संजय राऊत म्हणाले, उद्धव ठाकरेंनी राष्ट्रीय नेतृत्व करावं, अमोल कोल्हे म्हणतात, अभिमान असेल, पण…

संजय राऊत यांनी जे वक्तव्य केलं त्याबद्दल आशावादी असायला काहीच हरकत नाही. कोणती ही मराठी व्यक्ती पंतप्रधानपदी बसली तर प्रत्येक मराठी माणसाला त्याचा अभिमानच असेल, आनंदच होईल..., असं अमोल कोल्हे म्हणाले.

संजय राऊत म्हणाले, उद्धव ठाकरेंनी राष्ट्रीय नेतृत्व करावं, अमोल कोल्हे म्हणतात, अभिमान असेल, पण...
डॉ. अमोल कोल्हे आणि उद्धव ठाकरे
Follow us
| Updated on: Jul 29, 2021 | 9:37 AM

नवी दिल्ली : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांचा नुकताच वाढदिवस पार पडला. त्यांच्या वाढदिवसाला शुभेच्छा देताना शिवसेना नेते खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी उद्धव ठाकरेंनी राष्ट्रीय नेतृत्व करावं, अशा शब्दात शुभेच्छा दिल्या. त्यांच्या शुभेच्छांवर विविध नेत्यांनी आतापर्यंत प्रतिक्रिया दिल्या आहेत. आता राष्ट्रवादीचे नेते खासदार डॉ. अमोल कोल्हे (Amol Kohle) यांनीही यावर आपलं मत व्यक्त केलंय. मला अभिमान असेल पण सगळ्या विरोधी पक्षांची भूमिका आणि राष्ट्रवादीसह पक्षेश्रष्ठींची भूमिका काय असेल हे माहिती नाही पण ती महत्त्वाची असेल, असं अमोल कोल्हे म्हणाले.

काय म्हणाले डॉ. अमोल कोल्हे?

संजय राऊत यांनी जे वक्तव्य केलं त्याबद्दल आशावादी असायला काहीच हरकत नाही. कोणती ही मराठी व्यक्ती पंतप्रधानपदी बसली तर प्रत्येक मराठी माणसाला त्याचा अभिमानच असेल, आनंदच होईल…, असं ते म्हणाले. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात मला कायम सुसंस्कृतपणा आणि संयमीपणा दिसला आहे, असंही कोल्हे म्हणाले.

संजय राऊत यांनी जो आशावाद व्यक्त केला आहे त्या बद्दल त्यांना शुभेच्छा… मात्र पण सगळ्या विरोधी पक्षांची भूमिका आणि राष्ट्रवादीसह पक्षेश्रष्ठींची भूमिका काय असेल हे माहिती नाही पण ती महत्त्वाची असेल, असंही ते म्हणाले.

विरोधकांचा चेहरा कोण हा मुद्दा गौण, सरकारला चाप बसणं गरजेचं

देशाच्या दृष्टीने आता विरोधकांचा चेहरा कोण हा मुद्दा गौण ठरतो आहे आणि सरकारच्या या एक कलमी कार्यक्रमाला चाप बसवणं गरजेचे आ. अशा काळात विरोधी पक्षाने एकत्र येणे हे आशादायी चित्र आहे,  असंही खासदार कोल्हे म्हणाले.

सरकारने चर्चेपासून पळ काढू नये

सरकार संसदेत चर्चेतून पळ काढताना दिसत आहे. संसदेची कार्यवाही चालवणं हे सत्ताधारी पक्षाचं काम आहे. कामकाज सुरू होण्याची नितांत आवश्यकता आहे. पण ही जबाबदारी सत्ताधाऱ्यांची आहे. चर्चेला जर सत्ताधारी तयार झाले तर अनेक प्रश्नांवर सांगोपांग चर्चा होईल. सरकार जर चर्चेतून पळ काढत असेल तर जनतेचे प्रश्न मांडताना अडचणी येतील, असं ते म्हणाले.

जनतेच्या मुद्द्यांवर संसदेत चर्चा झालीच पाहिजे

पेगसेस, कोविडची तिसरी लाट, प्रचंड वाढलेली महागाई, कृषी कायदे या विषयांवर संसदेत चर्चा झालीच पाहिजे. सरकार म्हणत असेल की हाऊसमध्ये काम रेटून नेऊ पण आमचा याला जोरदार विरोध असेल, असा पवित्राही कोल्हे यांनी घेतला.

(NCP MP Amol Kolhe Comment On Sanjay Raut Uddhav Thackeray)

हे ही वाचा :

उद्धव ठाकरेंमध्ये देशाचं नेतृत्व करण्याची क्षमता, तो दिवस लवकरच उगवेल; संजय राऊतांचं ट्विट

राऊत म्हणतात, उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रीय स्तरावर नेतृत्व करावं; शरद पवार म्हणाले…

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.