भाजपला मतदान न होणाऱ्या बूथची यादी पंकजांनी मागवली, धनंजय मुंडेंचा गंभीर आरोप

मुंबई : बीडच्या पालकमंत्र्यांनी (पंकजा मुंडे) भाजपला मतदान न होणाऱ्या बूथची यादी मागवल्याचा गंभीर आरोप विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते आणि राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांनी केला. तसेच, ईव्हीएम हॅकिंगचा संशयही धनंजय मुंडे यांनी व्यक्त केला आहे. धनंजय मुंडे यांनी ‘टीव्ही 9 मराठी’शी खास बातचीत केली. धनंजय मुंडे नेमकं काय म्हणाले? “तुम्हा माध्यमांसमोर येण्याआधी बीडमधून मला अशी […]

भाजपला मतदान न होणाऱ्या बूथची यादी पंकजांनी मागवली, धनंजय मुंडेंचा गंभीर आरोप
Follow us
| Updated on: May 21, 2019 | 8:46 AM

मुंबई : बीडच्या पालकमंत्र्यांनी (पंकजा मुंडे) भाजपला मतदान न होणाऱ्या बूथची यादी मागवल्याचा गंभीर आरोप विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते आणि राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांनी केला. तसेच, ईव्हीएम हॅकिंगचा संशयही धनंजय मुंडे यांनी व्यक्त केला आहे. धनंजय मुंडे यांनी ‘टीव्ही 9 मराठी’शी खास बातचीत केली.

धनंजय मुंडे नेमकं काय म्हणाले?

“तुम्हा माध्यमांसमोर येण्याआधी बीडमधून मला अशी माहिती मिळाली की, तिथले पालकमंत्री त्यांच्या कार्यकर्त्यांना विचारत आहेत की, जिथे भारतीय जनता पार्टीला परंपरागत मतदान मिळत नाही, त्या बूथची यादी द्या. ती यादी कशासाठी? ज्या गावामध्ये भाजपला मतदान मिळत नाहीत, त्या बूथ क्रमांकाची यादी तुम्हाला कशाला पाहिजे? आज तीन दिवसांवर मतमोजणी आलीय. हे एकट्या बीडमध्येच नाही. अनेक ठिकाणी अशाच पद्धतीने चालू आहे. ईव्हीएम हॅकिंगचा पुन्हा काही प्रयत्न चालू आहे का? ईव्हीएम हॅकिंगसंदर्भात काही विषय चालू आहे का?” – धनंजय मुंडे, विरोधी पक्षनेते, विधानपरिषद

धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे हे चुलत भाऊ-बहीण आहेत. मात्र, धनंजय मुंडे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये, तर पंकजा मुंडे भाजपमध्ये आहे. धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे दोघेही एकमेकांचे कट्टर राजकीय वैरी आहेत. बीडमधील राजकारणही या दोन मुंडे भाऊ-बहिणींभोवतीच फिरत असतं.

बीडमध्ये लोकसभा निवडणुकीची काय स्थिती?

महाराष्ट्रातील राजकारणाच्या दृष्टीने मुंडे हे सर्वात मोठे नाव आहे. दिवंगत गोपीनाथ मुंडे यांच्या अपघाती निधनानंतर त्यांची कन्या पंकजा मुंडे यांनी कमान सांभाळली. बीडमध्ये यंदाच्या निवडणुकीत उमेदवार वेगळे असले, तरी खरी लढत पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे या चुलत भावंडातच होती.

बीड लोकसभा मतदारसंघात भाजपकडून डॉ प्रीतम मुंडे, राष्ट्रवादी काँग्रेसकडून बजरंग सोनवणे आणि वंचित बहुजन आघाडी कडून प्रा. विष्णू जाधव हे निवडणूक रिंगणात आहेत. भाजप आणि राष्ट्रवादी यांच्यात प्रमुख लढत झाली.

बीड लोकसभा मतदारसंघात दुसऱ्या टप्प्यात म्हणजेच 18 एप्रिलला मतदान झालं. यंदा बीडमध्ये 66.6 टक्के मतदानाची नोंद झाली होती. या मतदारसंघात 2014 च्या तुलनेत मतदानाचा टक्का 2 टक्क्यांनी वाढला आहे. शिवाय पहिल्यांदाच जातीय समीकरण घुसल्याने त्यामुळे या मतदारसंघात मतदानापासून निकालापर्यंत धाकधूक वाढली आहे.

VIDEO : पाहा काय म्हणाले धनंजय मुंडे?

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.