महाराष्ट्रात घडलं तेच अमेरिकेतही घडेल; जो बायडन यांच्या ‘सातारा स्टाईल’ भाषणावर रोहित पवारांचं वक्तव्य

२०१९ ला हे महाराष्ट्राने बघितलंय आणि आता अमेरिकेतही हाच अंदाज आहे. | Rohit Pawar

महाराष्ट्रात घडलं तेच अमेरिकेतही घडेल; जो बायडन यांच्या 'सातारा स्टाईल' भाषणावर रोहित पवारांचं वक्तव्य
Follow us
| Updated on: Oct 30, 2020 | 4:31 PM

मुंबई: अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीतील (US Presidential Election 2020) डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिस्पर्धी जो बायडेन यांचे फ्लोरिडातील भाषण सध्या सोशल मीडियावर चांगेलच चर्चेत आहे. फ्लोरिडात जो बायडन यांचे भाषण सुरु असताना पावसाला सुरूवात झाली. परंतु त्यांनी आपलं भाषण न थांबवता ते सुरूच ठेवले. यामुळे अनेकांना शरद पवार यांच्या साताऱ्यातील ऐतिहासिक सभेची आठवण झाली. या पार्श्वभूमीवर शरद पवार यांचे नातू आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार यांनी ट्विट करुन आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. (Rohit Pawar on Joe biden rally in Florida)

जेव्हा सभेत जोरदार पाऊस येतो पण नेता आणि जनता तसूभरही विचलित होत नाही तेव्हा तो पाऊस जुन्याला वाहून लावण्यासाठी आणि नव्याला न्हाऊ घालण्यासाठी आलेला असतो, असंच म्हणावं लागेल. २०१९ ला हे महाराष्ट्राने बघितलंय आणि आता अमेरिकेतही हाच अंदाज आहे, असे रोहित पवार यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.

अमेरिकेतील राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीचा प्रचार आता शिगेला पोहोचला आहे. या निवडणुकीसाठी 3 नोव्हेंबरला मतदान होणार असून 4 नोव्हेंबरला अमेरिकेचा नवा राष्ट्राध्यक्ष निवडला जाईल. त्यामुळे अमेरिकेचे विद्यमान राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि डेमोक्रॅटिक पक्षातील त्यांचे प्रतिस्पर्धी जो बायडेन प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात संपूर्ण ताकद पणाला लावताना दिसत आहेत.

डोनाल्ड ट्रम्प आणि जो बायडेन या दोन्ही नेत्यांनी नुकत्याच फ्लोरिडात सभा घेतल्या. यापैकी जो बायडेन यांची सभा सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे. फ्लोरिडात जो बायडन यांचे भाषण सुरु असताना पावसाला सुरूवात झाली. परंतु त्यांनी आपलं भाषण न थांबवता ते सुरूच ठेवले. या सभेनंतर जो बायडेन यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून हा फोटो शेअर केला. ‘वादळ संपेल आणि नवीन दिवसाची सुरुवात होईल’, अशी कॅप्शन जो बायडेन यांनी फोटोखाली लिहली आहे.

संबंधित बातम्या:

पवारांइतकेच ‘पावसाळे’ पाहिलेला अमेरिकेचा योद्धा, बायडेन यांच्या सभेत ‘साताऱ्या’च्या सभेचा फील

Sharad Pawar Satara Rain Speech | भरपावसातील शरद पवारांच्या सभेची वर्षपूर्ती, राष्ट्रवादीने भाजपला पुन्हा डिवचलं

(Rohit Pawar on Joe biden rally in Florida)

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.