AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Amol Kolhe: डॉक्टर, अभिनेता ते खासदार; वाचा कोण आहेत खासदार अमोल कोल्हे?

डॉ. अमोल कोल्हे यांचा जन्म पुणे जिल्ह्यातील नारायणगाव येथे झाला. त्यांनी बारावीपर्यंतचे शिक्षण पुण्यातच घेतले. | NCP MP Amol Kolhe

Amol Kolhe: डॉक्टर, अभिनेता ते खासदार; वाचा कोण आहेत खासदार अमोल कोल्हे?
डॉ. अमोल कोल्हे, खासदार, राष्ट्रवादी काँग्रेस
| Updated on: Apr 28, 2021 | 4:45 PM
Share

मुंबई: 2019 सालच्या लोकसभा निवडणुकीत शिरुर मतदारसंघात शिवसेनेच्या शिवाजीराव अढळराव पाटील यांना धूळ चारून जायंट किलर ठरलेले राष्ट्रवादीचे खासदार डॉ. अमोल कोल्हे (Amol Kolhe) हे कायमच चर्चेचा विषय असतात. एक डॉक्टर, त्यानंतर अभिनय क्षेत्रातील दमदार कामगिरी आणि आता थेट खासदार हा त्यांचा प्रवास अनेकांसाठी प्रेरणादायी आहे. (NCP MP Amol Kolhe journey from doctor, actor to law maker)

स्वराज्य रक्षक संभाजी या मालिकेने डॉ. अमोल कोल्हे यांचा प्रचंड प्रसिद्धी मिळवून दिली. त्यामुळे गेल्या काही काळात ग्रामीण भागात अमोल कोल्हे यांचा मोठा चाहतावर्ग तयार झाला आहे. अनेक ऐतिहासिक भूमिका साकारल्यामुळे नागरिक त्यांच्याकडे कायम आदराने पाहतात. याच इमेजचा फायदा उठवत अमोल कोल्हे यांनी मोदी लाटेतही लोकसभेची निवडणूक जिंकली. 2019 मध्ये महाराष्ट्रातून राष्ट्रवादी काँग्रेसचे केवळ 4 खासदार निवडून आले. यामध्ये अमोल कोल्हे यांचा समावेश आहे. आतादेखील ते जेव्हा एखाद्या मुद्द्यावर बोलतात तेव्हा ग्रामीण भागात त्याची बऱ्यापैकी चर्चा रंगते.

कोण आहेत डॉ. अमोल कोल्हे?

डॉ. अमोल कोल्हे यांचा जन्म पुणे जिल्ह्यातील नारायणगाव येथे झाला. त्यांनी बारावीपर्यंतचे शिक्षण पुण्यातच घेतले. त्यानंतर मुंबईत त्यांनी डॉक्टरी पेशाचे शिक्षण घेतले. सेठ गोवर्धनदास सुंदरदास (जी.एस.) महाविद्यालयातून एमबीबीएस झाल्यानंतर त्यांनी काळात पुण्यात डॉक्टर म्हणून प्रॅक्टिसही केली.

मात्र, त्यानंतर अमोल कोल्हे अभिनय क्षेत्राकडे वळले. त्यांनी अनेक मालिका आणि नाटकांमधून काम केले. मात्र, झी मराठीवरील स्वराज्यरक्षक संभाजी या मालिकेने त्यांना लोकप्रियतेच्या शिखरावर नेऊन ठेवले.

अमोल कोल्हे यांची राजकीय कारकीर्द

2014 च्या निवडणुकांपूर्वी डॉ. अमोल कोल्हे यांनी शिवसेनेत प्रवेश केला होता. त्यावेळी अमोल कोल्हे हे शिवसेनेचे स्टार प्रचारक होते. मात्र, 2019 च्या निवडणुकीपूर्वी अमोल कोल्हे यांनी सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का देत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसने लोकसभा निवडणुकीत अमोल कोल्हे यांना शिरुर मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात उतरवले. त्यांच्यासमोर तीन टर्म खासदार राहिलेल्या शिवाजीराव अढळराव पाटील यांचे आव्हान होते.

या निवडणुकीत घोड्यावर बसून प्रचार केला म्हणूनही ते चर्चेत आले. प्रचाराच्या सुरूवातीच्या काळात त्यांच्या जातीचाही उल्लेख करण्यात आला. या सगळ्या आरोपांचं खंडन करत असताना कोल्हे यांनी त्यांचा मालिकेच्या गेटअपमधील कुठलाही फोटो बॅनरवर वापरू नये, असे आवाहन केले होते.

प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात कोल्हे यांनी शिवसेनेवरच गंभीर आरोप केले. सातारा लोकसभा मतदार संघातून उदयनराजे भोसले यांच्याविरुध्द निवडणूक लढण्यास शिवसेनेने सांगितलं होतं. त्यावेळी छत्रपतींच्या गादीशी बेईमानी माझ्याकडून होणार नाही, असं सांगून मी शिवसेनेला रामराम ठोकल्याचा गौप्यस्फोट त्यांनी केला होता.

(NCP MP Amol Khole journey from doctor, actor to law maker)

BMC साठी महायुतीची पहिली बैठक, पहिल्या फेरीत 142 जागांवर तोडगा
BMC साठी महायुतीची पहिली बैठक, पहिल्या फेरीत 142 जागांवर तोडगा.
नाशिक तपोवन परिसरातील प्रस्तावित MICE सेंटरची निविदा अखेर रद्द
नाशिक तपोवन परिसरातील प्रस्तावित MICE सेंटरची निविदा अखेर रद्द.
जब तक सूरज चांद रहेगा, गांधी तेरा... 'मनरेगा'विरोधात संसद भवनला आंदोलन
जब तक सूरज चांद रहेगा, गांधी तेरा... 'मनरेगा'विरोधात संसद भवनला आंदोलन.
लवकरच बॉम्ब फोडणार, त्यांनी कॅश बॉम्ब...शिंदेंच्या आमदाराचा गौप्यस्फोट
लवकरच बॉम्ब फोडणार, त्यांनी कॅश बॉम्ब...शिंदेंच्या आमदाराचा गौप्यस्फोट.
ठाकरेबंधू-शिंदेंची शिवतीर्थसाठी रस्सीखेच, प्रचारसभेसाठी कुणाला परवानगी
ठाकरेबंधू-शिंदेंची शिवतीर्थसाठी रस्सीखेच, प्रचारसभेसाठी कुणाला परवानगी.
BMC साठी महायुतीची पहिली बैठक अन् दादांच्या NCP ला निमंत्रण नाही!
BMC साठी महायुतीची पहिली बैठक अन् दादांच्या NCP ला निमंत्रण नाही!.
गांधी कुटुंबाला दिलासा, ED आरोपपत्राची दखल घेण्यास कोर्टाचा नकार
गांधी कुटुंबाला दिलासा, ED आरोपपत्राची दखल घेण्यास कोर्टाचा नकार.
इलेक्शन जीतकर हम होंगे असली धुरंधर...शिंदेंच्या टीकेवर राऊतांचं उत्तर
इलेक्शन जीतकर हम होंगे असली धुरंधर...शिंदेंच्या टीकेवर राऊतांचं उत्तर.
महायुतीची राज्यात सर्वच ठिकाणी तंतरली... दानवे यांचा सरकारवर निशाणा
महायुतीची राज्यात सर्वच ठिकाणी तंतरली... दानवे यांचा सरकारवर निशाणा.
...तर दिल्लीत आंदोलन करणार; जरांगे पाटील यांचा थेट इशारा, प्रकरण काय?
...तर दिल्लीत आंदोलन करणार; जरांगे पाटील यांचा थेट इशारा, प्रकरण काय?.