AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

फक्त नवरदेवाने लग्नाची घाई करुन काही होत नाही, घरच्यांनीही मनावर घेतलं पाहिजे; राष्ट्रवादीच्या नेत्याचा भाजपला टोला

विधानपरिषदेच्या चार जागांवरील यश हे कोणत्याही एका पक्षाचे नसून महाविकास आघाडीचे एकत्रित यश आहे. | Dattatray Bharne

फक्त नवरदेवाने लग्नाची घाई करुन काही होत नाही, घरच्यांनीही मनावर घेतलं पाहिजे; राष्ट्रवादीच्या नेत्याचा भाजपला टोला
| Updated on: Dec 04, 2020 | 4:07 PM
Share

उस्मानाबाद: एखाद्या नवरदेवाने स्वत: लग्न करा असे म्हणण्यापेक्षा त्याच्या घरच्यांची ती गोष्ट मनावर घेतली पाहिजे. मात्र, भाजपला लग्नाची खूप घाई झाली होती, अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार दत्तात्रय भरणे (Dattatray Bharne) यांनी विरोधकांना टोला लगावला. (NCP leader Dattatray Bharne slams bjp over defeat in MLC election)

राज्यातील पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत महाविकास आघाडीने भाजपला धूळ चारली. या पार्श्वभूमीवर दत्तात्रय भरणे शुक्रवारी उस्मानाबादमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलत होते. यावेळी त्यांनी महाविकासआघाडीला मतदान करणाऱ्यांचे आभार मानले. विधानपरिषदेच्या चार जागांवरील यश हे कोणत्याही एका पक्षाचे नसून महाविकास आघाडीचे एकत्रित यश असल्याचे दत्तात्रय भरणे यांनी स्पष्ट केले.

यावेळी त्यांनी भाजपलाही खोचकपणे चिमटा काढला. एखाद्या नवरदेवाने स्वत:हून लग्न करा, असे म्हणण्यापेक्षा त्याच्या घरच्यांनी तसे म्हटले पाहिजे. पण भाजपला लग्नाची घाई झाली होती, असे भरणे यांनी म्हटले.

महाविकासआघआडीचे काम पाहून लोकांनी उमेदवारांना निवडून दिले. महाविकास आघाडीच्या सर्व नेत्यांनी पदवीधर निवडणुका मनावर घेतल्या. विनंती केल्यावर काय चमत्कार होऊ शकतो, हे या निवडणुकीत समोर आले आहे. निवडणुकीचा निकाल पाहता महाविकासआघाडी जिंकली असून भाजप हरल्याचे स्पष्टपणे दिसत आहे, असेही दत्तात्रय भरणे यांनी सांगितले.

महाविकासआघाडीतील शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांनी यंदा प्रथमच पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाची निवडणूक एकत्रपणे लढवली होती. मात्र, पदवीधर निवडणुकीतील भाजपची आजपर्यंतची कामगिरी पाहता महाविकासआघाडीचे कॉम्बिनेशन कितपत यशस्वी ठरणार, याबद्दल अनेकांना साशंकता होती. परंतु, धुळे-नंदुरबार स्थानिक स्वराज्य संस्थेची पोटनिवडणूक वगळता इतर सर्व ठिकाणी महाविकास आघाडीला घवघवीत यश मिळाले.

अगदी पुणे आणि नागपूर पदवीधर मतदारसंघ या भाजपच्या पारंपरिक बालेकिल्ल्यामध्येही महाविकासआघाडीच्या उमेदवारांनी मुसंडी मारत विजय खेचून आणला. केवळ अमरावती शिक्षक मतदारसंघाच्या जागेवर महाविकास आघाडीच्या उमेदवाराला अपक्ष उमेदवार किरण सरनाईक यांच्याकडून पराभव स्वीकारावा लागेल, अशी चिन्हे दिसत आहेत.

‘पदवीधरच्या निकालानं विरोधकांमधील वाचाळवीरांना चपराक’

विधानपरिषद निवडणुकीत भाजपला पराभवाची धूळ चारल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विरोधकांवर टीकास्त्र सोडले. या निकालाने विरोधकांना चपराक बसली आहे. भाजपमधील काही मोठ्या नेत्यांना चांगलंच फटकारलं आहे. बरेच लोक वाचाळ बडबड करत होते. महाविकास आघाडीच्या उमेदवारांचा विजय म्हणजे त्या वाचाळविरांना जबरदस्त चपराक असल्याचे अजितदादांनी सांगितले.

संंबंधित बातम्या:

भाजपची उलटी गिनती सुरू, ही तर ट्रायल मॅच; शिंदे-गुलाबरावांची टोलेबाजी

फाजील नेतृत्वामुळे भाजपचा पराभव, मी पुन्हा येईन ही भावना अजून गेली नाही, खडसेंचा हल्लाबोल

ऑपरेशन लोटस होणार नाही हे स्टॅम्प पेपरवर लिहून देतो; हसन मुश्रीफ यांचा दावा

(NCP leader Dattatray Bharne slams bjp over defeat in MLC election)

नाशिक तपोवन परिसरातील प्रस्तावित MICE सेंटरची निविदा अखेर रद्द
नाशिक तपोवन परिसरातील प्रस्तावित MICE सेंटरची निविदा अखेर रद्द.
जब तक सूरज चांद रहेगा, गांधी तेरा... 'मनरेगा'विरोधात संसद भवनला आंदोलन
जब तक सूरज चांद रहेगा, गांधी तेरा... 'मनरेगा'विरोधात संसद भवनला आंदोलन.
लवकरच बॉम्ब फोडणार, त्यांनी कॅश बॉम्ब...शिंदेंच्या आमदाराचा गौप्यस्फोट
लवकरच बॉम्ब फोडणार, त्यांनी कॅश बॉम्ब...शिंदेंच्या आमदाराचा गौप्यस्फोट.
ठाकरेबंधू-शिंदेंची शिवतीर्थसाठी रस्सीखेच, प्रचारसभेसाठी कुणाला परवानगी
ठाकरेबंधू-शिंदेंची शिवतीर्थसाठी रस्सीखेच, प्रचारसभेसाठी कुणाला परवानगी.
BMC साठी महायुतीची पहिली बैठक अन् दादांच्या NCP ला निमंत्रण नाही!
BMC साठी महायुतीची पहिली बैठक अन् दादांच्या NCP ला निमंत्रण नाही!.
गांधी कुटुंबाला दिलासा, ED आरोपपत्राची दखल घेण्यास कोर्टाचा नकार
गांधी कुटुंबाला दिलासा, ED आरोपपत्राची दखल घेण्यास कोर्टाचा नकार.
इलेक्शन जीतकर हम होंगे असली धुरंधर...शिंदेंच्या टीकेवर राऊतांचं उत्तर
इलेक्शन जीतकर हम होंगे असली धुरंधर...शिंदेंच्या टीकेवर राऊतांचं उत्तर.
महायुतीची राज्यात सर्वच ठिकाणी तंतरली... दानवे यांचा सरकारवर निशाणा
महायुतीची राज्यात सर्वच ठिकाणी तंतरली... दानवे यांचा सरकारवर निशाणा.
...तर दिल्लीत आंदोलन करणार; जरांगे पाटील यांचा थेट इशारा, प्रकरण काय?
...तर दिल्लीत आंदोलन करणार; जरांगे पाटील यांचा थेट इशारा, प्रकरण काय?.
अखेर 'तो' क्षण येणार, मनसे-ठाकरेंची युती कधी होणार? तारीख समोर
अखेर 'तो' क्षण येणार, मनसे-ठाकरेंची युती कधी होणार? तारीख समोर.