Aaditya Thackeray : बीडीडी चाळीतील पोलिसांना 25 लाखांत घर, महाविकास आघाडीचा मोठा निर्णय

बीडीडी चाळींमधील 2,250 पोलीस कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी सोमवारी जाहीर केले की, पुनर्विकासानंतर घरांची किंमत 50 लाखांवरून 25 लाख रुपये करण्यात आली आहे.

Aaditya Thackeray : बीडीडी चाळीतील पोलिसांना 25 लाखांत घर, महाविकास आघाडीचा मोठा निर्णय
बीडीडी चाळीतील पोलिसांना 25 लाखांत घरImage Credit source: twitter
Follow us
| Updated on: Jun 28, 2022 | 8:09 AM

मुंबई – सध्या महाराष्ट्रातील महाविकास आघाडी (MVA) अस्थिर असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. शिवसेनेच्या (Shivsena) आमदारांनी बंड केल्यापासून दोन गटात आरोप-प्रत्योरोप सुरू आहेत. त्यामुळे राज्यात कधीही नवीन सरकार येईल अशी स्थिती आहे. पण महाविकास आघाडीच्या मंत्र्यांनी आपल्या कामाचा धडाका कायम ठेवला असून चांगले निर्णय घेतले जात आहेत. आदित्य ठाकरे (Aditya thackeray) यांनी वरळीतील बीडीडी चाळीतील पोलिस वसाहतीत राहणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी 25 लाखांत घर देणार असल्याचे महाविकास आघाडीकडून जाहीर करण्यात आले आहे. विशेष म्हणजे पुनर्विकास प्रकल्पात बांधकाम खर्चात पोलिस कर्मचाऱ्यांना घर देण्याचा निर्णय देण्यात आला आहे. पूर्वी त्या घरांच्या किंमत 50 लाख ठरविण्यात आली होती. पण पोलिस बांधवांनी विनंती केल्यानंतर त्यांना सरकारकडून दिलासा देण्यात आला आहे. 25 लाखांत घर देणार असल्याचे आदित्य ठाकरे यांनी जाहीर केले आहे.

2,250 पोलीस कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा

बीडीडी चाळींमधील 2,250 पोलीस कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी सोमवारी जाहीर केले की, पुनर्विकासानंतर घरांची किंमत 50 लाखांवरून 25 लाख रुपये करण्यात आली आहे. आदित्य ठाकरे आणि जितेंद्र आव्हाड यांनी बातमी त्यांनी चाळीत जाऊन सांगितली. त्यावेळी त्यांच्या चेहऱ्यावर वेगळेचं हास्य उमटले.

50 लाखांऐवजी 25 लाखांना घरे

माननीय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि माझे नेते शरद पवार यांच्या सूचनेनुसार बीडीडी चाळींमधील सदनिका कायमस्वरूपी त्यांच्या नावावर करण्यात आल्या आहेत. आता 50 लाखांऐवजी 25 लाखांना घरे दिली जाणार आहेत. आता घर रिकामे करा आणि प्रकल्पाला पुढे जाऊ द्या,’ असे आव्हाड यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.

सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, राज-उद्धव ठाकरेंमध्ये काय संवाद?
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, राज-उद्धव ठाकरेंमध्ये काय संवाद?.
खातेवाटपानंतर 'मीच होणार पालकमंत्री', ठाणे, पुण्याचं पालकत्व कोणाकडे?
खातेवाटपानंतर 'मीच होणार पालकमंत्री', ठाणे, पुण्याचं पालकत्व कोणाकडे?.
मराठी कुटुंबाला मारहाण, चिमुकलीसोबत अश्लील चाळे, विचारणा केली तर...
मराठी कुटुंबाला मारहाण, चिमुकलीसोबत अश्लील चाळे, विचारणा केली तर....
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?.
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्...
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्....
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?.
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र.