Sharad Pawar | भारत भालकेंच्या जाण्यानं काय काय नुकसान झालं? -वाचा पवार काय म्हणाले?

भारत नाना जरी आज आपल्यात राहिले नाहीत तरी त्यांचे कर्तृत्व, त्यांची माणुसकीची भावना आणि विभागाच्या विकासासाठी त्यांना असलेला ध्यास याचा विसर आपल्याला कधीही पडणार नाही.

Sharad Pawar | भारत भालकेंच्या जाण्यानं काय काय नुकसान झालं? -वाचा पवार काय म्हणाले?
Follow us
| Updated on: Dec 18, 2020 | 12:34 PM

सोलापूर : आमदार भारत भालके यांचं जाणं मनाला चटका लावणारं आहे (Sharad Pawar On Bharat Bhalke). त्यांच्या गेल्याने मोठं नुकसान झालं आहे, अशी खंत राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी बोलून दाखवली. भारत भालके यांना श्रद्धांजली देण्यासाठी आज ते पंढरपूरला गेले होते. तेव्हा त्यांनी भारत भालकेंच्या आठवणींना उजाळा दिला (Sharad Pawar On Bharat Bhalke).

शरद पवार काय म्हणाले?

काही गोष्टी तुमच्या आमच्या हातात नसतात. पंढरपूरच्या विकासासाठी भारत नानांनी मोठी धडपड केली. भारत नाना जरी आज आपल्यात राहिले नाहीत तरी त्यांचे कर्तृत्व, त्यांची माणुसकीची भावना आणि विभागाच्या विकासासाठी त्यांना असलेला ध्यास याचा विसर आपल्याला कधीही पडणार नाही.

सहकारी संस्था असेल, कारखानदारी असेल, पंढरपूर शहर असेल मंगळवेढा तालुक्यातील पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी त्यांचा हट्ट असेल, या प्रत्येक गोष्टीसाठी त्यांनी आपली चिकाटी ठेवली. त्यामुळे ते आज नाहीत तर आपल्या सगळ्यांची जबाबदारी ही आहे की त्यांचे हे अपुरे प्रत्येक स्वप्न जे स्वत:साठी नव्हतं विभागासाठी होतं, इथल्या लोकांसाठी होतं, ते स्वप्न पूर्ण करण्याची काळजी आपण घ्यायची.

संकटं येतात पण त्या संकटांना धैर्याने मात करावी लागते, संकटं आहेत, पण जीवाभावाचा आपला आधार गेला. आधार गेला त्याचा दु:ख आहे.

आण्णांनी या क्षेत्राच्या विकासासाठी मोठी मोलाची कामगिरी केली. त्याची दखल आपण सर्वांनी घेतली आहे. त्यांच्यानंतर या विभागासाठी जर कोणी काही केलं असेल तर त्यामध्ये भारत नानांचं नाव प्रकर्शाने घेतलं जाईल.

मंगळवेढ्याचा 33 गावचा पाणी प्रश्न असो, की कारखान्याचा विषय असो, त्या सर्व गोष्टींचा बारकाईने विचार करुन आपल्याला त्या दृष्टीने पावलं टाकावी लागतील.

दुष्काळात जे कारखाने सुरु झाले त्याचा जास्त फटका पंढरपूरला बसला. पंढरपूरच्या विकासाच्या ध्यासानेच त्यांची मानसिक परिस्थिती ढासाळत गेली (Sharad Pawar On Bharat Bhalke).

थोड्या दिवसांनी मी परत येतो, कारखानदारीचे जे अर्थकारण जे बिघडलंय त्यातून कारखाना काढून ऊस उत्पादक शेतकऱ्यांना काय चांगलं देता येईल या सर्व दृष्टीने त्याच्यावर निर्णय घ्यावे लागतील. तुम्हाला विश्वासात घेवून ते निर्णय घ्यावे लागतील. त्यासाठी विचारविनिमय करु.

पंढरपूर हे देशाचे महत्वाचे ठिकाण आहे. पंढरपूर आणि इथे असलेला पांडुरंग हा या देशातील सामान्य माणसाचा आधार आहे. कष्टकरी, शेतकऱ्यांचा तो देव आहे. त्या पंढरीचा आशीर्वाद ज्याला लाभेल तो भाग्यवान असेल. त्यामुळे पंढरपूर आणि परिसर हा एका दृष्टीने भाग्यवंतांचा परिसर आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. पण ते भाग्य कुठे वळलं असेल तर त्याला जागेवर आणण्याचं काम आपल्या सर्वांचं आहे.

भारत नाना कधी शेतकरी संघटनेतून कधी अपक्ष कधी आणखी कुठल्या पक्षातून निवडणूक लढवायचे. लोक मला म्हणायचे की या-या पक्षातून ते उमेदवार म्हणून उभे आहेत, काय करायचं?, मी सांगायचो निवडणूक लढवायची आहे तर लढवू द्या, काहीही केलं तरी तेच निवडून येणार.

निवडणुकीनंतर विजयी झाल्यावर भारत नाना बारामतीला येत. तिथे आल्यावर एक हार माझ्या हातात देणार आणि म्हणायचे मी तुमच्या बरोबर आहे. हिच भूमिका त्यांनी अखेरपर्यंत शेवटच्या निवडणुकीपर्यंत ठेवली. त्यांनी कायमच साथ दिली.

Sharad Pawar On Bharat Bhalke

संबंधित बातम्या :

Bharat Bhalke death | सामान्य जनतेशी घट्ट नाळ असलेला, मतदारसंघासाठी झटणारा लोकनेता हरपला, अजित पवार गहिवरले

Bharat Bhalke | हॅटट्रिक आमदार ते जनसामान्यांचा नेता, भारत भालके यांची कारकीर्द

Photos : जनसामान्यांचा लोकप्रिय नेता भारत भालके!

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.