आमदार रमेश कदम पॅरोलवर तुरुंगातून बाहेर, स्वागतासाठी 500 किलोचा हार

अण्णाभाऊ साठे महामंडळ घोटाळाप्रकरणी (Annabhau Sathe Mahamandal Scam) तुरुंगात असलेले राष्ट्रवादीचे आमदार रमेश कदम (NCP MLA Ramesh Kadam) यांच्या स्वागतासाठी चक्क 500 किलोचा हार तयार करण्यात आला आहे.

आमदार रमेश कदम पॅरोलवर तुरुंगातून बाहेर, स्वागतासाठी 500 किलोचा हार
Follow us
| Updated on: Oct 03, 2019 | 5:32 PM

सोलापूर : अण्णाभाऊ साठे महामंडळ घोटाळाप्रकरणी (Annabhau Sathe Mahamandal Scam) तुरुंगात असलेले राष्ट्रवादीचे आमदार रमेश कदम (NCP MLA Ramesh Kadam) यांना न्यायालयाने 3 दिवसांचा पॅरोल मंजूर केला आहे. ते आज तुरुंगाबाहेर आले तेव्हा त्यांच्या समर्थकांनी त्यांच्या स्वागतासाठी चक्क 500 किलोचा हार तयार केला होता. रमेश कदम यांना 3 ते 6 ऑक्टोबर दरम्यान पॅरोल मंजूर आहे. यादरम्यान ते विधानसभा निवडणुकीचा (Maharashtra Assembly Election) उमेदवारी अर्ज भरणार आहेत.

आमदार रमेश कदम यांच्या स्वागतासाठी मोहोळमध्ये हजारो कार्यकर्त्यांनी गर्दी केलेली पाहायला मिळाली. विशेष म्हणजे कदम यांच्यावरील भ्रष्टाचाराच्या आरोपामुळे आणि त्यांच्या तुरुंगवारीमुळे राष्ट्रवादी काँग्रेसने त्यांना उमेदवारी नाकारली आहे. त्यामुळे कदम नव्या पक्षाच्या शोधात आहेत. ते मोहोळ मतदारसंघातून अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याचं सांगितलं जात आहे.

रमेश कदम यांनी याआधी शिवसेनेत जाणार असल्याचे संकेत दिले होते. मात्र, आता वंचित बहुजन आघाडी देखील कदम यांना उमेदवारी देणार असल्याची चर्चा सुरू आहे. मात्र, अद्याप याबाबत कोणतीही अधिकृत माहिती आलेली नाही. त्यामुळे येणाऱ्या 2 दिवसात कदम कोणत्या पक्षाच्या तिकिटावर निवडणूक रिंगणात उतरणार हे स्पष्ट होणार आहे. कोणत्याही पक्षाने उमेदवारी दिली नाही, तर शेवटचा पर्याय म्हणून ते अपक्ष म्हणून निवडणूक लढवण्याचा मार्ग अवलंबणार आहेत.

मोहोळचे आमदार रमेश कदम (MLA Ramesh Kadam in prison) यांची राष्ट्रवादीने हकालपट्टी केलेली आहे. ते तब्बल सव्वाचार वर्षांपासून कारागृहात आहेत. त्यामुळे मोहोळचा कारभार गेल्या सव्वाचार वर्षांपासून आमदाराविना सुरु होता. मात्र, रमेश कदम यंदाही निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत. ते थेट तुरुंगातून निवडणूक लढतील. रमेश कदम हे 2014 मध्ये राष्ट्रवादीच्या तिकिटावर निवडून आले होते. मात्र, त्यांच्यांवर घोटाळ्याचा आरोप झाल्यानंतर राष्ट्रवादीतून त्यांची हकालपट्टी करण्यात आली.

मोदी लाटेतही रमेश कदम यांचा विजय 

2014 च्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत मोदी लाट असतानाही मोहोळ राखीव मतदारसंघातून राष्ट्रवादीने ऐन निवडणुकीच्या काळात लादलेल्या रमेश कदम यांचा विजय झाला होता. तेथील पूर्वाश्रमीचे माजी आमदार राजन पाटील यांचा मतदारसंघावर असलेल्या मजबूत पकडीमुळे रमेश कदम यांचा विजय झाला होता. मात्र, डोक्यात विजयाची हवा शिरलेल्या आमदार रमेश कदम यांनी पक्ष नेतृत्वाला विश्वासात न घेता आपला एकहाती कारभार सुरु ठेवला. लोकप्रतिनिधी आणि प्रशासन या दोन्ही गोष्टींची योग्य सांगड न घालता विधायक राजकारण न करता थेट प्रशासकीय अधिकाऱ्यांना धारेवर धरणे, अधिकाऱ्यांना शिवीगाळ करणे, त्यामुळे रमेश कदम नेहमीच चर्चेत राहिले.

मोहोळ येथील रस्त्यांवर प्रशासनाने लावलेली जाळी काढल्याच्या कारणावरुन सरकारी गुन्हा दाखल झाल्यानंतर अटक होण्यासाठी कार्यकर्त्यांना घेऊन अटक आंदोलनाचं नाट्यही त्यांनी केलं होतं. त्यावेळी आमदार कदम यांच्या कार्यकर्त्यांनी पोलीस स्टेशनवर दगडफेक केली होती. त्यामुळे आमदार महोदयांना काही दिवस न्यायालयीन कोठडीतही राहावं लागलं होतं. त्यानंतर रमेश कदम, अण्णाभाऊ साठे हे महामंडळाच्या साडेचारशे कोटीच्या घोटाळयाप्रकरणी तुरुंगात आहेत. त्यामुळे गेल्या सव्वाचार वर्षांपासून मोहोळच्या लोकांना आमदाराचा चेहराच पाहायला मिळालेला नाही. परिणामी तालुक्याचा विकास थांबला होता.

आमदार रमेश कदम यांच्या कार्यपद्धतीवर स्थानिक राष्ट्रवादीचे नेते कमालीचे नाराज होते. अण्णाभाऊ साठे महामंडळाच्या घोटाळयाप्रकरणी अटक झाल्यानंतर आमदार कदमांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली. तर सत्ता असूनही आमदार नसल्यामुळे विकासाची गाडी थांबल्याचा आरोप मतदारसंघातील नागरिकांनी केला. आमदार नसल्याने जनतेसोबतच सत्तेत असलेल्या स्थानिक भाजपा नेत्यांचीही मोठी अडचण झाली. त्यांना छोट्या-मोठ्या कामांसाठी पालकमंत्र्यापुढे हात पसरावे लागले.

रमेश कदम यांची विकासकामं

आमदार रमेश कदम यांनी घोटाळ्यात अडकण्यापूर्वी सरकारी मंजुरी मिळण्याची वाट न पाहता अनेक विकास कामांचा धडाका लावला होता. मागेल त्याला पाणी, मागेल त्याला बोरवेल, मागेल त्याला टँकर अशा अनेक लोकोपयोगी कामांमुळे मोहोळ येथील लोकांना थोडाफार दिलासा मिळाला. आता मात्र आमदाराचा पत्ता नसल्यामुळे अनेक शिक्षण, आरोग्य, संजय गांधी निराधार योजना, दक्षता कमिटीसारख्या अनेक कमिट्या अद्यापही स्थापन झालेल्या नाहीत. याबाबत मोहोळ तालुक्यातील अनेक सामाजिक संघटनांनी चक्क मुख्यमंत्र्याकडे साकडे घालत मोहोळ तालुका दत्तक घेण्याची मागणी केली होती. मात्र, त्याला कुठलाही प्रतिसाद मिळाला नाही.

संबंधित बातम्या :

टीव्ही 9 मराठीचा सर्वात मोठा पोल, महाराष्ट्रात लाट कुणाची?

राज्य निवडणूक आयोगाचा जोश हाय, यंत्रणा सज्ज, निवडणुकीसाठी 850 कोटीचा खर्च अपेक्षित

विधानसभा निवडणूक 2019 | 21 ऑक्टोबरला मतदान, 24 ऑक्टोबरला मतमोजणी

तुरुंगात असलेल्या रमेश कदमांना लोकसभेसाठी शिवसेनेकडून उमेदवारी पाहिजे

खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.