मी कुठल्याच आमदाराला भेट नाकारत नाही, कॅन्सर हवेतून पसरत नाही; चौधरींच्या आरोपाला आव्हाडांचं प्रत्युत्तर

Jitendra Awhad | मी कोणतीही गोष्ट पूर्वपरवानगीशिवाय करत नाही. मी मुख्यमंत्र्यांची परवानगी घेतली. त्यानंतर पवारसाहेब रुग्णालयात होते, ते रुग्णालयातून आल्यानंतर चाव्या देण्यााच कार्यक्रम झाला.

मी कुठल्याच आमदाराला भेट नाकारत नाही, कॅन्सर हवेतून पसरत नाही; चौधरींच्या आरोपाला आव्हाडांचं प्रत्युत्तर
अजय चौधरी आणि जितेंद्र आव्हाड
Follow us
| Updated on: Jun 23, 2021 | 1:39 PM

मुंबई: टाटा कॅन्सर रुग्णालयाला 100 सदनिका (Tata Cancer center) देण्याच्या निर्णयाला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून स्थगिती देण्यात आल्यानंतर शिवसेना आणि राष्ट्रवादीत आरोप-प्रत्यारोपांची मालिका सुरु झाली आहे. शिवसेना आमदार अजय चौधरी यांनी बुधवारी सकाळीच मंत्री जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी आपल्याला भेट दिली नसल्याचा दावा केला. त्यामुळे आपण मुख्यमंत्र्यांकडे धाव घेतल्याचे त्यांनी सांगितले होते. मात्र, आता जितेंद्र आव्हाड यांनी हा दावा खोडून काढला आहे. मी कुठल्याच आमदाराला भेट नाकारत नाही. तसेच टाटा कॅन्सर रुग्णालयाला सदनिका देण्याचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याच परवानगीनंतर घेण्यात आला होता, असेही आव्हाड यांनी स्पष्ट केले. त्यामुळे आता यावर शिवसेनेचे नेते आणखी काही बोलणार का, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. (NCP Jitendra Awhad on Shiv Sena MLA Ajay Chaudhary complaints)

जितेंद्र आव्हाड नेमकं काय म्हणाले?

मी कोणतीही गोष्ट पूर्वपरवानगीशिवाय करत नाही. मी मुख्यमंत्र्यांची परवानगी घेतली. त्यानंतर पवारसाहेब रुग्णालयात होते, ते रुग्णालयातून आल्यानंतर चाव्या देण्यााच कार्यक्रम झाला. मी घरी आल्यानंतर पहिला कार्यक्रम हाच घेऊ असं पवारसाहेबांनी म्हटलं होतं. उद्धवजीही म्हणाले पवारसाहेबांच्या हस्ते कर, पण गर्दी करु नका, ते सुद्धा तितकेच संवेदनशील होते.

आमदार अजय चौधरी नेमकं काय म्हणाले मला माहिती नाही. कुठल्याही आमदाराची अशी तक्रार असणार नाही की मी भेट देत नाही. भेटीसाठी वेळ दिली नाही असं होणार नाही. अनेक कामं अजय चौधरींची केली आहेत.. कोणताही कॅन्सर पेशंट त्या इमारतीत राहणार नाही, दोन तीन महिने त्या पेशंटवर उपचार सुरु असतात, त्यावेळी त्याचे कुटुंब ज्या अवस्थेत राहतात, त्यांच्यासाठीची सेवा म्हणून या खोल्या देण्यात येणार आहेत. कॅन्सर काही हवेतून पसरत नाहीत, तिथल्या लोकांचा गैरसमज दूर करु, यातून मार्ग काढू, मार्ग हा निघेलच.

‘मी सीमा ओलांडली नाही, आव्हाडांनी दखल न घेतल्याने मुख्यमंत्र्यांकडे’

शिवसेनेचे शिवडीचे आमदार अजय चौधरी यांच्या तक्रारीनंतर जितेंद्र आव्हाडांचा ड्रीम प्रोजेक्ट स्थगित झाला आहे. चौधरी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे गाऱ्हाणे मांडल्यानंतर राज्य सरकारने या टाटा कॅन्सर रुग्णालयाला सदनिका देण्याच्या निर्णयाला स्थगिती दिली होती. याविषयी अजय चौधरी यांनी आपली बाजू स्पष्ट केली होती. कॅन्सरग्रस्तांसाठी इथे जागा दिली जात असली, तरी त्यामुळे स्थानिकांच्या आरोग्याला धोका आहे. त्याविरोधात स्थानिक महिला रस्त्यावर उतरल्या होत्या. त्यामुळे जितेंद्र आव्हाडांकडे पाठपुरावा केला. पत्रं लिहिली, त्यांच्या पीएला भेटलो, पण मी मुख्यमंत्र्यांकडे जाईपर्यंत माझी दखल घेतली नाही. मी कोणतीही सीमा ओलांडली नाही. स्थानिक आणि लोकप्रतिनिधींना विचार न घेता हा निर्णय घेण्यात आला, असं शिवसेनेचे आमदार अजय चौधरी यांनी सांगितलं होते.

संबंधित बातम्या 

मी सीमा ओलांडली नाही, आव्हाडांनी दखल न घेतल्याने मुख्यमंत्र्यांकडे, अजय चौधरींची रोखठोक प्रतिक्रिया

Breaking : जितेंद्र आव्हाडांना धक्का, टाटा रुग्णालयाला ‘म्हाडा’च्या सदनिका देण्याचा निर्णय मुख्यमंत्र्यांकडून स्थगित!

(NCP Jitendra Awhad on Shiv Sena MLA Ajay Chaudhary complaints)

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.