आधी खासदारकीचा राजीनामा द्या आणि मग महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवटीच्या गप्पा करा, चाकणकर नवनीत राणांवर भडकल्या

नवनीतजी राणा आपल्याला जर नैतिकतेचा एवढा पुळका आला असेल तर आधी खासदारकीचा राजीनामा द्या आणि मग महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवटीच्या गप्पा करा, असं प्रत्युत्तर रुपाली चाकणकर यांनी नवनीत राणा यांना दिलं. | NCP Rupali Chakankar

आधी खासदारकीचा राजीनामा द्या आणि मग महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवटीच्या गप्पा करा, चाकणकर नवनीत राणांवर भडकल्या
Rupali Chakankar And Navneet Rana
Follow us
| Updated on: Mar 23, 2021 | 7:02 AM

मुंबई : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग (Parambir Singh Letter) यांच्या लेटरबॉम्बचे पडसाद सोमवारी लोकसभेत उमटलेले पाहायला मिळाले. याच मुद्द्यावरून शिवसेना-भाजपचे खासदार एकमेकांना भिडले. राष्ट्रवादीच्या सुप्रिया सुळेंनीही (Supriya Sule) देखील आक्रमक भूमिका मांडली. परंतू या सगळ्यात खासदार नवनीत राणा (Navneet Rana) यांनी आक्रमक भूमिका घेऊन महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट (President Rule) लागू झाली पाहिजे, अशी मागणी केली. त्यांच्या याच मागणीवर राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर (Rupali Chakankar) चांगल्याच भडकलेल्या पाहायला मिळाल्या. (NCP Rupali Chakankar Attacked on Navneet Rana Over Demand President Rule)

“नवनीतजी राणा आपल्याला जर नैतिकतेचा एवढा पुळका आला असेल तर आधी खासदारकीचा राजीनामा द्या आणि मग महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवटीच्या गप्पा करा”, असं प्रत्युत्तर रुपाली चाकणकर यांनी नवनीत राणा यांना दिलं.

रुपाली चाकणकर यांनी ट्विट करत खासदार नवनीत राणा यांचा जोरदार समाचार घेतला आहे. त्यांच्या मागणीवर फुली मारत त्यांना त्यांची खासदारकी राष्ट्रवादीमुळे मिळाल्याची आठवण करुन दिली आहे.

काय म्हणाल्या रुपाली चाकणकर?

नवनीतजी राणा आपल्याला जर नैतिकतेचा एवढा पुळका आला असेल तर आधी खासदारकीचा राजीनामा द्या आणि मग महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवटीच्या गप्पा करा. कारण आज तुम्ही खासदार म्हणून जी भूमिका संसदेत मांडली आहे ती खासदारकी तुम्हाला राष्ट्रवादीच्या जीवावर मिळालेली आहे म्हणून मांडता आली आहे.

महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करा, नवनीत राणा यांची लोकसभेत मागणी

महाराश्ट्र राज्यातील कायदा सुव्यवस्था ठीक नसल्याचं सांगत राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करा, अशी मागणी खासदार नवनीत राणा यांनी सोमवारी लोकसभेत बोलताना केली. तसंच उद्धव ठाकरे सरकारवर टीकास्त्र सोडत त्यांनी फडणवीसांसाठी जोरदार बॅटिंग केली.

जो व्यक्ती सोळा वर्ष निलंबित होता. त्याला पुन्हा सेवेत का घेतलं? कुणी घेतलं?, याची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी नवनीत राणा यांनी केली. तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सचिन वाझे यांना पोलीस दलात घ्यायला नकार दिला होता. शिवसेनेने वाझेंसाठी फडणवीसांवर दबाव आणला होता, असं सांगतानाच हा प्रकार असाच सुरू राहिला तर संपूर्ण देशात खंडणी वसुलीचा पायंडा पडेल, असं राणा म्हणाल्या.

लेटर बॉम्बवरुन लोकसभेत गदारोळ

सोमवारी लोकसभेचं कामकाज सुरू झाल्यानंतर शून्य प्रहारात भाजपने मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्या पत्रावरून जोरदार आवाज उठवला. भाजपचे खासदार गिरीश बापट, पूनम महाजन आणि अपक्ष खासदार नवनीत राणा हे लोकसभेत आक्रमक झाले. शिवसेना खासदारांनी भाजपच्या खासदारांना उत्तर दिलं. तसंच राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी उद्धव ठाकरे सरकारसाठी बॅटिंग केली.

(NCP Rupali Chakankar Attacked on Navneet Rana Over Demand President Rule)

हे ही वाचा :

लोकसभेत नवनीत राणा, गिरीश बापट आक्रमक; ठाकरे सरकारच्या बचावासाठी पंजाबचा खासदार मैदानात

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.