज करत नव्हते, आज सर्व ठप्प झाले अशा शब्दात अजित पवारांनी पुणेकरांची व्यथा मांडली.
“भाजपची गल्ली पासून दिल्लीत सत्ता आहे मग इतर पक्षातील लोक कशाला हवीत. अनेक ठिकाणी शिवसेनेची जागा असताना अनेकजण भाजपत गेलेत. त्यामुळे पक्षातील लोकांना उमेदवारी देणार का नाही असा प्रश्नच उपस्थित झाला आहे. त्याशिवाय जोपर्यंत काही ठिकाणी भाजपचे उमेदवार जाहीर होत नाहीत तोपर्यंत तिथं आमचे उमेदवार जाहीर करणार नाहीत, त्यामुळं सारखं फोन करु नका, असेही ते यावेळी म्हणाले.”