चंद्रकांतदादांची सगळी ‘माया’ कुठंय हे मला ठाऊक : हसन मुश्रीफ
चंद्रकांतदादा पाटील मला विकावं लागेल असं म्हणत असले तरी त्यांची माया कुठं आहे मला माहिती आहे," असा टोला हसन मुश्रीफ यांनी लगावला. (Hasan Mushrif Answer Chandrakant Patil taunt)
कोल्हापूर : हसन मुश्रीफ यांनी माझ्यावर अब्रुनुकसानीचा दावा केला आणि मी हरलो तर त्यांना मलाच विकून पैसे वसूल करावे लागतील, असे वक्तव्य भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी केले होते. या वक्तव्यावर ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी प्रत्युत्तर दिले आहे. चंद्रकांतदादा पाटील मला विकावं लागेल असं म्हणत असले, तरी त्यांची माया कुठं आहे हे मला माहिती आहे, असे हसन मुश्रीफ म्हणाले. (NCP leader Hasan Mushrif Answer Chandrakant Patil taunt)
“चंद्रकांत पाटील यांच्यावर वेगवेगळे तीन अब्रूनुकसानीचे दावे केले आहेत. चंद्रकांतदादा पाटील मला विकावं लागेल असं म्हणत असले तरी त्यांची माया कुठं आहे मला माहिती आहे,” असा टोला हसन मुश्रीफ यांनी लगावला.
“मी पुन्हा येईन म्हणून काहीही होणार नाही”
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी भाजप नेत्यांचे कान टोचले आहेत. भाजपचे नेते सहकार्य करण्याऐवजी आडमुठी भूमिका घेतात. मी पुन्हा येईन म्हणून काही होणार नाही, असा खोचक टोलाही त्यांनी देवेंद्र फडणवीसांना लगावला.
चंद्रकांत पाटील काय म्हणाले होते?
हसन मुश्रीफ यांनी माझ्यावर अब्रुनुकसानीचा दावा केला आणि मी हारलो तर त्यांना मलाच विकून पैसे वसूल करावे लागतील, असे वक्तव्य भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी केले. हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांनी माझ्यावर खुशाल अब्रुनुकसानीचा दावा दाखल करावा. मी त्याला घाबरत नाही. पण माझी सर्व प्रॉपर्टी विकली तर 100 कोटी काय 1 कोटीही मिळणार नाहीत. त्यामुळे हा खटला हसन मुश्रीफ यांनी जिंकला तर त्यांना मलाच विकावं लागेल, असे चंद्रकांत पाटील यांनी म्हटले होते.
राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी सर्वप्रथम मराठा आरक्षणाच्या विषयावर बोललं पाहिजे. राज्य सरकार मराठा आरक्षणासाठी नव्या मागासवर्गीय आयोगाची स्थापना करत आहे, ही चांगली गोष्ट आहे. पण त्यासाठी सरकारने चांगले निवृत्त न्यायमूर्ती नेमावेत. गायकवाड आयोगाने ज्या निष्ठेने काम केले, तसेच काम आताही झाले पाहिजे, असे चंद्रकांत पाटील यांनी सांगितले. (NCP leader Hasan Mushrif Answer Chandrakant Patil taunt)
मराठा आरक्षणासाठी पुनर्विचार याचिका दाखल करणार; विजय वडेट्टीवारांचं मोठं विधानhttps://t.co/pA2AdbD2fY#vijaywadettiwar | #congress | #maratharesrvation | #maratha | #Maharashtra | #SupremeCourt
— TV9 Marathi (@TV9Marathi) May 10, 2021
संबंधित बातम्या :
वेळ आली तर हसन मुश्रीफांना मलाच विकावं लागेल: चंद्रकांत पाटील
चंद्रकांत पाटलांना एवढी मस्ती कुठून आली, हसन मुश्रीफांची टीका
Special Report | चंद्रकांत पाटलांनी भुजबळांची माफी मागावी, मुश्रीफांची मागणी
चंद्रकांत पाटलांना चोंबडेपणा करण्याची गरज काय?; हसन मुश्रीफ यांचा सवाल