VIDEO:इमानदारीने बोला.. नाहीतर सर्वाना जेलात घालीन; राष्ट्रवादीच्या राजेंद्र शिंगणेंची गावकऱ्यांना धमकी

काही गावकरी त्यांच्याकडे समस्या घेऊन आले होते. तेव्हा राजेंद्र शिंगणे यांना त्या गावकऱ्यांना फैलावर घेतले. | Rajendra Shingne

VIDEO:इमानदारीने बोला.. नाहीतर सर्वाना जेलात घालीन; राष्ट्रवादीच्या राजेंद्र शिंगणेंची गावकऱ्यांना धमकी
राजेंद्र शिंगणे यांना त्या गावकऱ्यांना फैलावर घेतले.
Follow us
| Updated on: Apr 01, 2021 | 12:49 PM

बुलडाणा: राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि बुलडाण्याचे पालकमंत्री राजेंद्र शिंगणे (Rajendra Shingne) यांना गावकऱ्यांना धमकावल्याचा एक व्हीडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. राजेंद्र शिंगणे यांच्या मतदारसंघातील चांगेफळ येथे हा व्हीडिओ चित्रीत करण्यात आल्याचे सांगितले जाते. (NCP leader Rajendra Shingne threatening villagers)

या व्हीडिओत राजेंद्र शिंगणे गावकऱ्यांना धमकावताना दिसत आहेत. काही गावकरी त्यांच्याकडे समस्या घेऊन आले होते. तेव्हा राजेंद्र शिंगणे यांना त्या गावकऱ्यांना फैलावर घेतले. मायच्या इमानदारिने बोला , तुम्हाला सरपंचाने पाठविले आहे का माझ्याकडे ?, …मायच्या इमानदारीने बोला.. नाहीतर सर्वाना जेलात घालीन, असे शिंगणे यांनी म्हटल्याचे व्हीडिओत ऐकायला येत आहे.

नक्की काय घडलं?

चांगेफळ येथील काही नागरिक हे गावांतील मातंग समाजच्या स्मशानभूमी संदर्भात समस्यांचे निवेदन घेऊन पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांच्याकडे गेले होते. या स्मशानभूमीतील अतिक्रमण काढण्यात यावे, अशी मागणी नागरिकांनी केली. तेव्हा शिंगणे यांनी उद्धतपणाची वागणूक देत तुम्हाला सरपंचाने माझ्याकडे पाठविले का? , मायच्या इमानदारीने बोला, नाहीतर तुम्हाला जेलात टाकीन अशी धमकी दिली. हा व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर आता राजेंद्र शिंगणे यांच्याविरोधात कारवाई करण्याची मागणी होत आहे.

कोण आहेत राजेंद्र शिंगणे?

डॉ. राजेंद्र शिंगणे हे पाचव्यांदा विधानसभेवर निवडून आले आहेत. 1999 मध्ये ते राज्यमंत्री झाले. त्यावेळी त्यांच्याकडे क्रीडा खात्याचा कारभार देण्यात आला होता. 2001, 2004, 2008 आणि 2019च्या मंत्रिमंडळात त्यांनी कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली होती. 2019 मध्ये अजित पवार यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत गुपचूप शपथविधी आटोपला तेव्हा राजेंद्र शिंगणे त्याठिकाणी उपस्थित होते. त्यांनीच शरद पवार यांना फोन करुन या सगळ्या घडामोडींची माहिती दिली होती. इतर बातम्या

चांगली आणि सकस मिठाई मिळते का?, मंत्री राजेंद्र शिंगणे यांच्याकडून स्वीटमार्ट-हॉटेल्सची तपासणी

मंत्री राजेंद्र शिंगणे यांची मेडिकलवर धाड, ‘रेमडेसिवीर’चा काळाबाजार रोखण्यासाठी धडक

पतंजलीच्या औषधाने कोरोना बरा होत नाही : अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे

(NCP leader Rajendra Shingne threatening villagers)

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.