मुंबई महापालिका एकत्रच लढायची, आमची भूमिका स्पष्ट, राष्ट्रवादीने काँग्रेसला ठणकावलं!

मुंबई महापालिका किंवा महाराष्ट्राबाबत पवारासाहेबांची स्पष्ट भूमिका आहे. आघाडी असताना तिन्ही पक्षांनी एकत्रच निवडणुका लढायला हव्या, असं मंत्री नवाब मलिक म्हणाले.

मुंबई महापालिका एकत्रच लढायची, आमची भूमिका स्पष्ट, राष्ट्रवादीने काँग्रेसला ठणकावलं!
nawab malik
Follow us
| Updated on: Jan 07, 2021 | 7:34 PM

मुंबई :  राज्यात सरकार म्हणून एकत्र काम करत असताना मुंबई महापालिका निवडणूक देखील एकत्रच लढली जावी अशी आमची स्पष्ट भूमिका आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही मुंबई महापालिका निवडणूक एकत्र लढवली पाहिजे, अशी भूमिका घेतलीये, असं स्पष्ट करत राष्ट्रवादीचे नेते मंत्री नवाब मलिक यांनी मुंबई महापालिका निवडणूक स्वतंत्र लढणार म्हणणाऱ्या काँग्रेसला ठणकावलं आहे. (NCp Nawab malik On Mumbai mahapalika Election)

राष्ट्रवादी काँग्रेसची आज एक महत्त्वाची बैठक पार पडली. मुंबईतल्या यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानात राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत ही बैठक संपन्न झाली. या बैठकीला राष्ट्रवादीचे सगळे मंत्री, नेते आणि महत्त्वाचे पदाधिकारी उपस्थित होते. येऊ घातलेल्या महापालिका निवडणुकांचं प्लॅनिंग ते राष्ट्रवादीच्या मंत्र्यांची कामगिरी यावर चर्चा झाली. यानंतर प्रसारमाध्यांशी साधलेल्या संवादात मलिक यांनी बैठकीचा तपशील सांगितला.

नवाब मलिक नेमकं काय म्हणाले?

“शरद पवारांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रवादीच्या मंत्र्यांची बैठक झाली. या बैठकीत राज्यभरात पक्षवाढीसाठी काय कार्यक्रम घ्यायचा, संघटना मजबूत कशी करायची यावर चर्चा झाली. पालकमंत्री, मंत्री यांच्या नेतृत्त्वात काय कामं झाली, याचा आढावा घेण्यात आला. राष्ट्रवादी आणखी कशी मजबूत होईल यावर चर्चा झाली.”

“ग्रामपंचायती निवडणुका पक्षाच्या चिन्हावर होत नाहीत. स्थानिक आघाड्या होतात. त्याबाबत चर्चा झालेली नाही. महापालिका निवडणुका आहेत, विशेषत: औरंगाबाद, मिरा भाईंदर, नवी मुंबई, जिल्हा परिषद भंडारा, गोंदिया याची तयारी कशी करायची याबाबत चर्चा झाली. पुढच्या काही दिवसात कार्यक्रम ठरेल, त्यानुसार नेत्यांना जबाबदारी दिली जाईल.

मुंबई महापालिका किंवा महाराष्ट्राबाबत पवारासाहेबांची स्पष्ट भूमिका आहे. आघाडी असताना तिन्ही पक्षांनी एकत्रच निवडणुका लढायला हव्या. मुख्यमंत्र्यांनीही त्याबाबत सकारात्मक भूमिका घेतली आहे. मुंबई महापालिका तिन्ही पक्षांनी एकत्र लढावी अशी त्यांची भूमिका आहे. आता काँग्रेस नेते बोलत राहात आहेत, पण त्याबाबत अधिकृत चर्चा सुरु झालेली नाही. आमच्या पक्षाची स्पष्ट भूमिका आहे, तिन्ही पक्षांनी एकत्र लढायला हवं, पण काँग्रेसची भूमिका ते ठरवतील. पण आमची भूमिका स्पष्ट आहे.

नामांतर आमच्या अजेंड्यावर नाही

महाविकास आघाडीचं सरकार स्थापन करतेवेळी कॉमन मिनिमम प्रोग्राम ठरला आहे. या प्रोग्राममध्ये नामांतर वगैरे असला विषय आहे. औरंगाबाद नामांतर पक्षाच्या किंवा महाविकास आघाडीच्या अजेंड्यावर नाही, असं नवाब मलिक यांनी स्पष्ट सांगितलं.

(NCp Nawab malik On Mumbai mahapalika Election)

हे ही वाचा

जेव्हा शरद पवारच राष्ट्रवादीच्या मंत्र्यांचा ‘जनता दरबार’ घेतात…

LIVE : नितीन गडकरी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या भेटीला, मंत्रालयात बैठक सुरू

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.