भाजपचे दावे खोटे, ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपचा सुपडा साफ : नवाब मलिक
कालच्या निवडणुकीत भाजपचा सुफडा साफ झालाय हे आता समोर आलं आहे. याअगोदर चिन्हावर झालेली निवडणूक त्यांना जिंकता आली नाही, अशी टीका राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री नवाब मलिक यांनी केलीय.
मुंबई : राज्यात ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुका पार पडल्या. सोमवारी राज्यभरातल्या ग्रामपंचायतीचे निकाल आले स्पष्ट झाले आहेत. परंतु विरोधी पक्ष भाजप एक नंबरचा पक्ष ठरलो म्हणून दवंडी पिटत आहे. मात्र त्यांचा हा दावा खोटा आहे. त्यांच्याकडे आता काहीही पर्याय नाही. कालच्या निवडणुकीत भाजपचा सुपडा साफ झालाय हे आता समोर आलं आहे. याअगोदर चिन्हावर झालेली निवडणूक त्यांना जिंकता आली नाही, अशी टीका राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री नवाब मलिक यांनी केलीय. (NCP Nawab Malik Criticized bjp Over Gram panchayat Election result)
ग्रामपंचायत निवडणुकीत 80 टक्के जागा तिन्ही पक्षांनी मिळून जिंकल्या. भाजपची पुरती धुळधाण झालीय. भाजप आता फक्त दावे करुन भ्रम निर्माण करण्याचं काम करत आहे, अशी सडकून टीका मलिक यांनी केली. आमचे काही नेते दबावाखाली सत्तेच्या मोहात भाजपात गेले पण आता हाती काही लागत नाहीये, असंही मलिक म्हणाले.
औरंगाबाद , कोल्हापूर, नवी मुंबई पालिकेच्या निवडणुका होणार आहेत. याबद्दल महाविकास आघाडीत अद्याप निर्णय नाही. सगळ्यांनी एकत्र लढावं ही राष्ट्रवादीची भूमिका आहे पण काही ठिकाणी आमच्यामध्ये आणि काँग्रेसमध्येच वाद आहेत. काही ठिकाणी एकत्र लढू, काही ठिकाणी स्वबळावर लढू, असं मलिक म्हणाले.
संरक्षण क्षेत्राची माहिती लीक होणं गंभीर बाब
पूलवामा, बालाकोट तसंच संरक्षण क्षेत्राबद्दलची माहिती लीक होणं हा गंभीर मुद्दा आहे. राष्ट्रीय सुरक्षेच्या मुद्द्याची माहिती लीक झाली असेल तर केंद्राने कारवाई करायला हवी. त्यासाठी आम्ही विरोधाक म्हणून दबाव निर्माण करु, असंही मलिक म्हणाले.
बेळगावप्रश्नी सरकार सकारात्मक
राज्यातलं महाविकास आघाडी सरकार बेळगावप्रश्नी सकारात्मक आहे. हा प्रश्न सुटावा तसंच बेळगावी, निपाणी आणि मराठी भाषिकांचा महाराष्ट्रात समावेश व्हायला हवा, यासाठी सरकार पावले उचलत आहे. हे प्रकरण सुप्रीम कोर्टात आहे. निकाल आमच्या बाजूने लागेल असा आम्हाला विश्वास आहे, असंही मलिक म्हणाले.
(NCP Nawab Malik Criticized bjp Over Gram panchayat Election result)
हे ही वाचा
मुक्ताईनगरात ग्रामपंचायती 51, सेना-राष्ट्रवादी-भाजपच्या दाव्या-प्रतिदाव्यांमुळे टोटल 90 वर
महाराष्ट्राला एक इंचही जमीन मिळू देणार नाही; कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांचे उद्धव ठाकरेंना प्रत्युत्तर