राष्ट्रवादीच्या आमदाराकडून तालुका अध्यक्षांना चारचाकीचं वाटप! अजितदादांच्या हस्ते चाव्या सुपूर्द
पालघरचे राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हाध्यक्ष आणि आमदार सुनील भुसारा यांच्या औदार्याची चर्चाही आता जिल्हात रंगत आहे. कारण सुनील भुसारा यांनी आपल्या तालुकाध्यक्षांना चारचाकीचं वाटप केलं आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते तालुकाध्यक्षांना चाव्या सुपूर्द करण्यात आल्या.
पालघर : निवडणुकीच्या काळात किंवा इतर महत्वाच्या क्षणी कार्यकर्ते आणि मतदारांना खूश करण्यासाठी नेतेमंडळी विविध वस्तूंचे वाटप करताना आपल्याला पाहायला मिळतात. त्याची अनेक उदाहरणं महाराष्ट्रातही आहेत. अशावेळी पालघरचे (Palghar) राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हाध्यक्ष आणि आमदार सुनील भुसारा (MLA Sunil Bhusara) यांच्या औदार्याची चर्चाही आता जिल्हात रंगत आहे. कारण सुनील भुसारा यांनी आपल्या तालुकाध्यक्षांना चारचाकीचं वाटप केलं आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या हस्ते तालुकाध्यक्षांना चाव्या सुपूर्द करण्यात आल्या.
राष्ट्रवादी काँग्रेसचे पालघर जिल्ह्याचे अध्यक्ष आणि आमदार सुनील भुसारा यांनी गुरूवारी मोठं औदार्य दाखवलं. भुसारा यांनी स्वखर्चाने जिल्ह्यातील सर्व तालुक्याच्या अध्यक्षांना चारचाकी गाड्या दिल्या. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते या गाड्या तालुकाध्यक्षांना सुपूर्द केल्या. भुसारा यांच्या या औदार्याची चर्चा आता सर्वत्र रंगली आहे.
जनमानसात राष्ट्रवादीचा प्रभाव अधिक बळकट करण्याचा हेतू
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा प्रभाव जनमानसात अधिक बळकट करण्यासाठी पक्षाचे पालघर जिल्हाध्यक्ष आमदार सुनील भुसारा यांनी स्वखर्चातून जिल्ह्यातील तालुकाध्यक्षांना गाडी देण्याची संकल्पना अंमलात आणली. आज राष्ट्रवादी भवन, मुंबई येथे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि पक्षाचे ज्येष्ठ नेते तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते प्रातिनिधीक स्वरूपात यापैकी दोन गाड्यांचे पूजन करून गाडीच्या चाव्या तालुकाध्यक्षांकडे सुपूर्द करण्यात आल्या. यावेळी आमदार दौलत दरोडा, युवक कार्याध्यक्ष सुरज चव्हाण, नाशिक ग्रामीण जिल्हाध्यक्ष रविंद्र पगार, युवक प्रदेश उपाध्यक्ष सत्यजित सिसोदे तसेच पालघर जिल्ह्यातील पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसच्या ट्विटर हँडलवरुन देण्यात आली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा प्रभाव जनमानसात अधिक बळकट करण्यासाठी पक्षाचे पालघर जिल्हाध्यक्ष आमदार सुनील भुसारा यांनी स्वखर्चातून जिल्ह्यातील तालुकाध्यक्षांना गाडी देण्याची संकल्पना अंमलात आणली. pic.twitter.com/e631z8XV0t
— NCP (@NCPspeaks) January 27, 2022
जय पवारांवरील आरोपांबाबत अजित पवार काय म्हणाले?
अजित पवार यांनी पत्रकार परिषद घेतली होती. यावेळी त्यांना किरीट सोमय्यांच्या दाव्याबाबत विचारण्यात आलं. त्यावर अजितदादांनी ही प्रतिक्रिया व्यक्त केली. कायदा सर्व श्रेष्ठ असतो. या देशात नियमाचे उल्लंघन कोण करत असेल तर कायदे आहेत. कायदे पाळले जात नसतील तर खपवून घेतलं जात नाही. पण काही लोकं नुसतंच केवळ विधानं करत असतात. काही चॅनेलने तर कोणत्या दिवशी काय विधाने केली हे दाखवलं आहे. त्यामुळे अशा लोकांना अधिक महत्त्व देण्याची गरज नाही. -उद्या ते कुणाचंही नाव घेणार आणि तुम्ही प्रश्न विचाराल हे योग्य नाही. आम्हाला कुणाच्या कुटुंबीयांबाबत बोलायचं नाही, असं अजित पवार म्हणाले.
इतर बातम्या :