AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

जसे आम्ही 105 आमदारांवर भारी; तसे चार खासदार 303 वर भारी, पवारांना डिवचणाऱ्या पडळकरांना राष्ट्रवादीचे उत्तर

आश्रममधील जपनामवाला भुपा आणि साहेबांवर टीका करणारा (भा)जपनामवाला गोपा सारखेच" अशी फटकेबाजी मिटकरींनी केली.

जसे आम्ही 105 आमदारांवर भारी; तसे चार खासदार 303 वर भारी, पवारांना डिवचणाऱ्या पडळकरांना राष्ट्रवादीचे उत्तर
| Updated on: Nov 23, 2020 | 3:38 PM
Share

मुंबई : “जसे महाविकास आघाडीचे 56/55/44 आमदार भाजपच्या 105 ना भारी पडले, तसे राष्ट्रवादीचे चार खासदार भाजपच्या 303 खासदारांना भारी पडतात” असं म्हणत राष्ट्रवादीचे विधानपरिषदेवरील आमदार अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांनी भाजपचे विधानपरिषद आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांना टोला लगावला. (NCP MLC Amol Mitkari taunts BJP MLC Gopichand Padalkar who criticized Sharad Pawar)

“इकडे 4 खासदार 303 ला भारी. जसे 56/55/44 (105) ला भारी. बारामतीत डिपॉझिट का जप्त झालं, यावर भाष्य केलं असतं, तर समजू शकलो असतो. प्रसिद्धी पिसाटांना थोडं चर्चेत राहायला अधून मधून मानसिक झटके येतात. आश्रममधील जपनामवाला भुपा आणि साहेबांवर टीका करणारा (भा)जपनामवाला गोपा सारखेच” अशी फटकेबाजी मिटकरींनी केली.

“ज्यांच्या डोक्याच्या गोळ्या संपल्यात अशा वाचाळवीरांनी औकात पाहून साहेबांवर बोलावं. राहिला मोदींचा प्रश्न तर त्यांना विचार तुमचा गुरु व मार्गदर्शक कोण?” असा सवालही मिटकरींनी केला.

गेल्या वर्षी विधानसभा निवडणुकीत गोपीचंद पडळकर भाजपच्या तिकीटावर बारामतीतून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विरोधात मैदानात उतरले होते. मात्र अजित पवारांनी विक्रमी मताधिक्याने निवडून येत पडळकरांचं डिपॉझिट जप्त केलं, याचा संदर्भ मिटकरींनी जोडला आहे.

‘आश्रम’ या बहुचर्चित वेब सीरिजमधील अभिनेता बॉबी देवलने साकारलेल्या भूपा स्वामी या व्यक्तिरेखेचा उल्लेखही मिटकरींनी पडळकरांवर टीकास्त्र सोडताना केला आहे.

“ज्या पक्षाचे 4 खासदार निवडून येतात, त्यांना लोकनेता म्हणता, मग 303 खासदार निवडून देणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदींना काय म्हणायचं? तुम्ही मोदींवर टीका करता, मग आम्ही तुमच्यावर टीका केली तर इतका त्रागा का करता?” असा सवाल भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी शरद पवार यांचे नाव न घेता केला होता.

संबंधित बातम्या :

4 खासदार निवडून येणाऱ्या पक्षाचा लोकनेता, मग 303 खासदार निवडून देणारे मोदी कोण?, पडळकरांचा पलटवार

बिहार निवडणुकीच्या निकालांवरुन प्रवीण दरेकर-अमोल मिटकरी आमने-सामने

(NCP MLC Amol Mitkari taunts BJP MLC Gopichand Padalkar who criticized Sharad Pawar)

तेजस्वी घोसाळकरांनी भाजपात प्रवेश करण्याचं थेट सांगितलं कारण
तेजस्वी घोसाळकरांनी भाजपात प्रवेश करण्याचं थेट सांगितलं कारण.
मनपा निवडणुकांच्या तारखा आज जाहीर होणार? आयोगाची 4 वाजता पत्रकार परिषद
मनपा निवडणुकांच्या तारखा आज जाहीर होणार? आयोगाची 4 वाजता पत्रकार परिषद.
ही उद्धव ठाकरेंची मोठी चूक, ठाकरे बंधूंच्या युतीवर आठवलेंचं मोठं विधान
ही उद्धव ठाकरेंची मोठी चूक, ठाकरे बंधूंच्या युतीवर आठवलेंचं मोठं विधान.
मुंबईला वाचवणारी महायुतीच धुरंधर... एकनाथ शिंदेंचा बाण उद्धव ठाकरेंवर
मुंबईला वाचवणारी महायुतीच धुरंधर... एकनाथ शिंदेंचा बाण उद्धव ठाकरेंवर.
तयारीत राहा...राज्य निवडणूक आयोगाचे आदेश, निवडणुकांच्या तयारीला वेग
तयारीत राहा...राज्य निवडणूक आयोगाचे आदेश, निवडणुकांच्या तयारीला वेग.
अ‍ॅनाकोंडा ते गांडुळाची औलाद...ठाकरेंची पुन्हा शाहांसह शिंदेंवर टीका
अ‍ॅनाकोंडा ते गांडुळाची औलाद...ठाकरेंची पुन्हा शाहांसह शिंदेंवर टीका.
पालिका निवडणुकीपूर्वी तेजस्वी घोसाळकरंचा ठाकरे सेनेला जय महाराष्ट्र!
पालिका निवडणुकीपूर्वी तेजस्वी घोसाळकरंचा ठाकरे सेनेला जय महाराष्ट्र!.
ओबीसी नेते मंगेश ससाणे यांच्या कारवर बीडमध्ये हल्ला, विधानसभेत पडसाद
ओबीसी नेते मंगेश ससाणे यांच्या कारवर बीडमध्ये हल्ला, विधानसभेत पडसाद.
शालेय पोषण आहारात 1800 कोटीचा घोटाळा? ठाकरेगटाच्या आमदाराचा गंभीर आरोप
शालेय पोषण आहारात 1800 कोटीचा घोटाळा? ठाकरेगटाच्या आमदाराचा गंभीर आरोप.
नागपूर अधिवेशनात अजित दादांच्या NCP ची संघाच्या बौद्धिकाकडे यंदाही पाठ
नागपूर अधिवेशनात अजित दादांच्या NCP ची संघाच्या बौद्धिकाकडे यंदाही पाठ.