भाजपचा गड ढासळला, शरद पवार खडसेंना न्याय देतील : धनंजय मुंडे
राजकीय कामकाजाचा आम्हाला नक्कीच मंत्रिमंडळात फायदा होणार आहे," असेही धनंजय मुंडे म्हणाले. (Dhananjay Munde Comment on Eknath Khadse NCP Join)
बीड : “एकनाथ खडसे यांचे मी राष्ट्रवादीत स्वागत करतो. हा माझ्यासाठी अतिशय आनंदाचा दिवस आहे,” अशी प्रतिक्रिया सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी दिली. “खडसेंच्या प्रदीर्घ अनुभवाचा आणि राजकीय कामकाजाचा आम्हाला नक्कीच मंत्रिमंडळात फायदा होणार आहे,” असेही धनंजय मुंडे म्हणाले. (Dhananjay Munde Comment on Eknath Khadse NCP Join)
“माझ्यासाठी हा खरच आनंदाचा दिवस आहे. मी एकनाथ खडसे यांचे स्वागत करतो. भाजपचा गड ढासळला आहे. खडसेंवर झालेल्या अन्यायाला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार न्याय देतील,” असेही धनंजय मुंडे म्हणाले.
“खडसेंनी महाराष्ट्रात भाजप उभी केली. त्याच्यांवर कसा अन्याय झाला हे सर्व महाराष्ट्राने पाहिला आहे, असा अन्याय झाल्यानंतर प्रदीर्घ ज्यांनी महाराष्ट्राची सेवा ज्यांच्या विचाराखाली केली. त्याच विचाराकडून अन्याय झाला. आज त्यांना राष्ट्रवादी यावं लागलं,” असेही धनंजय मुंडे म्हणाले.
“राष्ट्रवादीला त्याचा नक्कीच फायदा होणार आहे.मी स्वत: खडसेंच्या नेतृत्वाखाली अनेक वर्ष काम केलं आहे. खडसेंच्या प्रदीर्घ अनुभवाचा आणि राजकीय कामकाजाचा आम्हाला नक्कीच मंत्रिमंडळात फायदा होणार आहे,” असेही धनंजय मुंडेंनी सांगितले.
“भाजप नेत्या पंकजा मुंडेंना शिवसेनेचे निमंत्रण दिले असेल तर ते त्यांनी जाहीर करावे,” अशीही प्रतिक्रिया धनंजय मुंडेंनी दिली.
एकनाथ खडसेंच्या नव्या राजकीय इनिंगला सुरुवात!
गेली 40 वर्षे भाजपला वाढवण्यासाठी अहोरात्र कष्ट घेऊन भाजपचा चेहरामोहरा बदलण्यात महत्त्वाचं योगदान देणारे भाजपचे बंडखोर नेते एकनाथ खडसे यांनी आज अखेर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या उपस्थित एकनाथ खडसे यांनी पत्नी मंदाकिनी, कन्या रोहिणी आणि शेकडो कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादीचं घड्याळ हातावर बांधलं.
यावेळी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते खासदार प्रफुल्ल पटेल, खासदार सुनिल तटकरे, खासदार सुप्रिया सुळे, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, ज्येष्ठ नेते आणि अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, कामगार मंत्री दिलीप वळसे पाटील, गृहमंत्री अनिल देशमुख, अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे, विधानसभेचे माजी अध्यक्ष अरुण गुजराथी, गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड इत्यादी नेते उपस्थित होते. मात्र उपमुख्यमंत्री अजित पवार प्रकृतीच्या कारणास्तव या सोहळ्याला उपस्थित राहणार नाहीत. (Dhananjay Munde Comment on Eknath Khadse NCP Join)
संबंधित बातम्या :
एकनाथ खडसे यांचा अखेर राष्ट्रवादीत प्रवेश, नव्या राजकीय इनिंगला सुरुवात!
Eknath Khadse | त्यांनी ईडी लावली तर मी सीडी लावेन, एकनाथ खडसेंचा इशारा