AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

राष्ट्रवादीचं चिन्ह हातचं जाऊ देणार नाही, शरद पवार कडाडले; अजितदादा गटाला फटाकरलं

पुलोदच्या सरकारमध्ये भाजप नव्हता. जनता पक्ष होता. त्यामुळे भाजपसोबत गेलो म्हणणं चुकीचं आहे. तसेच नागालँडच्या शेजारी पाकिस्ताना आणि चीन आहे. त्यामुळे हे राज्य अस्थिर ठेवणं योग्य नसल्यामुळे तिथे भाजपसोबत गेलो, शरद पवार म्हणाले.

राष्ट्रवादीचं चिन्ह हातचं जाऊ देणार नाही, शरद पवार कडाडले; अजितदादा गटाला फटाकरलं
शरद पवारांनी यानंतर 7 जुलै रोजी दिल्लीत बैठक घेतली. याबैठकीत पक्षाकडून कार्यकारी अध्यक्ष प्रफुल्ल पटेल, सुनिल तटकरे आणि एस.आर. कोहली यांची पक्षातून हकालपट्टी केली आहे. Image Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Jul 05, 2023 | 4:44 PM

मुंबई : राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी आज राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या राजकारणाची पोलखोल केली. शरद पवार यांचं राजकारण कसं धरसोडीचं आहे. त्यामुळे राष्ट्रवादीचं किती नुकसान झालं याचा गौप्यस्फोटही केला. एवढंच नव्हे तर अजित पवार यांनी शरद पवार यांना आराम करण्याचा सल्ला दिला. निवृत्त होण्याचा सल्ला दिला. अजित पवार यांच्या या भाषणाची शरद पवार यांनीही चिरफाड केली. जे गेले त्यांना जाऊ द्या. त्याची चिंता करू नका. त्यांना सुखात राहू द्या. महाराष्ट्रात आपण नवीन कर्तृत्वान पिढी तयार करू, असं सांगत अरे पुन्हा आयुष्याच्या पेटवा मशाली, असं आवाहनही शरद पवार यांनी केलं.

शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादीचा मंत्रालयासमोरील यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये मेळावा पार पडला. यावेळी शरद पवार यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधला. चिन्ह कुठे जाणार नाही. चिन्ह काही निवडणूक ठरवत नाही. माझा अनुभव आहे. गाय वासरू, बैलजोडी, चरखा, पंजावर आम्ही निवडणुका लढवल्या आहे. घड्याळ्यावर लढलो. काही फरक पडला नाही. कुणी सांगत असेल चिन्ह आम्ही घेऊन जाऊ तर चिन्हं जाऊ देणार नाही. चिन्ह जाणार नाही. जोपर्यंत सामान्य माणसाच्या अंतकरणात पक्षाचा विचार आहे. तोपर्यंत चिंता करण्याचं कारण नाही, अस शरद पवार म्हणाले.

हे सुद्धा वाचा

मग राष्ट्रवादीला सोबत का घेतलं?

राष्ट्रवादी भ्रष्ट आहे असं वाटतं तर काल राष्ट्वादीलासोबत का घेतलं? म्हणजे हे राज्यकर्ते पाहिजे ते बोलत आहेत. आधार नसलेल्या गोष्टी बोलत आहेत. जनमाणसात वातावरण निर्माण करत आहेत. काही लोकांनी बाजूला जाण्याचा निर्णय घेतला. त्याचं दु:ख आहे. जो राजकीय विचार मान्य नाही. त्याविरोधात जाऊन निवडणुकीत मतं घेतली. आता त्याच लोकांसोबत जाणं ही त्या मतदारांशी प्रतारणा आहे. ज्या विचारधारेला विरोध केला त्याच्यांसोबत जाणं योग्य नाही, असं ते म्हणाले.

त्यांचं नाणं चालणार नाही

अजित पवार गटाच्या बॅनरवर माझा फोटो होता. त्यांना माहीत आहे आपलं नाणं चालणार नाही. त्यामुळे माझा फोटो वापरला. काही लोकांनी भाषणं केली. मला गुरु म्हणाले. पांडुरंग… बडवे… कसले बडवे? कसले काय? पांडुरंगाच्या दर्शनाला कुणाला कोणीही थांबवू शकत नाही. त्यासाठी पंढरपूरलाच जायची गरज नाही. पंढरपूरला गेल्यावर बाहेरून दर्शन घेतात आणि आनंदात जातात. पांडुरंग म्हणायचं गुरू म्हणायचं आणि आमच्याकडे दुर्लक्ष झालं असं सांगायचं. गंमतीची गोष्ट आहे, असंही ते म्हणाले.

बघून येतो म्हणून गेला अन्…

एक नेते तुरुंगात गेले. सहा महिने आत होते. आम्ही त्यांच्यासाठी प्रयत्न केला. ते तुरुंगातून आल्यावर अनेकांनी म्हटलं त्यांना संधी देऊ नका. ते तुरुंगात गेलेले आहेत. निकाल लागेपर्यंत त्यांना तिकीट नको. मी म्हटलं त्यांच्यावर अन्याय होऊ देणार नाही. त्यांना तिकीट दिलं. त्यांना मंत्री केलं. पहिल्या दोन मंत्र्यांमध्ये त्यांचं नाव होतं. त्यांचा दोन दिवसांपूर्वी फोन आला. सकाळी म्हणाले, काय चाललंय. बघतो. जातो. बघून येतो म्हणून गेले अन् मंत्रीपदाची शपथ घेतली, असंही त्यांनी सांगितलं.

पाकिस्तान बॅकफूटवर, 5 वाजेपासून युद्धविराम, दोन्ही देशांकडून सहमती अन
पाकिस्तान बॅकफूटवर, 5 वाजेपासून युद्धविराम, दोन्ही देशांकडून सहमती अन.
भारत-पाक तणावादरम्यान मुंबईकरांसाठी मोठी बातमी, आता 9 जूनपर्यंत....
भारत-पाक तणावादरम्यान मुंबईकरांसाठी मोठी बातमी, आता 9 जूनपर्यंत.....
मोदी सरकारचा दहशतवादाविरुद्ध मोठा निर्णय, यापुढे तसं कृत्य युद्ध ठरेल
मोदी सरकारचा दहशतवादाविरुद्ध मोठा निर्णय, यापुढे तसं कृत्य युद्ध ठरेल.
भारतीय लष्कराकडून सैन्याच्या शौर्याचा व्हिडीओ शेअर, एकदा बघाच...
भारतीय लष्कराकडून सैन्याच्या शौर्याचा व्हिडीओ शेअर, एकदा बघाच....
VIDEO: पाकच्या रहिम यार खान एअरबेसचा चक्काचूर अन् धावपट्टीही उद्ध्वस्त
VIDEO: पाकच्या रहिम यार खान एअरबेसचा चक्काचूर अन् धावपट्टीही उद्ध्वस्त.
चिनाब नदीवरील सलाल धरणातून पाणी सोडलं, पाकिस्तानात पूर येणार?
चिनाब नदीवरील सलाल धरणातून पाणी सोडलं, पाकिस्तानात पूर येणार?.
पाकिस्तानचा कांगावा, 'तो' दावा खोटा, भारतीय लष्कराने दिला पुरावा
पाकिस्तानचा कांगावा, 'तो' दावा खोटा, भारतीय लष्कराने दिला पुरावा.
ऑपरेशन 'सिंदूर'मध्ये टॉप 5 कमांडरचा खात्मा, पाकिस्तानातून थेट नाव समोर
ऑपरेशन 'सिंदूर'मध्ये टॉप 5 कमांडरचा खात्मा, पाकिस्तानातून थेट नाव समोर.
VIDEO पाकला मोठा हादरा, भारतानं असं उडवलं रावळपिंडीतलं नूर खान एअरबेस
VIDEO पाकला मोठा हादरा, भारतानं असं उडवलं रावळपिंडीतलं नूर खान एअरबेस.
भारताचा मोठा स्ट्राईक, पाकचे 5 एअरबेस उडवले; पाकसाठी किती महत्त्वाचे?
भारताचा मोठा स्ट्राईक, पाकचे 5 एअरबेस उडवले; पाकसाठी किती महत्त्वाचे?.