Sharad Pawar Meet Sanjay Raut | शरद पवार संजय राऊतांच्या भेटीला, प्रकृतीची विचारपूस, सोबतच राजकीय चर्चा?
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांची भेट घेतली. (Sharad Pawar Meet Sanjay Raut)
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांची भेट घेतली. संजय राऊत यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी शरद पवारांनी ही भेट घेतल्याचे सांगितले आहे. नुकतंच संजय राऊत यांच्यावर अँजिओप्लास्टी शस्त्रक्रिया यशस्वीरित्या करण्यात आली होती. यानंतर काल (5 डिसेंबर) संजय राऊत यांना लीलावती रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. (Sharad Pawar Meet Sanjay Raut)
मिळालेल्या माहितीनुसार, शरद पवार हे सिल्व्हर ओक या निवासस्थानावरुन संजय राऊतांच्या घरी जाण्यासाठी रवाना झाले. शरद पवारांसोबतच उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री धनंजय मुंडे यांसह दिग्गज नेते यावेळी उपस्थित होते. संजय राऊतांवर अँजिओप्लास्टी शस्त्रक्रिया झाल्यामुळे राष्ट्रवादीच्या दिग्ग्ज नेत्यांनी त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. यावेळी अनेक राजकीय विषयांवरही चर्चा करण्यात आल्याचे बोललं जात आहे.
संजय राऊतांवर बुधवारी शस्त्रक्रिया
संजय राऊत यांच्यावर बुधवारी (2 डिसेंबर) लीलावती रुग्णालयात अँजिओप्लास्टी शस्त्रक्रिया पूर्ण झाली आहे. काही वेळापूर्वीच ही शस्त्रक्रिया पूर्ण झाली आहे. यावेळी दोन स्टेन त्यांच्या ह्रदयात टाकण्यात आले असल्याची माहिती डॉक्टरांकडून देण्यात आली आहे. खरतंर, गेल्यावर्षी नोव्हेंबर महिन्यात झालेल्या अँजिओप्लास्टीवेळी एकूण तीन स्टेन टाकण्यात आले होते. यातील एक स्टेन खराब झाल्यामुळे आता पुन्हा एकदा शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. (Sharad Pawar Meet Sanjay Raut)
डॉक्टरांनी तो स्टेन काढून त्याजागी नवा स्टेन टाकला आहे. अँजिओप्लास्टी शस्त्रक्रियेत एकूण 2 स्टेन टाकण्यात आले. डॉ. मॅथ्यू आणि डॉ अजित मेनन यांनी ही शस्त्रक्रिया केली. तर शस्त्रक्रियेनंतर संजय राऊत यांची प्रकृती स्थिर असल्याचंही डॉक्टरांनी सांगितलं आहे. तर सध्या ते ICU मध्ये आहेत. त्यांना दुपारी ICU तून नॉर्मल वॉर्डमध्ये आणण्यात येणार आहे.
गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात संजय राऊत यांच्यावर हृदयात दोन स्टेन घालण्यात आल्या होत्या. त्यानंतर आणखी स्टेन टाकावे लागणार होते. त्यासाठी एप्रिल 2020 ही नियोजित वेळ होती. पण कोव्हिड प्रादुर्भावामुळे ही शस्त्रक्रिया पुढे ढकलण्यात आली होती.
डॉ मॅथ्यू हे प्रसिद्ध हृदयविकार तज्ज्ञ आहेत. डॉ. अजित मेनन हे सुद्धा मुंबईस्थित हृदयविकार तज्ज्ञ आहेत. यापूर्वीही डॉ. मॅथ्यू आणि डॉ. मेनन यांनीच संजय राऊत यांच्यावर अँजिओप्लास्टी शस्त्रक्रिया केली होती. (Sharad Pawar Meet Sanjay Raut)
संबंधित बातम्या :
Sanjay Raut | संजय राऊतांना लीलावती रुग्णालयातून डिस्चार्ज, डॉक्टरांकडून आराम करण्याचा सल्ला