भाजप-राष्ट्रवादीत गुप्त चर्चा; अहमदाबादमध्ये शरद पवार-अमित शाह-प्रफुल पटेल यांची भेट?

शरद पवार आणि प्रफुल पटेल यांची अमित शाह यांच्यासोबत गुप्त चर्चा झाल्याची माहिती आहे (NCP Praful Patel BJP's Businessman )

भाजप-राष्ट्रवादीत गुप्त चर्चा; अहमदाबादमध्ये शरद पवार-अमित शाह-प्रफुल पटेल यांची भेट?
प्रफुल पटेल, शरद पवार, अमित शाह
Follow us
| Updated on: Mar 28, 2021 | 1:25 PM

मुंबई : मनसुख हिरेन मृत्यू प्रकरण, अँटिलिया स्फोटक प्रकरण आणि गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर परमबीर सिंह यांनी टाकलेला लेटरबॉम्ब यांच्यामुळे महाराष्ट्रातील राजकारण ढवळून निघालं आहे. त्यानंतर भाजप-राष्ट्रवादीत अहमदाबादमध्ये गुप्त चर्चा झाल्याचा दावा केला जात आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar), राष्ट्रवादीचे दिग्गज नेते आणि माजी केंद्रीय मंत्री प्रफुल पटेल (Praful Patel) यांनी केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपचे दिग्गज नेते अमित शाह (Amit Shah) यांची भेट घेतल्याचं खळबळजनक वृत्त समोर आलं आहे. राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी मात्र भेटीचं वृत्त अफवा असल्याचं सांगितलं आहे. (NCP Praful Patel allegedly met BJP’s Close aide Businessman in Ahmedabad)

पवारही अहमदाबादेत असल्याची चर्चा

भाजपच्या निकटवर्तीय बड्या उद्योगपतीची प्रफुल पटेल यांनी भेट घेतल्याचं सुरुवातीला बोललं जात होतं. अहमदाबादमधील फार्महाऊसवर 26 मार्चच्या रात्री 9.30 वाजता ही भेट झाल्याची माहिती होती. विशेष म्हणजे पटेलांची संबंधित उद्योजकाशी भेट झाली, त्यावेळी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारही अहमदाबादेतच होते, असं बोललं जात होतं. मात्र या बैठकीला पवार उपस्थित होते का, याची पुष्टी मिळालेली नव्हती.

अमित शाहांची पवार-पटेलांशी गुप्त भेट?

शरद पवार आणि प्रफुल पटेल यांची अमित शाह यांच्यासोबत गुप्त चर्चा झाल्याची माहिती ‘दिव्य भास्कर’ या गुजराती वृत्तपत्राने दिली आहे. पटेल आणि पवार प्रायव्हेट जेटने आले होते. त्यानंतर शांतिग्राममधील गेस्टहाऊसला तिघांची भेट झाली, असा दावा या बातमीत करण्यात आला आहे. या भेटीचे परिणाम महाराष्ट्राच्या राजकारणावर या भेटीचे परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

राष्ट्रवादीने वृत्त फेटाळलं

अँटिलिया प्रकरणात राष्ट्रवादीचे नेते असलेले ‘गृहमंत्री’ अनिल देशमुख अडकल्याने राष्ट्रीय पातळीवरही दबाव वाढत आहे. या पार्श्वभूमीवर ही भेट झाल्याची चर्चा आहे. राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी मात्र ही अफवा असल्याचं सांगत भेटीचं वृत्त नाकारलं आहे. शरद पवार यांनी भाजप नेत्यांची भेट घेण्याचा प्रश्नच येत नाही. भाजपने गुजराती वर्तमानपत्रातून अशा बातम्या पेरल्या आहेत, असा दावा मलिक यांनी केला.

(NCP Praful Patel allegedly met BJP’s Close aide Businessman in Ahmedabad)

सामनामधून भाष्य

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर 100 कोटींच्या वसुलीचा आरोप केल्याचे प्रकरण आजही खळबळ माजवीत आहे. परमबीर सिंग यांच्या आरोपपत्रामुळे अनिल देशमुख यांना गृहमंत्री पदावरून जावे लागेल आणि सरकार डळमळीत होईल असे वातावरण निर्माण झाले होते. यापैकी काहीच घडले नाही. तरीही देशभरात या सर्व प्रकरणावर चर्चा झाली व महाराष्ट्राची बदनामी झाली, असं शिवसेना खासदार संजय राऊत यांनी रोखठोक सदरात लिहिलं आहे.

अनिल देशमुखांकडे गृहमंत्रीपद अपघाताने

देशमुख यांना गृहमंत्रीपद अपघाताने मिळाले. जयंत पाटील, दिलीप वळसे-पाटील यांनी गृहमंत्रीपद स्वीकारण्यास नकार दिला. तेव्हा हे पद शरद पवार यांनी देशमुखांकडे दिले. या पदाची एक प्रतिष्ठा आणि रुबाब आहे. दहशतही आहे. आर. आर. पाटील यांच्या गृहमंत्री म्हणून कार्यपद्धतीची तुलना आजही केली जाते. संशयास्पद व्यक्तीच्या कोंडाळय़ात राहून गृहमंत्री पदावरील कोणत्याही व्यक्तीस काम करता येत नाही. पोलीस खाते आधीच बदनाम. त्यात अशा गोष्टींमुळे संशय वाढतो, असंही सामनात लिहिल्याने अंतर्गत कुरबुरीची चर्चा रंगली होती.

संबंधित बातम्या :

…म्हणून शरद पवारांनी अनिल देशमुखांकडे गृहमंत्रीपद सोपवले, शिवसेनेचा गौप्यस्फोट

(NCP Praful Patel allegedly met BJP’s Close aide Businessman in Ahmedabad)

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.