पवारच खरे पैलवान, कार्यकर्त्यांकडून शरद पवारांना चांदीची गदा भेट

मुंबई राष्ट्रवादी युवक कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांना चांदीची गदा भेट दिली (Sharad Pawar Gada). शरद पवारांना गदा भेट देऊन या कार्यकर्त्यांनी महाराष्ट्रतील राजकारणातले खरे पैलवान हे शरद पवार असल्याचा संदेश दिला.

पवारच खरे पैलवान, कार्यकर्त्यांकडून शरद पवारांना चांदीची गदा भेट
Follow us
| Updated on: Oct 28, 2019 | 8:11 PM

बारामती : मुंबई राष्ट्रवादी युवक कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांना चांदीची गदा भेट दिली (Sharad Pawar Gada). शरद पवारांना गदा भेट देऊन या कार्यकर्त्यांनी महाराष्ट्रतील राजकारणातले खरे पैलवान हे शरद पवार असल्याचा संदेश दिला. या कार्यकर्त्यांनी पवारांना तब्बल दोन किलो चांदीची गदा विजयी पैलवान म्हणून दिली (Sharad Pawar Gada).

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शरद पवारांमध्ये राजकीय आखाडा रंगला (Sharad Pawar vs CM Devendra Fadnavis). महाराष्ट्राचा खरा पैलवान कोण याच मुद्यावर यंदाची निवडणूक लढल्या गेल्याचं चित्र पाहायला मिळालं. मुख्यमंत्री आणि शरद पवारांनी एकमेकांवर अनेक ताशेरे ओढले, टीका केल्या. एकीकडे मुख्यमंत्र्यांनी निवडणुकीत पैलवान दिसत नसल्याची टीका केली, तर दुसरीकडे शरद पवारांनी कुस्ती अशांची होन नाही म्हणत फडणवीसांवर निशाणा साधला होता.

त्यानंतर निवडणुकांचे निकाल हाती आले आणि राष्ट्रवादीने युतीला जबरदस्त टफ फाईट दिली. ‘अब की बार 220 पार’, म्हणणाऱ्या भाजपला 105 जागांवर समाधान मानावे लागले. तर सर्व एक्झिट पोलला खोटं ठरवत पवारांच्या राष्ट्रवादीने राज्यात 54 जागा काबिज केल्या. त्यामुळे राज्याच्या आखाड्यात एकमेव शरद पवार आहेत अशी भावना या कार्यकर्त्यांनी व्यक्त केली.

पवारांना चांदीची गदा देत राष्ट्रवादीकडून मुख्यमंत्री या राजकीय आखाड्यात चितपट झाल्याचा निकालच जणू या कार्यकर्त्यांनी दिला. त्यामुळे ही गदा भाजपच्या जिव्हारी लागण्याची शक्यता आहे.

पवार कुटुंबाने दरवर्षीप्रमाणे यंदाही कार्यकर्त्यांसोबत राजकीय दिवाळी साजरी केली. बारामतीतील शरद पवार यांच्या गोविंद बाग या निवास स्थानी ही दिवाळी भेट पार पडली. या वेळी मुंबई राष्ट्रवादी युवक कार्यकर्त्यांनी शरद पवारांनी ही गदा भेट दिली.

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.