काहीजण पराभवाच्या वर्षपूर्तीसाठी बीडमध्ये येऊन गेले; धनंजय मुंडेंचा पंकजाताईंना टोला

वर्षभर बीड जिल्ह्यातील मातीतील माणसाची कोणालाही आठवण नसते. | Dhananjay Munde

काहीजण पराभवाच्या वर्षपूर्तीसाठी बीडमध्ये येऊन गेले; धनंजय मुंडेंचा पंकजाताईंना टोला
Follow us
| Updated on: Oct 26, 2020 | 8:13 PM

बीड: काहीजण फक्त पराभवाच्या वर्षपूर्तीसाठी बीड जिल्ह्यात येतात, असा सणसणीत टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार धनंजय मुंडे यांनी पंकजा मुंडे यांना लगावला. कोरोनाची दुसरी लाट कधी येईल, हे माहिती नाही. त्यामुळे आजही आपल्याला आरोग्याची काळजी घेणे महत्त्वाचे आहे. मात्र, कोरोनाच्या संकटामुळे आम्ही जनतेच्या सेवेत कमी पडलो, असं तुम्हाला जाणवलं का? काहीजणं पराभवाचं वर्ष साजरं करायलाच जिल्ह्यामध्ये येतात. वर्षभर या मातीतील माणसाची कोणालाही आठवण नसते, असे धनंजय मुंडे यांनी म्हटले. (Dhananjay Munde taunts Pankaja Munde)

गेल्यावर्षीच्या विधानसभा निवडणुकीत परळी मतदारसंघातील लढतीत धनंजय मुंडे यांनी पंकजा यांचा पराभव केला होता. तेव्हापासून पंकजा मुंडे या बीडमध्ये फारशा फिरकल्या नव्हत्या. अखेर अतिवृष्टीग्रस्त भागाच्या दौऱ्याच्यानिमित्ताने पंकजा मुंडे यांना तब्बल आठ महिन्यानंतर बीड जिल्ह्यात येण्याचा मुहूर्त सापडला होता. हाच धागा पकडत धनंजय मुंडे यांनी बीडमधील एका कार्यक्रमात पंकजा यांना टोला लगावला.

विशेष म्हणजे पंकजा मुंडे बऱ्याच दिवसांनी बीड जिल्ह्यात आल्या तेव्हा कार्यकर्त्यांनी ढोल-ताशांच्या गजरात, बँड वाजवत, फटाके फोडून मोठ्या जल्लोषात त्यांचे स्वागत केले. यावेळी सर्वांना शेतकऱ्यांच्या दु:खाचाही विसर पडला होता. भाजप कार्यकर्त्यांनी पंकजा मुंडे यांचं जालना-बीड सीमेवर जंगी स्वागत केलं. यावेळी कार्यकर्त्यांची प्रचंड गर्दी उसळली होती. त्यामुळे सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचा फज्जा उडाला होता.

यानंतर दसरा मेळाव्यासाठीही पंकजा मुंडे बीडमध्ये आल्या होत्या. यावेळी त्यांनी नेहमीप्रमाणे जोरदार राजकीय फटकेबाजीही केली होती. हे भाषण तडाखेबंद होते, अनेक लोकांनी सोशल मीडियावरून ते पाहिले, असा दावाही स्वत: पंकजा मुंडे यांनी केला होता. त्यांनी निवडणुकीत झालेल्या पराभवावरही भाष्य केलं. “जिंदगी की रेस में जो आपको दौडकर हरा नहीं सकते, वो आपको तोडकर हरानेकी कोशिश करते हैं”, मी कितीही धावायला तयार आहे पण तुटालया तयार नाही, असे पंकजा मुंडे यांनी म्हटले होते.

संबंधित बातम्या:

दसरा मेळावा एकदा शिवाजी पार्क भरवायचंय, गोपीनाथ मुंडेंच्या आठवणींनी पंकजा मुंडेंना अश्रू अनावर

Pankaja Munde | दसरा मेळावा | ‘जो दौड कर हरा नहीं सकते, वो तोड कर हराते हैं’; पंकजा मुंडेंचा घणाघात

दसरा मेळाव्यातील गर्दी महागात, पंकजा मुंडेंसह 50 कार्यकर्त्यांवर गुन्हा

(Dhananjay Munde taunts Pankaja Munde)

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.