Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

इस्लामपुरात राष्ट्रवादीला नेतृत्व मिळेना, जयंत पाटलांचे सुपुत्र प्रतीक पाटलांकडे धुरा?

भविष्यात जयंत पाटील यांचे सुपुत्र प्रतीक पाटील यांच्याकडे नेतृत्व दिले जाण्याची शक्यता आहे. (Jayant Patil Son Prateek Patil Islampur)

इस्लामपुरात राष्ट्रवादीला नेतृत्व मिळेना, जयंत पाटलांचे सुपुत्र प्रतीक पाटलांकडे धुरा?
प्रतीक जयंत पाटील
Follow us
| Updated on: May 31, 2021 | 12:34 PM

सांगली : राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांच्या इस्लामपूर मतदारसंघातच पक्षाला एकमुखी नेतृत्व मिळत नसल्याचं चित्र आहे. इस्लामपूर नगरपालिका निवडणूक (Islampur Nagarpalika Election) सहा महिन्यांवर येऊन ठेपली आहे. भविष्यात जयंत पाटील यांचे मोठे सुपुत्र प्रतीक पाटील (Prateek Jayant Patil) यांच्याकडे नेतृत्व सोपवले जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. (NCP State President Jayant Patil Son Prateek Patil may lead party in Islampur Nagarpalika Election)

विजय पाटलांच्या निधनानंतर पोकळी

1985 पासून सलग 35 वर्ष विजय पाटील यांच्याकडे सांगली जिल्ह्यातील इस्लामपूर राष्ट्रवादीचे नेतृत्व होते. मात्र 2017 मध्ये त्यांना पराभवाला सामोरं जावं लागलं. थेट नगराध्यक्ष पदाच्या निवडीत निशिकांत पाटील यांनी विजय पाटील यांचा पराभव केला होता. पराभवानंतर विजय पाटील राजकारणापासून काहीसे अलिप्त झाले. तर विजय पाटील यांच्या निधनानंतर आजपर्यंत राष्ट्रवादीला पालिकेत नेतृत्व मिळालेले नाही.

जयंत पाटलांच्या मुलाला एकमुखी समर्थन?

इस्लामपूरमध्ये राष्ट्रवादीला एकमुखी नेतृत्व मिळत नसल्याची चर्चा आता रंगली आहे. इस्लामपूर नगरपालिका निवडणूक अवघ्या 6 महिन्यांवर येऊन ठेपली आहे. मात्र पक्षात एकमुखी नेतृत्वावर शिक्कामोर्तब होत नाही. त्यामुळे भविष्यात जयंत पाटील यांचे सुपुत्र प्रतीक पाटील यांच्याकडे नेतृत्व दिले जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

जयंत पाटील ठाकरे सरकारमध्ये वजनदार मंत्री

जयंत पाटील जवळपास गेल्या तीन दशकांपासून राष्ट्रवादीतर्फे इस्लामपूर मतदारसंघाचं नेतृत्व करत आहेत. सध्या त्यांच्याकडे राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्षपदाची धुरा आहे. तर ठाकरे सरकारमध्ये ते जलसंपदा मंत्रालय सांभाळत आहेत. याआधी त्यांनी ग्रामविकास, अर्थ आणि गृह अशी वजनदार खातीही सांभाळली आहेत.

प्रतीक पाटलांच्या नेतृत्वात ट्रॅक्टर मोर्चा

दरम्यान, प्रतीक पाटील यांच्या नेतृत्वात फेब्रुवारी महिन्यात सांगलीत मोर्चा काढण्यात आला होता. प्रतीक जयंत पाटील स्वतः ट्रॅक्टर चालवत मोर्चात सहभागी झाले होते. दिल्लीत झालेल्या शेतकरी आंदोलनाला समर्थन देण्यासाठी आणि पेट्रोल डिझेल दरवाढीचा निषेध करण्यासाठी जयंत युवा किसान ट्रॅक्टर मोर्चा काढण्यात आला होता. प्रतीक पाटील गेल्या काही काळापासून स्थानिक राजकारणात सक्रिय होताना दिसत आहेत.  (Jayant Patil Son Prateek Patil Islampur)

संबंधित बातम्या :

VIDEO | जयंत पाटलांच्या मुलाचं राजकीय लाँचिंग? प्रतीक पाटील यांच्या नेतृत्वात ट्रॅक्टर मोर्चात

(NCP State President Jayant Patil Son Prateek Patil may lead party in Islampur Nagarpalika Election)

महाराष्ट्रात विमानाने यायचा, रेल्वेने सोलापूर गाठायचा अन् मग..
महाराष्ट्रात विमानाने यायचा, रेल्वेने सोलापूर गाठायचा अन् मग...
गोरेंच्या सुपुत्राचा प्रताप! भैय्या पाटलांनी ट्विट केला व्हिडिओ
गोरेंच्या सुपुत्राचा प्रताप! भैय्या पाटलांनी ट्विट केला व्हिडिओ.
कराडने अनेक छोटे-मोठे गुंड जेलमध्ये बोलावून घेतलेत; आव्हाडांचं ट्विट
कराडने अनेक छोटे-मोठे गुंड जेलमध्ये बोलावून घेतलेत; आव्हाडांचं ट्विट.
वाल्मिक कराडने जेलरच्या ऑफिसमध्ये बसून सगळं प्लॅनिंग केलं - मीरा गीते
वाल्मिक कराडने जेलरच्या ऑफिसमध्ये बसून सगळं प्लॅनिंग केलं - मीरा गीते.
कराडला, घुलेला मारहाण होत असताना, बबन गीतेने शेअर केली पोस्ट
कराडला, घुलेला मारहाण होत असताना, बबन गीतेने शेअर केली पोस्ट.
मारहाण घटनेनंतर महादेव गीतेसह चौघांची हर्सुल कारागृहात रवानगी
मारहाण घटनेनंतर महादेव गीतेसह चौघांची हर्सुल कारागृहात रवानगी.
'...अन् देशमुख हत्याप्रकरणातील आरोपी एकमेकांना संपवतील' - मनोज जरांगे
'...अन् देशमुख हत्याप्रकरणातील आरोपी एकमेकांना संपवतील' - मनोज जरांगे.
मारामारी थापड थुपडीची झाली, पण..; धस नेमकं काय म्हणाले
मारामारी थापड थुपडीची झाली, पण..; धस नेमकं काय म्हणाले.
लाडकी बहीणबंद होणार?सरकारकडे पैसे नाहीत?सत्ताधारी-विरोधकांमध्ये जुंपली
लाडकी बहीणबंद होणार?सरकारकडे पैसे नाहीत?सत्ताधारी-विरोधकांमध्ये जुंपली.
घरात वडील आजारी अन् काढणीला आलेलं पीक; चिमुकला करतोय शेताची राखण
घरात वडील आजारी अन् काढणीला आलेलं पीक; चिमुकला करतोय शेताची राखण.