AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

महाराष्ट्राच्या राजकारणातील बाप पवारच; अमोल मिटकरींचा चंद्रकांत पाटलांवर पलटवार

पुणे महापालिकेतील सत्तेबाबत अजित पवारांना जर काही स्वप्न पडत असतील, तर यासंदर्भात ऊर्जा वायाला घालवू नका.

महाराष्ट्राच्या राजकारणातील बाप पवारच; अमोल मिटकरींचा चंद्रकांत पाटलांवर पलटवार
| Updated on: Oct 11, 2020 | 12:59 PM
Share

मुंबई: शरद पवार हेच महाराष्ट्राच्या राजकारणातील बाप आहेत. विधानसभा निवडणुकीनंतर शरद पवार यांनी भाजपच्या 105 आमदारांना घरी बसवले. तेव्हाच बाप कोण आहे, हे सिद्ध झाले, असे सांगत राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांना प्रत्युत्तर दिले. चंद्रकांत पाटील यांनी पुण्यातील एका कार्यक्रमात अजित पवार यांच्यावर टीकास्त्र सोडले होते. पुणे महापालिकेतील सत्तेबाबत अजित पवारांना जर काही स्वप्न पडत असतील, तर यासंदर्भात ऊर्जा वायाला घालवू नका. आम्ही पण तुमचे बाप आहोत, असे चंद्रकांत पाटील यांनी म्हटले होते. (Amol Mitkari hits back BJP Chandrakant Patil)

या टीकेला रविवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे विधानपरिषदेतील आमदार अमोल मिटकरी यांनी प्रत्युत्तर दिले. काल भाजपाच्या एका महाशयाने, “आम्ही तुमचे बाप आहोत” असे वक्तव्य केले. त्यांच्या माहितीकरता 2019 चे विधानसभा निवडणूक निकाल जाहीर झाल्यावर 105 आमदारांना बेकार करून महाविकासआघाडी सरकार स्थापन करणारे तुमचे बाप कोण आहेत? हे संपूर्ण महाराष्ट्राला माहीत आहे. 2022 साली पुणे मनपात पुण्याची जनता अजितदादा पवार हे तुमचे बाप आहेत हे सिद्ध करून दाखवेल. काळजी करू नका, असे मिटकरी यांनी म्हटले. त्यामुळे आता राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपमधील हे शाब्दिक युद्ध आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे.

चंद्रकांत पाटलांनी अजित पवारांना का डिवचले? पुणे महानगरपालिकेच्या नुकत्याच झालेल्या प्रभाग समितीच्या निवडणुकीमध्ये भाजपने बाजी मारली होती. यामध्ये ११ प्रभाग समित्यांवर भाजप, चार समित्यांवर राष्ट्रवादी आणि एक प्रभाग समिती काँग्रेसच्या वाट्याला आली. या पार्श्वभूमीवर कोथरूडमधील कार्यक्रमात चंद्रकांत पाटील यांनी अजित पवारांना डिवचले होते. राज्यात सत्तेत आहात म्हणून तुम्ही पुणे महानगरपालिकेत सत्तेची स्वप्न पाहू नका. आम्हीही तुमचे बाप आहोत, असे चंद्रकांत पाटील यांनी म्हटले होते.

संबंधित बातम्या:

मोठ्या माणसांवर टीका केल्याशिवाय काहींना प्रसिद्धीच मिळत नाही, रोहित पवारांचे नाव न घेता चंद्रकांत पाटलांची टीका

सत्तेची स्वप्न पाहू नका, आम्हीही तुमचे बाप आहोत; अजितदादांवर टीका करताना चंद्रकांतदादांची जीभ घसरली

(Amol Mitkari hits back BJP Chandrakant Patil)

INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!
INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!.
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना.
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं.
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न.
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी.
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण.
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर.
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी.
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान.
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप.