AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

“एवढी आंदोलनं, आकांडतांडव करून काय उपयोग? तिकीट तर मिळालं नाही!”, सदाभाऊ खोतांना हिणवलं

पंकजा मुंडे आणि सदाभाऊ खोत यांना विधानपरिषदेसाठी मात्र डावलण्यात आलंय. सदाभाऊ खोत यांनी आणि गोपीचंद पडळकरांनी बरीच आंदोलनं केली. एसटी संपाच्या वेळीही त्यांनी आझाद मैदानावर जात संपाला पाठिबा दिला होता. त्याचाच धागा धरत आता राष्ट्रवादी युवकच्या वतीने टीका करण्यात आली आहे.

एवढी आंदोलनं, आकांडतांडव करून काय उपयोग? तिकीट तर मिळालं नाही!,  सदाभाऊ खोतांना हिणवलं
| Updated on: Jun 08, 2022 | 2:05 PM
Share

मुंबई : सध्या राज्यात राज्यसभा (Rajyasabha) आणि विधानपरिषद (Legislative Council) निवडणुकीचं वारं वाहतंय. अश्यात आज भाजपने आज आपल्या विधानपरिषदेच्या उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. यात प्रवीण दरेकरांसह (Pravin Darekar) प्रसाद लाड, उमा खापरे, श्रीकांत भारतीय, राम शिंदे यांची उमेदवारी निश्चित झाली आहे. तर पंकजा मुंडे आणि सदाभाऊ खोत (Sadabhau Khot) यांना मात्र डावलण्यात आलंय. याची सध्या जोरदार चर्चा आहे. मध्यंतरीच्या काळात सदाभाऊ खोत यांनी आणि गोपीचंद पडळकरांनी बरीच आंदोलनं केली. एसटी संपाच्या वेळीही त्यांनी आझाद मैदानावर जात संपाला पाठिबा दिला होता. त्याचाच धागा धरत आता राष्ट्रवादी युवकच्या वतीने टीका करण्यात आली आहे. “एवढी आंदोलनं, आकांडतांडव करून काय उपयोग? तिकीट तर मिळालं नाही!”, असं म्हणत राष्ट्र्वादी युवकचे रविकांत वर्पे (Ravikant Varpe) यांनी सदाभाऊ खोत यांना हिणवलं आहे.

रविकांत वर्पे यांचं ट्विट

रविकांत वर्पे यांनी ट्विट करत सदाभाऊ खोत यांना काही सवाल विचारलेत. “अहो सदाभाऊ खोत, निरोप आला म्हणे… आता विश्रांती घेण्याचा.भाजपासाठी विखारी वक्तव्ये केली गरळ ओकली,आक्रोश केला पण तो काही कामी नाही आला वाटतं! भाऊ हे भाजपावाले घासभर खाऊ घालतात आणि कोस भर चालत नेहतात. भाजपा म्हणजे “काम सरो आणि वैद्य मरो”

भाजपने आपले विधानपरिषदेचे उमेदवार जाहीर केलेत. प्रवीण दरेकर, प्रसाद लाड, उमा खापरे, श्रीकांत भारतीय, राम शिंदे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर दुसरीकडे सदाभाऊ खोत आणि पंकजा मुंडे यांचा पत्ता कट झाला आहे. या दोघांनाही उमेदवारी मिळण्याची शक्यता होती. पण त्यांना तिकीट न मिळाल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलंय.

माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली
माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली.
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं.
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा.
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज.
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?.
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद.
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?.
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक.
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा.
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच.